Wednesday, October 10, 2018

Readers' questions: What are some good books to read about the Maratha Navy?

There aren’t many good books on Maratha Navy out there. Below I’m giving a list of few books, in English and Marathi, which are either available in market readily or available for free download.
English Books
A History of the Maratha Navy and Merchantships
- Dr. B. K. Apte

This 1973 book is still the best you can get today.
http://msblc.maharashtra.gov.in/pdf/newpdf/next20/A%20HISTORY%20OF%20THE%20MARATHA%20NAVY%20AND%20MERCHANTSHIPS.pdf
Early career of Kanhoji Angria and other papers.
- Sundranath Sen

This is a collection of 19 research essays by the author, 6 of which directly relate to Maratha Navy or Angre family.
Early Career Of Kanhoji Angria And Other Papers : Nath Sen Surendra : Free Download, Borrow, and Streaming : Internet Archive
Naval Resistance to Britain's Growing Power in India, 1660-1800: The Saffron Banner and the Tiger of Mysore.
- Philip MacDougall

Most of the western writing about Maratha Navy termed them as pirates, not this book. This book correctly identifies them as legitimate resistance to British dominance. It only partly explores Maratha Navy, but is an important read for those interested in the subject.
The book is too damn expensive...
Buy Naval Resistance to Britain`s Growing Power in I - The Saffron Banner and the Tiger of Mysore (Worlds of the East India Company) Book Online at Low Prices in India | Naval Resistance to Britain`s Growing Power in I - The Saffron Banner and the Tiger of Mysore (Worlds of the East India Company) Reviews & Ratings - Amazon.in
-------------
Marathi Books - मराठी पुस्तके
मराठा आरमार - एक अनोखे पर्व
- डॉ. सचिन पेंडसे.

२०१७ साली हे पुस्तक प्रकाशित झालेले असून, आता पर्यंतचे सर्वात सखोल अभ्यासात्मक पुस्तक आहे. पुस्तक खरेदीची लिंक खाली देत आहे.
Buy Maratha Armar- Ek Anokhe Parva (First Edtion, 2017) Book Online at Low Prices in India
Armar of Shivaji Maharaj, Kanhoji Angre, Tulaji Angre, Sekhoji Angre, Dhulap Armar, Armar of Peshwas, History of Indian Navy
शिवछत्रपतींचे आरमार
- गजानन भास्कर मेहेंदळे आणि संतोष शिंत्रे

फक्त छ. शिवाजी महाराजांच्या आरमारावर अभ्यास करून बनवलेले एकमात्र पुस्तक. संग्रही असावे असे. पुस्तक खरेदीची लिंक खाली.
Amazon.in: Buy Shivachatrapatinche Aramar Book Online at Low Prices in India
Shivchatrapatinche Armar, Gajanan Mehendale, Naval forces of Shivaji Maharaj, Ship building by Marathas, construction of sea forts
दर्याराज कान्होजी आंग्रे
-डॉ. सदाशिव शिवदे

कान्होजी आंग्रे यांच्यावरील आतापर्यंतचे सर्वात सखोल अभ्यासग्रंथ.
Daryaraj Kanhoji Angre, Angre family, Naval force of Shivaji, family history of Angre

NOTE: The answer was originally published on Quora.

Tuesday, January 16, 2018

मराठ्यांची आरमारे

मराठा गुराब इंग्रज जहाजावर चढाई करताना
मराठ्यांची आरमारे
- प्रतिश खेडेकर.
(साप्ताहिक जव्हार वैभव यांच्या सन २०१७च्या दिवाळी अंकात हा लेख प्रसिद्ध झाला होता.)
---

छ. शिवरायांनी समुद्राची बाजू सुरक्षित करण्याच्या हेतूने आरमाराची स्थापना केली होती. समुद्रावर बलशाली असलेल्या सिद्दी, पोर्तुगीज व इंग्रज यांच्या नाकावर टिच्चून एक स्वतंत्र राज्यांग निर्माण केले. पण, मराठ्यांच्या इतिहासात हे एकंच आरमार होते असे नाही. मराठ्यांच्या वेगवेगळ्या आरमारांचा घेतलेला हा धावता आढावा.

१. स्वराज्याचे आरमार:

१६५७ साली महाराजांनी आदिलशाही कडून चेउल ते माहुली पर्यंतचा मुलुख जिंकून घेतला. या प्रांतात पेन, पनवेल, कल्याण, व भिवंडी सारखी समृद्ध बंदरे होती. याच बंदरांमध्ये सर्वप्रथम आरमार बांधण्याची सुरुवात झाली. १६५९ च्या एका पोर्तुगीज पत्रात इथे २० गलबते बांधत असल्याचा उल्लेख मिळतो.

पुढे, १६६० च्या दशकात विजयदुर्ग, सिंधुदुर्ग, सुवर्णदुर्ग, हि नाविक तळे तयार झाली. १६७९ आणि ८० मध्ये क्रमाने जलदुर्ग खांदेरी आणि कुलाबा  बांधले गेले. विजयदुर्ग येथे ५७ नौका असल्याचे एका समकालीन प्रवाशीच्या वर्णनामध्ये उल्लेख आहे.

शिवाजी महाराजांच्याकाळी या संपूर्ण आरमाराची दोन सुभ्यात विभागणी केली गेलेली होती. प्रत्येक सुभ्यात २०० लहान मोठ्या नौका व त्यांच्यावर एक सुभेदार, म्हणजेच ऍडमिरल. महाराजांच्या काळातील दर्यासारंग, मायनाक भंडारी व दौलतखान हे सुभेदार आपल्याला ज्ञात आहेत.

संभाजी महाराजांनी आरमाराची पुनर्रचना केलेली दिसते. त्यांच्या काळात आरमारात पाच सुभे होते, व प्रत्येक सुभ्यात ५ मोठी गुराबे व १५ गलबते होती. तसेच, त्यांनी सरसुभेदार, ग्रँड ऍडमिरल, हे नवीन पद  निर्माण करून त्यांच्या हाताखाली पाचही सुभे दिले. गोविंदजी जाधव, सिदोजी गुजर, व कान्होजी आंग्रे हे क्रमाने छ. संभाजी, छ. राजाराम, व छ. महाराणी ताराबाई यांचे सरसुभेदार होते.

२. आंग्रेंचे आरमार

वर उल्लेख केल्याप्रमाणे कान्होजी आंग्रे हे ताराबाई यांच्या काळात आरमाराचे सरसुभेदार होते. त्यांनी अतुलनीय पराक्रम करून १७०० - १७०७ च्या काळात मोगलांपासून कोंकण किनारपट्टीचे रक्षण केले. १७०७ साली औरंगजेब वारला आणि त्याच्या मुलांमध्ये यादवी माजली. मराठ्यांचे युवराज शाहू हे पुन्हा महाराष्ट्रात आले आणि वारसा हक्काने छत्रपती पदावर अधिकार सांगू लागले. त्यावेळी यांना महाराणी ताराबाई यांनी विरोध केला होता. साहजिकच सरखेल कान्होजी आंग्रे हे ताराबाईंच्या पक्षात गेले. १७१४ साली कान्होजी यांना शाहूंचे पेशवे बालाजी विश्वनाथ भट यांनी शाहूंच्या बाजूने वाळवून घेतले. या मोबदल्यात आंग्रे यांना सरंजाम, व वंशपरंपरागत सरखेलपदवी मिळाली.

कान्होजी आंग्रे यांचे निधन १७२९ साली झाले. या २९ वर्षांच्या कारकिर्दीत इंग्रज, डच, पोर्तुगीज, यांचे एकूण पाच मोठे हल्ले त्यांनी परतवून लावले. आज आपण 'ऍडमिरल' या शब्दासाठी 'सरखेल' हा समानार्थी रूपाने वापरतो, याचे श्रेय फक्त आणि फक्त कान्होजी आंग्रेंना जाते. कान्होजींना ६ पुत्र होते. सेखोजी, संभाजी, मानाजी, येसाजी, धोंडजी व तुळाजी.

कान्होजींनंतर त्यांचे ज्येष्ठ पुत्र सेखोजी यांनी आरमाराचा कारभार सांभाळला. यांचा मृत्यू १७३३ साली झाला. पण आपल्या अल्प कारकिर्दीत त्यांनी सिद्दी कडून कोकणचा बराच भाग सोडवून घेतला होता.

सेखोजी नंतर त्यांचे धाकटे बंधू संभाजी सरखेल झाले. पण संभाजी आणि मानाजी मध्ये बेबनाव झाला. प्रकरण तलवारी उपसण्यापर्यंत गेले. अशावेळी, बाजीराव पेशव्यांनी मध्यस्थी करून आरमार आणि सरंजामचे दोन भाग केले. पहिला भाग संभाजीस देऊन त्यांना विजयदुर्ग येथे 'सरखेल'  पदवी सोबत स्थापित केले. व मानाजीस 'वजारत -म-आब' हि नवीन पदवी देऊन कुलाब्यास स्थापित केले. अशाप्रकारे आंग्र्यांच्या आरमाराची विभागणी झाली.

विजयदुर्ग, सन १८५५ - १८६२
अ) विजयदुर्गचे आरमार:

संभाजी आंग्रेंनी विजयदुर्गच्या आरमाराची जबाबदारी सांभाळली. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी इंग्रज, डच, पोर्तुगीज या त्रिकुटांना त्राही त्राही करून सोडले होते. १७३५ साली त्यांनी इंग्रजांचे 'डर्बी' हे जहाज समुद्रावर पकडले होते. या जहाजावरील संपत्ती इतकी होती ईस्ट इंडिया कंपनीला न भूतो न भविष्यती असा तोटा सहन करावा लागला होता. १७३८ साली डचांनी आजच्या जकार्ता येथून भले मोठे आरमार पाठवून विजयदुर्गवर हल्ला केला होता. पण या हल्ल्याला सुद्धा त्यांनी आपल्या वडिलांप्रमाणेचं परतवून लावले. वसई मोहिमेदरम्यान गोव्याकडील समुद्री किनारा संभाजी आंग्रे सांभाळत होते. संभाजी आंग्रे हे १७४२ साली वारले. त्यांच्यानंतर सरखेल पदवी तुळाजी आंग्रेंना मिळाली. यांनीसुद्धा आपल्या वडील भाऊंप्रमाणे विजयदुर्ग ते कोचीचा पूर्ण किनारा आपल्या दराऱ्या खाली आणला होता.

तुळाजी जरी पराक्रमी असले, तरी ते राजकारणी नव्हते. त्यांचे शेजारच्या मराठी संस्थांनांसोबत वाकडे होते. पंतप्रतिनिधी, वाडीचे सावंत, इतकेच नव्हे तर खुद्द कोल्हापूर छत्रपती सुद्धा त्यांच्यावर नाराज होते. मानाजी सोबतची भाऊबंदकी हि तुळाजीला वारसा हक्कासोबतच मिळाली होती, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

याचा फायदा मात्र इंग्रजांना झाला. त्यांना फक्त एकच संधी पाहिजे होती तुळाजीला नष्ट करण्याची आणि ती त्यांना मिळाली. १७५४ साली इंग्रज आणि पेशव्यांमध्ये तुळाजी आंग्रे विरुद्ध युद्ध करण्याचा करार झाला होता. त्याप्रमाणे दुसऱ्याच वर्षी त्यांनी एकत्र मिळून सुवर्णदुर्ग जिंकून घेतले. पुढच्या मोहिमेसाठी खास इंग्लंडहून आलेली भीमकाय जहाजे वापरण्याचा निर्णय घेण्यात आला. १७५६ साली इंग्रज कंपनी, रॉयल नेव्ही व पेशव्याचे आरमार या त्रिकुटांनी विजयदुर्ग जिंकून घेतले. विजयदुर्गच्या आरमाराला युद्धात आग लागली व ते नष्ट झाले. तुळाजी आंग्रे कैद झाला. विजयदुर्गचा हा शेवटचा सरखेल.

मानाजींनी सरखेल पदवीसाठी फार प्रयत्न केले. पण ते मिळण्याआधीच ते १७५९ साली वारले. त्यामुळे त्यांचे पुत्र रघुजी आंग्रे यांना सरखेल व वजारत-म-आब या दोन्ही पदव्या मिळाल्या.

कोलाबा, सन १८५५ - १८६२
ब)कुलाबा आरमार:

कुलाब्याचे आरमार मानाजी आंग्रेंच्या हिश्यास आले. याचे त्यांनी अक्षरशः सोने केले. समुद्रावर पोर्तुगीज व सिद्दींना पछाडून सोडले. चिमाजी आप्पांच्या प्रसिद्ध वसईच्या मोहिमेत पोर्तुगीजांचे महत्वाचे उरणचे बेट यांनीच जिंकले होते. वसईला समुद्रमार्गे रसद न पोहोचू दिल्यामुळे वसईच्या सैनिकांची अन्न व दारुगोळ्यासाठी मारामार सुरु झाली. वसई विजयामागची हि पार्श्वभूमी बऱ्याच  जणांना माहित नाही.

मानाजी आंग्रे १७५९ साली वारले, त्यांच्या नंतर रघुजी आंग्रे सरखेल व वजारत-म-आब झाले. दोन्ही पितापुत्रांनी आजच्या रायगड जिल्ह्याला भरभराटी आणली. रघुजींचा काळ हा शांतिकाळ असल्यामुळे आपल्याला जास्त लढायांचे उल्लेख मिळत नाहीत. रघुजी १७९३ साली वारले आणि राज्यात अंधाधुंद माजली. १७९३ ते १८१४ काळात, दुसरे मानाजी आंग्रे, जयसिंह आंग्रे, बाबुराव आंग्रे, काशीबाई आंग्रे व परत दुसरे मानाजी आंग्रे असे सरखेल झाले. राज्यातील यादवी व मुलखीं व्यवस्थेवर दुर्लक्ष यामुळे राज्य व आरमार लयास गेले. शेवटी १८४० साली दुसरे कान्होजी आंग्रे, जे एक वर्षाचे सुद्धा नव्हते, यांच्या निधनानंतर कुलाबा संस्थान संपुष्टात आले.

१८१८ नंतर कुलाब्याचे आरमार लष्करी स्वरूपाचे न राहून फौजदारी स्वरूपाचे झाले होते. एकाप्रकारे त्याकाळचे कोस्ट गार्ड. याच भूमिकेत अजून काही दशके निघाली. १८४० किंवा ४१ साली आंग्रयांचे राज्य इंग्रजांनी गिळंकृत करून आरमार नष्ट केले.

३) पेशव्यांचे आरमार:

वसई, सन १७८०
अ)सुभा वसई

वसईची मोहीम हि १७३७-३९ पर्यंत चालली. या मोहिमेच्या सुरुवातीलाच अर्नाळा गाव आणि बेट मराठ्यांच्या हाती लागले. साहजिकच या बेटाचे आरमारी महत्व चिमाजी आप्पांच्या नजरेत आले. त्यांनी त्याच वर्षी बाजीराव बेळोसे यांना तिथे किल्ला बांधायला सांगितला आणि सुभे आरमार स्थापन केले. १७३७ साली वसई जिंकल्यावर हा सुभा वसई येथे स्थलांतरित केला गेला. बाजीराव नंतर त्यांचे पुत्र  त्रिंबकजी, व त्यानंतर नारो त्रिंबक हे सुभेदार झाले. त्या तिघांमध्ये नारो त्रिंबक हे सर्वात जास्त खटपटी होते. सुरत ते सावंतवाडी यांनी बऱ्याच स्वाऱ्या केल्या. इंग्रजांनी विजयदुर्ग पेशव्यानां परत केल्यावर तिथे एक नवीन आरमार उभारण्यात आले. या नवीन आरमाराची सुभेदारी काही काळ नारो त्रिंबकपाशी होती. वसई सुभा अंदाजे १७३७ - १८१८ पर्यंत होता.

ब) सुभा विजयदुर्ग

वर सांगितल्याप्रमाणे विजयदुर्ग येथे नवीन सुभा १७५९ पेशव्यांनी उभारला होता. या नवीन सुभ्याचे सुभेदार पद वसई आरमाराचे सुभेदार नारो त्रिंबक यांना देण्यात आले. १७६२/६३ च्या जवळपास रुद्राजी धुळप यांना विजयदुर्गची सुभेदारी देण्यात आली. हे रुद्राजी तुळाजी आंग्रेंचे आरमारी सुभेदार होते. यानंतर विजयदुर्गची सुभेदारी धुळप घराण्यात राहिली. रुद्राजी नंतर त्यांचे पुत्र आनंदराव, आणि पौत्र जानोजी यांच्याकडे सुभेदारी आली. यात आनंदराव हे सर्वात पराक्रमी होते. १७८३ साली त्यांनी रत्नागिरीजवळ टिपू सुलतानवर स्वारी करायला जाणाऱ्या इंग्रजी आरमाराला जप्त केले. या लढाईमुळे इंग्रजांमध्ये मराठा आरमाराची पुन्हा भीती भरली.

हे आरमार १८१८ पर्यंत अस्तीत्वात होते. तिसऱ्या आंग्ल - मराठा युद्धाच्या अखेरीस विजयदुर्ग इंग्रजांनी घेतला आणि या आरमाराचा अस्त झाला.

सिंधुदुर्ग, छायाचित्र: श्री उद्धव ठाकरे
४) करवीर छत्रपतींचे आरमार

याला सिंधुदुर्ग आरमार किंवा मालवण आरमार सुद्धा म्हणत. खुद्द छ. शिवाजी महाराजांनी याची मुहूर्तमेढ केलेली असल्यामुळे आणि हे आरमार कायम छत्रपतींच्याच ताब्यात राहिल्यामुळे या आरमाराला ऐतिहासिक महत्व आहे.

१७३१ साली वारणेचा तह झाला. या तहामध्ये मराठेशाहीची अधिकृत वाटणी झाली. सातारा व कोल्हापूर अशा दोन गाद्या झाल्या. या तहान्वये, विजयदुर्गच्या दक्षिणेकडील पुर्ण प्रांत कोल्हापूरकरांना मिळाला.

सिंधुदुर्गचे आरमार जरी आंग्रेंच्या तोडीचे नसले तरी ते पोर्तुगीजांना खूप त्रासदायक होते. गोव्याच्या दक्षिणेस 'केप राम' पर्यंत हे टेहळणी करीता जात होते. १७६५ साली इंग्रजांनी सिंधुदुर्ग किल्ला जिंकला. पण महाराणी जिजाबाई यांनी राजकारण करून पैसे देऊन तो सोडवून घेतला. १८१२ साली इंग्रजांसोबत झालेल्या करारानुसार सिंधुदुर्गचे आरमार खालसा करण्यात आले.

दुर्दैवाने शिवछत्रपतींनी स्थापिलेल्या या आरमारावर हवा तितका अभ्यास झालेला नाही.

तेरेखोलची खाडी
५) सावंतवाडीचे आरमार

सावंतांनी आपले आरमार कधी स्थापित केले हे सध्या सांगणे अवघड आहे. यांच्या आरमाराचा सर्वात जुना उल्लेख छ. संभाजी व राजाराम यांच्या काळातील आहे. सावंत यांनी आपल्या राज्याच्या रक्षणासाठी वेळोवेळी वेगवेगळ्या राजांचे मांडलिकत्व स्वीकारले होते. कधी छ. शिवाजी, तर कधी औरंगजेब, कधी करवीर छत्रपती, तर कधी पोर्तुगीज.

तेरेखोलची खाडी हे सावंतांचे आरमारी तळ होते. इथे एकाच वेळी १० मोठ्या गुराबा नांगरून राहू शकत होते. संस्थानाच्या आकाराच्या मानाने सावंतांचे आरमार बरेच मोठे होते.

६) बडोद्याच्या गाईकवाडांचे आरमार.

यांचा उल्लेख ''बंदर बिलिमोडा सुभा आरमार' असा पाहायला मिळतो. दामाजी गायकवाड हे गुजरातचे सरंजामदार होते आणि त्यांनी आणि पेशव्यानी सरकार सुरतचे महसूल आपापल्यात वाटून घेतले होते. जमिनीवरील जकात व इतर कर हे पेशव्यांचे तर समुद्रावरील दस्तक व कौल गायकवाडांचे.

तब्बल ५० लहान मोठ्या नौकांनी सज्ज असलेले हे आरमार मोगल, इंग्रज व डच जहाजांवर हल्ला करून त्यांच्या कडून खंडणी वसूल करीत असे. यांच्या आरमारातील अप्पाजी पंडित आणि जयराम अप्पाजी यांची विशेष ख्याती होती.

आंग्रेंप्रमाणे यांचे आरमार सुद्धा पुढे फक्त कोस्ट गार्ड स्वरूपाचे राहिले. १८७५ पर्यंत बिलिमोडा सुभा आरमाराचा उल्लेख सापडतो.



तर थोडक्यात ही मराठ्यांनी उभारलेली वेगवेगळी आरमारे. शिवछत्रपतींनी आपल्या दूरदृष्टीने आरमाराची स्थापना केलीच पण त्यांच्या शिष्यांनी सुद्धा त्याचे अनुकरण केलेले आहे. "जैसे ज्यास अश्वबळ त्याची पृथ्वी प्रजा आहे, तद्वतच ज्याचा आरमार त्याचा समुद्र.याकरिता आरमार अवस्यमेव करावे." ही शिवाजी महाराजांची नीती त्यांनी सत्य करून दाखवली. ब्रिटिशांचे राज्य मुंबई ऐवजी बंगाल येथून का सुरु झाले याचे प्रमुख कारण होते आपले आरमार आणि तत्याने दिलेला यशस्वी सागरी लढा.

मूळ लेख: https://www.academia.edu/35051836/2017_Pratish_Khedekar_%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0_%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80_%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%87_Navies_of_Marathas_Jawhar_Vaibhav_Weekly_-_Diwali_Special_Edition_Oct_2017_Jawhar_Pg_45-48


छायाचित्रे:
जंजिरे वसई, सन १७८०, सबह्र ब्रिटीश लायब्ररी
जंजिरे कोलाबा, सन १८५५-१८६२ मधील छायाचित्र
जंजिरे विजयदुर्ग, सन १८५५-१८६२ मधील छायाचित्र
जंजिरे सिंधुदुर्ग, साभार: श्री उद्धव ठाकरे.
तेरेखोलची खाडी,  साभार: timelinegoa.in

Sunday, January 14, 2018

डॉ. सचिन पेंडसे कालवश

डॉ. सचिन पेंडसे यांचे काल दिनांक १३ जानेवारी रोजी हार्टअटॅकने निधन झाले. ते ५६ वर्षांचे होते. 

डॉ. सचिन पेंडसे, "मराठा आरमार - एक अनोखे पर्व" च्या प्रकाशनावेळी
डॉ. पेंडसे हे मराठ्यांचे आरमार अर्थात नौदलाचे गाढे अभ्यासक होते. गेल्याच वर्षी त्यांचे या विषयावरील पहिले मराठी ग्रंथ "मराठा आरमार - एक अनोखे पर्व" प्रकाशित झाले, ज्याला महाराष्ट्र ग्रंथोज्जक संस्थेचा पुरस्कार सुद्धा मिळाला होता. यापूर्वी त्यांचे "मरिटाईम हेरीटेज ऑफ कोंकण" हे ग्रंथ कोंकणच्या सामुद्रिक इतिहासावर लिहिलेले एकमात्र ग्रंथ म्हणून प्रसिद्ध झाले होते.

डॉ. पेंडसे हे अंधेरी, मुंबई येथील तोलानी कॉलेज येथे सहयाय्क प्राध्यापक म्हणून अध्यापन करीत होते. ते मुंबई विद्यापीठातून भूगोलात पदव्युत्तर व विद्यावाचस्पती पदवीधर होते. 

भारतीय नौसेनेच्या पश्चिम कमांडच्या मरिटाईम हिस्ट्री सोसाईटी, इंस्टिट्यूट ऑफ डिफेन्स स्टडीज अँड अॅनॅलिसीस, नॅशनल मरिटाईम फाउंडेशन व कोंकण इतिहास परिषदेचे आजीवन सभासद होते. यांनी लिहिलेले अनेक शोधनिबंध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पत्रिकांमध्ये प्रसिद्ध झालेले आहेत.
प्रख्यात सामुद्रिक इतिहास अभ्यासक व मुंबई विद्यापीठाचे भूगोल विधागाचे माजी-प्रमुख बी. अरुणाचलम यांच्या सोबत यांनी "Maritime Heritage of Goa and Uttar Kannada" सारखे अभ्यासपूर्ण ग्रंथ लिहिलेले आहेत.  तसेच, मरिटाईम हिस्ट्री संस्थेच्या "एस्सेस इन मरिटाईम स्टडीज" याच्या ३ ऱ्या खंडाचे संपादन सुद्धा यांनी केले आहे.

फ्रेंच सरकार व पॅरीस विद्यापिठाच्या संयुक्त विद्यमाने प्रणीत Association Oceanides (आसोसिआस्यों ओसानिदे) या जागतिक सामुद्रिक इतिहास प्रकल्पात "मराठा आरमार" व "पारंपारिक भारतीय जहाज बांधणी" या विषयावर लेखन केलेले आहे.

अमेरिकेच्या आरमारी युद्ध महाविद्यालयात (Naval War College) "मराठ्यांचा आरमारी लढा" (Maratha Naval Resistance) या विषयावर व्याख्यान दिले आहे. या व्यतिरिक्त त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर ८ व राष्ट्रीय स्तरावर ५ परिसंवादात सहभाग घेतला होता.

डॉ. पेंडसे यांच्या जाण्याने मराठा आरमार अभ्यासाच्या क्षेत्रात एक न भरून येणारी पोकळी निर्माण झालेली आहे. 

Thursday, February 9, 2017

The Mahrattas have become a maritime power

I recently came across a book, "A New System of Modern Geography AKA A New Geographical, Historical, and Commercial Grammar and the Present State of the Several Kingdoms of the World."It was originally written by William Guthrie, a Scottish journalist, in 1770 shortly before he passed away. The book is a "General Knowledge" compendium of sorts. It tries to touch upon varied subjects, as they were known back then.The edition which I came across was sixth and was printed in 1792.

Although the book is unknown today, it has had it's glory days. It met the needs of many readers for no fewer than eight decades, and has run through at least thirty editions - involving many corrections, excisions and additions.1 For a book on "Current Affairs" it managed to stay relevant for a surprisingly long period of time. Probably the British equivalent of Malayala Manorama yearbook.

William Guthrie himself was a prolific writer, translating Quintilian and Cicero from Latin. His historical writings include, ‘Complete List of the English Peerage’, ‘History of England from the Invasion of Julius Cæsar to 1688’ in four volumes, ‘A General History of the World, from the Creation to the Present Time,’ and ‘A General History of Scotland’.2
All surprisingly inaccurate, even by contemporary standards. To his credit, his History of England was the first attempt at using parliamentary records for writing history.
However, his greatest work remains "A New System..."

Which brings us back to...

In "A New System..." Mr. Guthrie describes what is now today's India as "The peninsula within the Ganges." He briefly summarizes the geographical and historical details, and then goes on to describe the political divisions of India.
It is here that he describes the "Mahratta States and their Tributaries." In "Southern Poona Mahrattas," which is his way of saying territories of Deccan, he gives the following description of Konkan.

"The Concan, or tract between the Ghauts and the sea, is sometimes called the Pirate Coast, as it was subject to the celebrated pirate Angria, and his successors, whose capital was the strong fortress of Gheria, taken by the English and Mahrattas in 1755. By the acquisition of this coast the Mahrattas have become a maritime power, and dangerous enemies to the government of Bombay."

Apart from the last line, this description is unchanged in the 1794, 1795, 1801 & 1808 editions.

The Twenty-first edition, published in 1808, appears to be the last time that the Marathas have been referred to as Maritime Power.

Student of Maratha history will know, that Angres were in fact Marathas, and had successfully dominated Western coast of India from 1700 - 1756. The fact that the Peshwa's fleet was considered a Maritime Power only goes on to increase this period of Maratha dominance to nearly hundred years.

However, between 1792 & 1794 much seems to have been changed. The line, " and dangerous enemies to the government of Bombay" is missing in 1794 and later editions.

As we do know, since the British allied with the Peshwa in 1755 to destroy Tulaji Angre, they had been on friendly terms. This friendship was broken by the British in 1775, when they commenced the first Anglo-Maratha war. The war ended in 1782, but a naval action in 1783 - where Anandrao Dhulap captured a British flotilla as well as some senior military officers on board - left the British with a bloody nose, not to mention the further complication of the ongoing peace negotiations. Since then, Marathas have been intermittently capturing British shipping on the high seas. Which is the reason why they've been declared "dangerous" and "enemies to the government of Bombay."
But these Adjectives are outdated for a Current Affairs book. For the Marathas were allies since 1790. And it was Tipu who was responsible for this rekindled Anglo-Maratha friendship. So the book is a few years late in dropping those adjectives.

I won't deny it, it feels good to read about the Mahrattas as Maritime Power. But what is equally interesting is how much the text relating to rest of India has changed, while this statement remained constant.

In 1792, "The New System..." begins the divisions of India as;
  1. British Possesions: Bombay, Bengal and Madras presidencies.
  2. Allies of the British. Avadh, Arcot & Fatehsingh Gaikwad of Baroda.
  3. Tippoo Saib's (Tipu Sultan's) territories
  4. Maratha States and their Tributaries are listed as;
    1. Southern Poona Mahrattas: Pune, Satara
    2. Berar Mahrattas: Nagpur, Balasore, Cuttack
    3. Northern Poona Mahrattas: Ujjain, Indore, Kalpi and Sagar.
    4. Surprisingly, Hyderabad is mentioned as a Tributary of Mahrattas.
  5. Other states & countries, viz., Abdali, Sikhs, Jats, Zabita Khan, Agra, Farrukhabad, Bundelkhand and Travancore.
By 1794, Marathas are third on the list minus Berar and Northern Poona Mahrattas, Nizam is mentioned independently, as an Ally, in the fourth heading, Next are Berar and Northern Poona Mahrattas, followed by Tippoo. The last item of Other states is unchanged.
That the Central & Eastern Indian Maratha states are being mentioned apart from the Maratha state shows the changing dynamic of Indian politics.
Similarly, the elevated status of Nizam as an Ally and the reduced status of Tipu reflect their political status in a changed India, or at least India as it was perceived in London.

By the time we come to 1808, the divisions of India only seem superfluous and/or pretentious. The mere mention of Peshwa and other Maratha chiefs seems to be a consolation.

Notes:
  1. Back then people used ridiculously long titles for books. Aspiring historians should learn to deal with it.
  2. It appears that new editions were printed yearly, however some editions were infrequent. There for some years we find different edition numbers. Eg., in 1792 we find both 5th and 12th edition, while in 1795 we find 6th and 15th.
Sources:
  1. http://www.tandfonline.com/doi/abs/10.1080/00369225608735629
  2. https://en.wikipedia.org/wiki/William_Guthrie_(historian)
  3. Editions
    1. 12th / 5th (1792)
    2. 14th (1794)
    3. 15th / 6th (1795)
    4. 18th (1801)
    5. 19th (1801)
    6. 21st (1808)

Saturday, July 25, 2015

जंजिरे सुवर्णदुर्ग आणि कान्होजी आंग्रे

जंजिरे सुवर्णदुर्ग.
साभार: विकिमिडिया कॉमन्स

मराठा आरमाराच्या इतिहासात सुवर्णदुर्गाचे अनन्यसाधारण महत्व आहे.
कान्होजी आंग्रेंचे वडील, तुकोजी आंग्रे, यांची नेमणूक इथेच होती. जवळच हरणई बंदरात कान्होजी आंग्रेंचा जन्म झाला होता.

कान्होजी आंग्रेंची पहिली नेमणूक सुद्धा याच किल्ल्यावर होती. इथेच ते आपल्या स्वकर्तुत्वाने किल्ल्याचे सरनोबत, म्हणजेच दुय्यम किल्लेदार, झाले.

पुढे संभाजी महाराजांच्या काळात सिद्दीच्या वेढ्याला तोंड देत कान्होजींनी किल्ला लढवला. फितूर होऊ पाहणाऱ्या किल्लेदारास कैद करून त्यांनी सिद्दीच्या फौजेवर धाड टाकण्यास सुरुवात केली.

अशाच एका धाडीत ते सिद्दींच्या तावडीत सापडले. पण पाहरेकऱ्यांच्या बेसावधपणाचा फायदा उचलून एका रात्री त्यांच्या कैदेतून फरार झाले, ते थेट सुवर्णदुर्गला पोहोचले.

त्यांच्या शौर्य आणि चिकाटीची कदर करून त्यांना सुवर्णदुर्गाची किल्लेदारी बहाल केली गेली.

सरखेल कान्होजी आंग्रे.
तैलचित्र, पुणे बोट क्लब.
पुढे कान्होजींची प्रतिभा, चिकाटी आणि कार्यक्षमता पाहून त्यांची बदली जंजिरे कुलाबा, म्हणजेच मराठा आरमाराच्या मुख्यालयात झाली. इथे ते सर-सुभेदार सिधोजी गुजर यांच्या हाताखाली काम करू लागले.

अशा प्रकारे या जंजिरे सुवर्णदुर्गाने कान्होजींच्या वाढत्या वर्चस्वाचा आणि त्यांच्या तरुण नेतृत्वाचा इतिहास आपल्यात दडवून ठेवला आहे.

Friday, May 1, 2015

बाजीराव पुण्यतिथी - Bajirao memorial day



थोरले बाजीराव पेशवे
आज वैशाख शुद्ध त्रयोदशि. म्हणजेच थोरले बाजीराव पेशवे पुन्यतिथि.
आजच्याच दिवशी शालिवाहन शके १६६२ साली (२८ एप्रिल १७४०) बाजीराव पेशवे यांनी रावेरखेडी या गावी आपली जीवनयात्रा संपवली.

नर्मदे पलीकडे जाउन खुद्द दिल्लीला धडक देण्याचे शिवछत्रपतींचे स्वप्न पूर्ण करणाऱ्या बाजीरावांचे आरमारी क्षेत्रात सुद्धा एक महत्वाचे योगदान होते. मराठ्यांचे आरमारी बळ वाढवण्याच्या हेतूने बाजीरावांनी अर्नाळा बेटावर नवीन आरमार उभारले. १७३७ साली उभारलेल्या या आरमाराचे पहिले सुभेदार बाजीराव तुळाजीराव बेळोसे.

त्यांच्या वीर स्मृतीस आमचे विनम्र अभिवादन.
भारतीय टपाल विभागानेछापलेले प्रथम दिवस आवरण

Thursday, April 16, 2015

Mathurabai Angre Samadhi - मथुराबाई आंग्रे यांची समाधी



मथुराबाई आंग्रे यांची समाधी. छत्रीबाग, शिवाजी चौक, अलिबाग.

सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या ज्येष्ठ पत्नी. आणि स्वराज्याच्या दोन सरखेलांची आई; सरखेल सेखोजी आंग्रे आणि सरखेल संभाजी आंग्रे.

Mathurabai Angre's Samadhi, Chhatribag, Shivaji Chowk, Alibag.

First wife of Sarkhel Kanhoji Angre. Mother to two Admirals of Maratha Navy - Sarkhel Sekhoji Angre & Sarkhel Sambhaji Angre.

Thursday, January 8, 2015

Galbat Sadashiv - गलबत सदाशिव

गलबत "सदाशिव", सरखेल सेखोजी आंग्रे यांच्या स्वारीचे गलबत.

भारत इतिहास संशोधक मंडळ, सदाशिवपेठ पुणे, येथील चित्रातील एक भाग.
गलबताखाली चित्रकाराची टिप्पणी असी...
"गलबत सदासीव खासा सेखो
जी बावाचे स्वारिचें ||"

=========
Galbat "Sadashiv", flagship of Sarkhel Sekhoji Angre.

From a painting at Bharat Itihas Sanshodhak Mandal, Sadashiv Peth, Pune.

Saturday, December 27, 2014

पद्मदुर्गावर जागर - शिवरायांची पालखीतून मिरवणूक.

मुरुड: महाड येथील कोकण कडा मित्रमंडळाच्या वतीने शिवशाहीचा साक्षीदार शिवरायांचा पद्मदुर्ग (कासा) किल्ल्यात पद्मदुर्गचा जागर केला. किल्ल्याची स्वच्छता करून फुलांनी सजवला. शिवप्रतिमेचे पूजन भिवंडी येथील शिवप्रेमी शेखरमामा फरमन यांनी सपत्नीक केले. बुरुजावरून शिवरायांची पालखी वाजतगाजत काढताना माजी नगराध्यक्षा कल्पना पाटील, नगरसेवक संदीप पाटील, सुरेश पवार, दीपक शिंदे व शेकडो शिवप्रेमी.

छायाचित्र - श्री सुधीर नाझरे.

Thursday, December 18, 2014

Books by Prof. B Arunachalam

Prof B. Arunachalam was a prolific writer. He had authored and edited as many as 12 books, primarily concerning maritime heritage of India. He has also written around 130 research papers on maritime studies in reputed national and international journals.

 Books

  1. The Indian Ocean and Its Islands: Strategic, Scientific and Historical Perspectives (1992),
  2. Essays in Maritime Studies (1998),
  3. Heritage of Indian Sea Navigation (2002),
  4. Chola Navigation Package (2004),
  5. Essays in Maritime Studies Vol II (2004),
  6. Mumbai by the Sea (2005),
  7. Navigational Hazards, Landmark and Early Charting Special Study of Konkan and South Gujarat (2007)
  8. Navigation Environment of Ancient and Mediaeval Ports of Tamilaham (2008),
  9. Indian Boat Designs and Forms (2009),
  10. Maritime Heritage of Southern Peninsular India (2010),
  11. Maritime Heritage of Lakshadweep and Minicoy Islands (2011), &
  12. Maritime Heritage of Goa and Uttar Kannada (2012).

Articles

  1. Indian prelude to British cadastral and revenue maps
    http://mycoordinates.org/indian-prelude-to-british-cadastral-and-revenue-maps/all/1/

The Chola Voyage Simulation, 2008.

INS Tarangini at Kochi
In 2008, Prof. B Arunachalam simulated a sea voyage undertaken thousands of years ago.

It was a simulation of a sea voyage of the Cholas, an attempt to test the practical utility of the Cholas' traditional observational skills.

The Maritime History Society, Mumbai organized a voyage expedition across Southern Bay of Bengal to test the practical utility of traditional observational skills and hand tools for an overseas parallel sailing adopted during Rajendra Chola's convoy voyages in 1022 AD. The voyage conceived by Prof. B. Arunachalam, and sponsored by the Maritime History Society was supported by Western and Southern Naval Commands of the Indian Navy.

The voyage was undertaken on board the Naval Sailing vessel INS Tarangini, and took off from Kochi port on 2nd January, 2008 in the forenoon.

The basic objectives of the Voyage were to test the success of the Chola voyage for the victorious conquest of the ruling powers in Sumatra and Malaya by using parallel sailing in low latitude using navigation stars in their azimuthal positions and during their movement across the skies.  The hand tools used were the Naligai Vattil, Ra-Palagai, and Tappu-palagai. Observation skills of the sky cover and sea-conditions, apart from elementary thumb rules using the palm and fingers.  The Voyage was set to commence after Ardra Darshan – festival of the East coast Siva temples in the early morning, about the time of setting of Ardra and Mrigasirish, the path finders on the western horizon. This festival coincides with the closure of the tropical cyclone season at the end of the Northeast Trade wind circuit in early December.

The plan was to sail from Nagapattinam in coastal Tamil Nadu, to Port Blair in the Andamans. However, owing to unexpected harsh weather, the vessel reached the eastern shores of Sri Lanka. Eventually, it reached Port Blair on January 18, after a detour through Sumatra caused by adverse wind conditions. 

The Maritime History Society (MHS) sailing team consisted of Cdr GVK Unnithan (Retd) along with Vivek Ganpule of the Tata Institute of Fundamental Research (TIFR) and Umesh Solapurkar of the Bhabha Atomic Research Centre (BARC) with Arunachalam and Cdr Mohan Narayan providing for ground monitoring. The ship was under Cdr Patankar's command.

The voyage also tested hand tools that were adopted by Rajendra Chola's convoy voyages in 1022 AD. Chola's voyages are also credited with concepts like that of parallel sailing (sailing parallel to the equator), which can only be practised in the Indian and Pacific oceans.

During almost half the duration of the voyage, the skies were overcast, making it extremely difficult for the navigators to follow paths as planned. Also, owing to an extended cyclonic season that extended to March, the leg of the journey from Nagapattinam to Vishakhapatnam had to be abandoned.

Prof. Arunachalam, choosing to be modest, said the simulation was only a partial success owing to bad weather conditions.

Saturday, July 5, 2014

जंजिऱ्याचे सिद्दी

जंजिऱ्याचे सिद्दी
- सु. र. देशपांडे

रायगड जिल्ह्यातील जंजिरा या भूतपूर्व संस्थानचे राज्यकर्ते-नबाब. पश्चिम किनाऱ्यावरील राजपुरी (दंडा-राजपुरी) खाडीच्या मुखाच्या पश्चिमेस सु. ०·५ किमी.वर एका अवघड गोलाकार खडकाळ बेटावर जंजिरा किल्ला चौल (उत्तर) व दाभोळ (दक्षिण) या प्राचीन बंदरांच्या मधोमध वसला आहे. त्याला मुरुड-जंजिरा असेही म्हणतात. जझीरा (बेट) या अरबी शब्दावरुन जंजिरा हे नाव रुढ झाले आहे. परकीय प्रवाशांच्या वृत्तांतांत त्याचा सिगेरस किंवा झिगेरस बंदर असाही उल्लेख आढळतो. मराठाकालीन कागदपत्रांत क्वचित हबसाण असाही याचा उल्लेख येतो. ते ॲबिसियन किंवा अबिशियन शब्दाचे अपभ्रंश रुप असावे. या किल्ल्याच्या तटबंदीची उंची १३ ते १५ मी. असून महादरवाजा हुलमुखनामक दोन बुरुजांमध्ये आहे. त्याच्या कमानीवर अरबीत कालोल्लेखाचा कोरीव लेख आहे. कोटाच्या तटाला दोन किंवा तीन मजली २७ मीटरच्या अंतराने बांधलेले २२ बुरुज आहेत. त्यांतून माऱ्याची जागा तसेच आतील बाजूस विश्रांतीची जागा आहे. त्यात दारुगोळा ठेवण्याची सोय होती. तटभिंतींच्या आतील बाजूस चहूबाजूंनी खंदक होता. बालेकिल्ल्यात शियापंथीय पीराचे पंचायतन स्मारक असून कार्तिक पौर्णिमेला जत्रा भरते. मुळात हे कोळ्यांचे जुने श्रद्घास्थान असून त्यास रामपंचायतन म्हणतात. जवळच सिद्दी घराण्यातील पुरुषांच्या-सरदारांच्या कबरी आहेत. कोटात चार मशिदी, तलाव, मोहल्ले, वाडे वगैरेंचे अवशेष आढळतात. याशिवाय तेथील तीन देशी व सहा विदेशी तोफा हे पर्यटकांचे आकर्षण होय. विदेशी तोफांत तीन स्वीडनच्या आणि स्पेन, नेदर्लंड्स (हॉलंड) व फ्रान्स यांची प्रत्येकी एक तोफ आहे. किल्ल्यात अनेक फार्सी शिलालेख असून १५७६-७७ च्या शिलालेखात निजामशहाच्या आज्ञेने फाहिमखानाची जंजिऱ्याचा मुख्याधिकारी म्हणून नेमणूक झाली आणि त्याने हा अभेद्य किल्ला व तटबंदी बांधली, असा उल्लेख आहे. अरबी समुद्राच्या पश्चिम किनाऱ्यावरील हा सुप्रसिद्घ किल्ला मराठे, डच, इंग्रज आणि ईस्ट इंडिया कंपनी यांच्या सैन्यांनी अनेकदा हल्ले करुनही अजिंक्य राहिलेला आहे. पंधराव्या शतकाच्या मध्यास ॲबिसिनिया व पूर्व आफ्रिकेतून पश्चिम भारतात लोक येऊ लागले. अरब-अल्-हबीश (हबश) येथून येणारे हे लोक हबशी म्हणून ओळखले जात. त्यांना सौदी असेही म्हणत. सय्यद वा सय्यदी (हजरत महंमदांचा वंशज) या नावाचा अपभ्रंश होऊन सिद्दी हा शब्द रुढ झाला असावा. हबशांना मुख्यतः गुलाम म्हणून पोर्तुगीजांनी हिंदुस्थानात आणले; तरी त्यांची निष्ठा, धैर्य व कार्यक्षमता यांमुळे बहमनी दरबारात त्यांना दर्जा लाभला. अल्पावधीत हबशी लोक हे पश्चिम भारतातील कुशल व धाडसी दर्यावर्दी आणि सैनिक म्हणून प्रसिद्घ झाले. ‘सेंटर फॉर सेल्युलर अँड मॉलिक्युलर बायोलॉजी’ हैदराबाद (दक्षिण) या संस्थेने सिद्दी जमातीचा सर्वंकष अभ्यास व संशोधन करुन ऐतिहासिक पुराव्यांशी सुसंगत काही निष्कर्ष काढले आहेत (२०११).

जंजिरा निजामशाहीच्या अखत्यारीत येण्यापूर्वीचा सुसंगत इतिहास उपलब्ध नाही. येथे पूर्वी कोळ्यांची वस्ती होती. दर्यावर्दी चाचे व लुटारुंपासून संरक्षण व्हावे, म्हणून त्यांनी या सुरक्षित बेटावर लाकडी मेढेकोट बांधला होता. बहमनी सुलतानांच्या कारकीर्दीत जुन्नरचा सुभेदार मलिक अहमद याने १४८२-८३ दरम्यान किल्ल्याला वेढा दिला; पण यश मिळाले नाही. बहमनी सत्तेच्या विभाजनानंतर मलिक अहमद या निजामशाहीच्या पहिल्या सुलतानाने १४९० मध्ये जंजिरा जिंकून कोळ्यांना ठार केले. किल्ल्याची डागडुजी करुन याकूतखान या हबशी आरमार प्रमुखाच्या तो ताब्यात दिला. दुसऱ्या एका प्रवासवर्णनातील वृत्तांतानुसार (क्लूनची इटिनेररी) पेरिमखान नावाच्या सिद्दीने कोळ्यांना फसवून जंजीरा हस्तगत केला, असा उल्लेख मिळतो. पेरिमखान बारा वर्षे जंजिऱ्यावर होता आणि १५३८ मध्ये मरण पावला. लारकोमच्या माहितीनुसार अहमदनगरच्या बुऱ्हान निजामशहाने (१५०९— ५३) जंजिरा व दंडा-राजपुरीचा सुभा त्याचा इराणी शिया मंत्री शाह ताहिर याच्याकडे सोपविला; तथापि पेरिमखानानंतर आलेल्या बुऱ्हान या आरमार प्रमुखाने १५६७— ७१ दरम्यान हा बुलंद किल्ला बांधला असा उल्लेख मिळतो. त्याने त्यास ‘मेहरुब’ (चंद्रकोर) हे नाव दिले; मात्र तेथील उपलब्ध फार्सी शिलालेखात फाहिमखान याने १५७६-७७ दरम्यान किल्ला बांधल्याची नोंद आहे. पुढे १६०० मध्ये अकबराने अहमदनगर जिंकले, तरी लवकरच मलिक अंबरने (१५४९— १६२६) निजामशाहीचा बराच प्रदेश परत मिळविला. १६१८ मध्ये जंजिऱ्याचा सिद्दी सिरुर (सुरुल) हा निजामशहाकडून जहागीरदार म्हणून सनद घेऊन आला व त्याने स्वतःस जंजिरा संस्थानचा पहिला नबाब म्हणून जाहीर केले. त्यावेळी दंडा-राजपुरी हे मुख्यालय असून जंजिऱ्याच्या नबाबाच्या आधिपत्याखाली सावित्री नदीपासून नागोठाण्यापर्यंतचा मुलूख होता. त्याच्या जागी १६२० मध्ये सिद्दी याकुतखान आला. त्यानंतर १६२१ मध्ये सिद्दी अंबर नबाब झाला. मोगलांनी निजामशाही नष्ट करेपर्यंत (१६३६) दंडा-राजपुरीसह कुलाबा अहमदनगरच्या सुलतानांकडेच होता. मोगलांनी जंजिऱ्यासकट कोकणचा प्रदेश विजापूरच्या आदिलशाहीकडे सुपूर्त केला. त्याबरोबर सिद्दी अंबर विजापूरचा ताबेदार झाला. यावेळी जंजिरा संस्थानच्या सीमा वाढल्या होत्या. पूर्वेस रोहा-माणगाव तालुके, दक्षिणेस बाणकोटची खाडी, पश्चिमेस अरबी समुद्र व उत्तरेस रोह्याच्या खाडीपर्यंत ते विस्तारले होते. त्याचा उपयोग विजापूरचा सागरी व्यापार व मक्केसाठी जाणाऱ्या यात्रेकरुंना होऊ लागला. जंजिऱ्याच्या सिद्दी प्रमुखास आदिलशहाने वझीर किताब दिला. वझीर सिद्दी अंबर १६४६ मध्ये मरण पावला. त्याच्या जागी सिद्दी युसुफ नबाब झाला. त्याच्या मृत्यूनंतर (१६५५) फतेहखान वझीर झाला. यापूर्वी शिवाजी महाराजांनी जंजिरा घेण्याचे प्रयत्न केले होते. पण यश आले नाही. म्हणून १६७० मध्ये महाराजांनी जंजिऱ्यास खुष्कीच्या मार्गाने तसेच समुद्रमार्गे वेढा घातला. पोर्तुगीजांनी सिद्दीस गुप्तपणे दारुगोळा पुरविला; तरी महाराजांचे सैन्यबळ पाहून सिद्दी जंजिरा त्यांच्या स्वाधीन करण्यास राजी झाला. तेव्हा सिद्दी फतेहखानाच्या हाताखालील सरदार संबळ, कासिम व खैरियत सिद्दी यांनी विरोध करुन फतेहखानास कैद केले व लढा चालू ठेवला. त्यांनी मोगलांचे मांडलिकत्व स्वीकारुन मदत मागितली. सुरतच्या मोगल अधिकाऱ्याने ती दिली. औरंगजेबाने सिद्दी संबळ यास याकुतखाँ हा किताब दिला व त्यास सुरतच्या महालातून तीन लाखांची जहागीर दिली. त्यामुळे सिद्दी संबळ मोगल आरमाराचा प्रमुख झाला आणि सिद्दीचे वर्चस्व सुरतपर्यंत प्रस्थापित झाले. सिद्दी कासिम व सिद्दी खैरियत यांना अनुक्रमे मे जंजिरा आणि किनाऱ्यावरील दंडा-राजपुरी व अन्य प्रदेश देण्यात आले, त्यामुळे यावेळीही महाराजांना यश लाभले नाही. त्यानंतरही शिवाजी महाराजांनी १६७१, १६७३ व १६७६ मध्ये इंग्रज, पोर्तुगीज यांच्याबरोबर तह करुन जंजिरा घेण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. १६७६ मध्ये संबळ व कासिम यांत वैर निर्माण झाले. तेव्हा कासिमने नौदलप्रमुख पद मिळविले. शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर (१६८०) छत्रपती संभाजींनी जंजिरा घेण्याचा निकराचा प्रयत्न केला (१६८२); पण त्यांनाही ते जमले नाही. संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर (१६८९) रायगडसह अनेक किल्ले मोगलांच्या हाती आले. कान्होजी आंग्रे हा मराठ्यांच्या आरमारातील अत्यंत पराक्रमी व धैर्यवान नेता होता. १६९४ ते ९८ पर्यंत कोकणपट्टीतले मोगलांनी व इतरांनी काबीज केलेले मराठ्यांचे त्याने सर्व किल्ले परत घेतले गेले. कान्होजीच्या मोहिमेचे मुख्य ध्येय संभाजींच्या हत्येनंतरच्या संघर्षात सिद्दीने बळकावलेला मराठा प्रदेश पुन्हा मिळविणे हे होते. सिद्दी आणि पोर्तुगीजांनी आंग्रेच्या विरोधात मुघलांशी सलोखा केला; परंतु कान्होजीने या त्रयींचा पराभव केला. औरंगजेबाने सिद्दीने केलेल्या मदतीपोटी त्याला मराठ्यांची कोकणातील सर्व ठाणी दिली. मराठ्यांचे रायगड, सुवर्णदुर्ग, पद्मदुर्गासह अनेक किल्ले त्याच्या ताब्यात आले होते. सिद्दी घराण्यातील सिद्दी सात हा गोवलकोट व अंजनवेल किल्ल्यांवर मुख्य प्रशासक होता. महाराणी ताराबाईंच्या कारकिर्दीत रामचंद्रपंतांनी सिद्दीवर हल्ला केला (१७०१); परंतु यश आले नाही.

सिद्दी कासिम मरण पावल्यावर (१७०७) पद्मदुर्गाचा किल्लेदार सिरुरखान त्याच्या जागी आला. त्याच्या मृत्यूनंतर (१७३४) सिद्दी रेहमान जंजिऱ्याचा नबाब झाला. १७३९ मध्ये हुसेनने त्यास पदच्युत करुन नबाबी मिळविली. तत्पूर्वी सिद्दी सात या शूर, मर्द व राजकारणी सेनापतीचा चिमाजी आप्पांनी पराभव करुन त्यास रेवासजवळ चरईच्या लढाईत ठार केले. त्याच्या सोबतच्या या लढाईत (१७३६) देवकोंड नाईक, सुभानजी घाटगा, फाईम, बाळाजी शेणवी वगैरे जंजिऱ्याचे मातब्बर सरदारही मारले गेले. हुसेन सिद्दीनंतर (१७४५) सय्यद अल्लाना गादीवर आला; पण त्यास सिद्दी इब्राहिमने पदच्युत करुन (१७४६) गादी बळकाविली.

मिया आचन सिद्दी १७४८ मध्ये जंजिऱ्याचा प्रशासक बनला. पुढे १७५१ मध्ये सिद्दी मसूदने त्यास घालविले. मसूद वारल्यानंतर (१७५६) बरेच सिद्दी बदलले. मराठ्यांविरुद्घ इंग्रज सतत सिद्दीस मदत करीत, तसेच गोव्याचे पोर्तुगीजही, त्यांना दारुगोळा व शस्त्रसामग्री पुरवीत असत. तथापि या दोन्ही परकीय सत्तांना जंजिऱ्यावर वर्चस्व मिळविता आले नाही. सिद्दी घराण्यात गादीवरुन अंतःकलह चालू झाले. त्याचा फायदा नाना फडणीसांनी १७९१ मध्ये घेऊन सिद्दी गादीचा एक हक्कदार बालूमिया याला सुरतेजवळची सचिनची जहागीर देवविली व जंजिऱ्याचा करार केला; पण पेशवे प्रत्यक्ष जंजिऱ्याचा ताबा मिळवू शकले नाहीत. त्या वेळचा जंजिऱ्याचा नबाब सिद्दी जोहर इंग्रजांना शरण गेला. पेशवाईच्या अस्तानंतर (१८१८) इंग्रजांनी जंजिऱ्यावर वर्चस्व प्रस्थापित करुन १८३४ मध्ये त्यास मांडलिक केले. तेथील टांकसाळ बंद केली. सिद्दी मुहम्मद याने १८४८ मध्ये राज्यत्याग करुन सिद्दी इब्राहिम या मुलास गादीवर बसविले. १८६७ मध्ये जंजिऱ्याचा नबाब व तेथील सरदार यांत तीव्र मतभेद निर्माण झाले. इंग्रजांनी तेथील नबाबाला पदच्युत करुन (१८६९) तिथे इंग्रज रेसिडेंट नेला. पुढे नबाबाने इंग्रजांशी करारनामा केला. तेव्हा त्याचे पद चालू ठेवले, पण अधिकार कमी केले. सिद्दी इब्राहिम खान १८७९ मध्ये मरण पावला. त्याच्या तीन मुलांपैकी (पहिले दोन अनौरस व धाकटा औरस) धाकट्या अल्पवयीन सिद्दी अहमद खान या मुलास इंग्रजांनी गादीवर बसविले. त्याने राजकोट-पुण्याला शिक्षण घेऊन सज्ञान झाल्यावर त्याच्याकडे इंग्रजांनी राज्यकारभार दिला. त्याने संस्थानात शाळा काढली. मुरुडचे जंगल तोडून रस्ते केले. १८९२ मध्ये पिण्याच्या पाण्यासाठी व्हिक्टोरिया ज्युबिली वॉटर वर्क्स ही योजना राबविली. शिवाय नगरपालिका आणि लोकल बोर्डाची स्थापना करुन पायाभूत सुविधा निर्माण केल्या. या त्याच्या कार्याविषयी ब्रिटिशांनी त्यास के. सी. आय्. ई. हे बिरुद बहाल केले. त्यास ७०० लोकांचे संरक्षक दल ठेवण्याची मुभा होती. भारतीय स्वातंत्र्यानंतर (१९४७) जंजिरा संस्थान भारतीय संघराज्यात विलीन झाले (१९४८) व ते मुंबई राज्यात समाविष्ट करण्यात आले.

सिद्दी लोक पराक्रमी, लढवय्ये होते, त्याचबरोबर उत्तम खलाशी होते. मलिक अंबर, मलिक काफूर, मलिक याकुब, फतेहखान, सिद्दी संबळ, याकुबखान, सिद्दी कासीम, सिद्दी मसूद, सिद्दी सात, सिद्दी खान, सिद्दी सुभान इ. अनेक सरदार हुशार, बुद्घिमान आणि लढवय्ये म्हणून विख्यात होते. अरबी समुद्रात मोठ्या प्रमाणात चाचेगिरी करण्याचा त्यांचा उद्योग होता.

पहा : जंजिरा संस्थान.

संदर्भ :
१. केळकर, य. न. इतिहासातील सहली, पुणे, १९५१.
२. देवळे, श. रा. महाराष्ट्रातील किल्ले, पुणे, १९८१.
३. पुरोहित, श्री. रा. किल्ले जंजिरा, भारतीय इतिहास आणि संस्कृती, त्रैमासिक, १ एप्रिल १९६९, मुंबई.
४. बेंद्रे, वा. सी. जंजिरेकर सिदी; शिवाजी निबंधावली, भाग २, पुणे, १९३४.
५. भोसले, बा. के. जंजिरा संस्थानचा इतिहास, बडोदे, १८९८.
६. सरदेसाई, गो. स. मराठी रियासत (सुधारित आवृत्ती), खंड १ ते ३, मुंबई, १९८८ व १९८९.

http://marathivishwakosh.in/khandas/khand19/index.php?option=com_content&view=article&id=10404

Thursday, June 26, 2014

Battle of Satavli - सातवलीची लढाई

१६७१ पासून सिद्दीने घेतलेला आक्रमक पवित्रा वाढतच चालला होता. दंडाराजपुरीच्या विजयानंतर खुद्द आलमगीर-औरंगजेबाने सिद्दीच्या डोक्यावर हात ठेवला होता. सिद्दी संबूल हा मुघलांचा आरमारी सुभेदार झाला. म्हणजेच अमीर अल बहऱ्र.

त्याने दाभोळ आणि नागोठणे सारखी संपन्न शहरे बेचिराख केली. तर केळशी येथील मराठ्यांच्या आरमाराची एक संपूर्ण तुकडीच जाळून राख केली.

आलमगीराचे द्रव्य आणि सिद्दींचा आरमारी हुन्नर, या संयुक्त बळापुढे नवख्या मऱ्हाटी आरमाराचे काय होणार हा प्रश्न सर्वांसमोर उभा होता.

आता सगळं काही एका निर्णायक लढाईच्या निकालावर अवलंबून होते.

त्यात सन १६७४ उजाडले. महाराजांनी रायगडावर राज्याभिषेक करून घेण्याचा निर्णय केला होता. पण जंजिरा हा रायगडापासून एका मजलीच्या अंतरावर होते. त्यामुळे सिद्दीचा धोका दूर करणे महत्वाचे होते.

महाराजांनी नेमके काय केले हे इतिहास सांगत नाही. पण मार्च १६७४ मध्ये इतिहासाची दिशा काही अशाप्रकारे बदलली.

मुचकुंदीच्या खाडीत (आजच्या पूर्णगड किल्ल्या समोर), आणि सातवली नावाच्या छोट्या कसब्याजवळ, सिद्दी संबूल आणि दौलतखान यांची दर्या गाजवणारी लढाई झाली.

दोन्ही बाजूंनी पराक्रमाची शर्थ झाली. सिद्दी संबूल आणि दौलतखान जातीने आपल्या आरमाराचे नेतृत्व करत होते. एकमेकांवर बाणांचा वर्षाव करून दोन्ही आरमार हातात तलवारी घेऊन भिडले.

मराठ्यांची ४४ माणसे कामी आली. तर खुद्द दौलतखानाच्या पायाला बाण लागून तो जखमी झाला.
पण सिद्दीचा दारूण पराभव झाला.
सिद्दी कडील १०० माणसे मेली, तर सिद्दी संबूलच्याच गलबताला आग लागली. यात त्याचे दोन्ही हात भाजले.

संबूलने इथून जो पळ काढला तो थेट हरीहरेश्वरला पोहोचल्यावरचं थांबला.

एकाप्रकारे दौलतखानाने महाराजांना राज्याभिषेकासाठी दिलेला नजराणाच हा.

या लढाईमुळे मराठ्यांना राजापूर ते बारदेश हा पूर्ण तळकोंकण प्रांत, सिद्दीची चिंता न करता, जिंकता आला.

राज्याभिषेकाला त्रास देणे सोडाच, उलट सिद्दीने परत आलमगीरकडे कुमक पाठवण्याची केविलवाणी विनंती सुरु केली. आणि चक्क सप्टेंबर १६७५ पर्यंत, म्हणजे दीड वर्ष, कोणत्याही प्रकारे मराठ्यांच्या नादी लागला नाही.

Sunday, June 1, 2014

आंग्रे घराणे

आंग्रे घराणे
- सु. र. देशपांडे.

मराठ्यांचा इतिहास घडविणाऱ्या प्रसिद्ध घराण्यांपैकी एक. पुणे जिल्ह्यातील काळोसे हे आंग्रे घराण्याचे मूळ गाव व शखपाळ-शंकपाळ-संकपाळ हे त्यांचे मूळ आडनाव; परंतु आंगरवाडी ह्या काळोसेतील एका छोट्या भागावरून त्यांस पुढे आंग्रे हे उपनाव प्राप्त झाले. सेखोजी हे या घराण्यातील पहिले ज्ञात पुरुष. त्यांचे चिरंजीव तुकोजी हे उत्तर कोकण काबीज करीत असता शहाजींनी चौलजवळ १६४० मध्ये जी दर्यावरील लढाई केली, तीत प्रथम प्रसिद्धीस आले. १६५९ मध्ये ते शिवाजीच्या पदरी गेले. त्यांस मराठी आरमारातील २५ असामींची मुखत्यारी होती. पुढे ते आपल्या कर्तबगारीने सरनौबतीच्या हुद्द्यापर्यंत चढले. १६८०त तुकोजींचे निधन झाल्यावर त्यांचा मुलगा कान्होजी  ह्यांनी त्यांचे कार्य पुढे चालू ठेवले. कान्होजी हेच आंग्रे घराण्यातील सर्वांत कर्तबगार पुरुष आणि आंग्रे घराण्याचे खरे संस्थापक होत.

छत्रपती संभाजींच्या वधानंतर छत्रपती राजाराम ह्यांस जिंजी येथे जावे लागले. त्या सुमारास कान्होजींचा पराक्रम कोकणपट्टीवर दिसू लागला. १६९४–१७०४च्या दरम्यान त्यांनी पश्चिम किनारपट्टीतील मोगलाकडे गेलेले मराठ्यांचे सर्व किल्ले परत घेतले; शिवाय कुलाबा जिंकून त्यास आपले प्रमुख ठिकाण केले व त्यांनी  “आपण कोकणकिनाऱ्याचे राजे” अशी घोषणा केली. छत्रपती राजाराम ह्यांनी त्यांची ही कामगिरी व पराक्रम लक्षात घेऊन त्यांस मराठी आरमाराचे आधिपत्य देऊन सरखेल हा किताब दिला. राजारामांच्या मृत्यूनंतर त्यांची पत्‍नी ताराबाई ह्यांनी कान्होजींस आपल्या पक्षात सामील करून घेऊन त्यांस राजमाचीचा किल्ला व भिवंडी प्रांताचा बंदोबस्त करण्यास दिला आणि सरखेल हा किताब कायम केला. पुढे १७०७ मध्ये छत्रपती शाहू  हे मोगलांच्या कैदेतून सुटून आल्यानंतर छत्रपतींच्या गादीबद्दल ताराबाई व शाहू ह्या उभयतांत वाद निर्माण झाला. पण अखेर शाहूंची सरशी होऊन सातारची छत्रपतींची गादी शाहूंस मिळाली. नंतर शाहूंनी कान्होजींवर बहिरोपंत पिंगळे ह्या आपल्या पेशव्यास धाडले. परंतु त्याचा काही उपयोग न होता तो कान्होजींच्या कैदेत मात्र पडला. तेव्हा शाहूंनी बाळाजी विश्वनाथ व कान्होजी ह्यांचे पूर्वीचे मैत्रीचे संबंध लक्षात घेऊन बाळाजीविश्वनाथह्या आपल्या पेशव्यास त्यांविरुद्ध धाडले. बाळाजींने कान्होजींबरोबर तह करून त्यांस शाहूंच्या पक्षात सामील करून घेतले आणि त्यांस काही मुलुख, सरखेलपद आणि मराठी आरमाराचे आधिपत्य शाहूंकडून देवविले. ते अखेरपर्यंत, म्हणजे १७२९ पर्यंत शाहूंच्या पक्षात होते.

कान्होजींनी  मराठ्यांचे आरमार वृद्धिंगत आणि कार्यक्षम केले. त्यांच्या कारकिर्दीत कोणपपट्टीत इंग्रज, फ्रेंच, पोर्तुगीज वगैरे परकीय किंवा सिद्दी यांसारख्यांवर मराठ्यांचा वचक होता. कान्होजींची जहाजे त्रावणकोर-कोचीनपासून उत्तरेस सुरत-कच्छपर्यंत निर्वेधपणे समुद्रातून संचार करीत. कान्होजींनी कुलाब्यास जहाजे बांधण्याचे काम सुरू करून जहाजबांधणीधंद्यास उत्तेजन दिले होते. त्यांनी मराठेतर जहाजांना सुरक्षिततेची हमी म्हणून काही कर घेऊन परवाने देण्याचा यशस्वी उपक्रम यूरोपीय सत्ताधाऱ्यांप्रमाणे चालू केला. त्यामुळे मराठ्यांचा व्यापार वाढला आणि मराठी सत्तेचा मान द्दढावला.

कान्होजींस सेखोजी, संभाजी, मानाजी, तुळाजी, येसजी व धोंडजी असे सहा पुत्र झाले. कान्होजींच्या मृत्यूनंतर त्यांचे ज्येष्ठ पुत्र सेखोजी हे सरखेल (१७२९–३४) झाले. ह्या वेळी सिद्दीसाताने ब्रह्मेंद्रस्वामींचे परशुरामक्षेत्र उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्‍न केला. तेव्हा सिद्द्याचे पारिपत्य करण्यासाठी पहिले बाजीराव कोकणात उतरले. त्यास सेखोजींनी मदत केली. त्यांनी पेशवे व छत्रपत्ती ह्या दोघांशी सलोखा ठेवून आरमाराची वृद्धी केली. पण ते १७३३ मध्ये निधन पावल्यावर आंग्रे घराण्यात अंत:स्थ कलह सुरू झाला. संभाजी व मानाजी या भावांत सरखेलीबद्दल वितुष्ट निर्माण होऊन त्याचा परिणाम साहजिकच सिद्दी, इंग्रज, पोर्तुगीज इत्यादींवरील मराठ्यांचा वचक कमी होण्यात झाला. दोघेही आपले स्वार्थ व सत्ता वाढविण्याच्या मागे लागले. त्यामुळे परस्परांविरुद्ध दोघेही परकीयांची मदत घेऊ लागले. म्हणून पहिले बाजीराव ह्यांनी ह्या भांडणात मध्यस्थी करून १७३५ मध्ये संभाजींस सरखेल हा किताब व सुवर्णदुर्ग आणि मानाजींस वजारत-म्-आब हा किताब व कुलाबा देऊन दोघांना खूष करण्याचा प्रयत्‍न केला. मात्र त्यामुळे मराठी आरमारात दोन सत्ताधारी निर्माण झाले. संभाजी १७४२ मध्ये मरण पावले. त्यांस मुलगा नसल्यामुळे त्यांचा दुसरा सावत्र भाऊ तुळाजी सुवर्णदुर्गाचे अधिपती (१७४२–५६) झाले. त्यांच्या आरमारात ७४ तोफांचा गुराब, २० ते ३० टनी ८ गुराब व ६० गलबते होती. त्यांनी इंग्रज पोर्तुगीजांची अनेक जहाजे पकडली व त्यांना आपले परवाने (दस्तक) घ्यावयास भाग पाडले. सिद्दीचे अजिंक्य समजले जाणारे गोवळकोट व अंजनवेल किल्ले जिंकले व सर्वत्र दरारा निर्माण केला, पण त्यांचे पेशव्यांशी कधीच पटले नाही. त्यांनी प्रतिनिधी, अमात्य, सावंतवाडीकर, कोल्हापूरकर इत्यादींच्या प्रदेशावर अनेक वेळा आक्रमणे केली, शिवाय पेशव्यांविरुद्ध ताराबाईंशी संधान बांधले. तेव्हा पेशव्यांनी इंग्रजांच्या मदतीने १७५६ मध्ये त्यांवर विजयदुर्ग इथे चढाई केली. तीत तुळाजींचा पराभव होऊन पेशव्यांनी त्यांस कैद केले; आणि इंग्रजांनी सदर चढाईत तुळाजींचे आरमार जाळले. ह्यामुळे मराठी आरमार पुढे कायमचे खच्ची झाले. तेव्हा पेशव्यांनी स्वतचे आरमार उभे केले. कान्होजींनंतर तुळाजींइतका पराक्रमी पुरुष आंग्रे घराण्यात पुढे झाला नाही.

ह्यापूर्वी व ह्या सुमारास मानाजी आंग्रे मात्र पेशव्यांस सर्वतोपरी मदत करीत होते. त्यांनी १७३७–३९च्या मराठे-पोर्तुगीज युद्धात पोर्तुगीजांची समुद्रात नाकेबंदी करून त्यांना जेरीस आणले; आणि पुढे १७४० मध्ये तर मानाजींनी पोर्तुगीजांच्या आरमाराचा धुव्वा उडविला. सिद्दीविरुद्धच्या मराठ्यांच्या लढाईत मानाजींनी पेशव्यांस साहाय्य केले. १७५५ मधील उंदेरीच्या मोहिमेत पेशव्यांच्या मदतीला मानाजी गेले होते. या संधीचा फायदा घेऊन सिद्दींचा सरदार आबाजी घाटगे ह्याने आंग्र्यांच्या मुलुखावर स्वारी केली. त्यामुळे मानाजी तातडीने कुलाब्यास आले आणि सिद्द्यांची कायमची खोड मोडण्याचा त्यांनी निर्धार केला. त्यांच्यानंतर त्यांचे ज्येष्ठ पुत्र रघोजी यांनी हे कार्य पुढे तडीस नेले. मानाजींनी  आपल्या मनमिळाऊ व साहाय्य करण्याच्या प्रवृत्तीमुळे छत्रपती व पेशवे ह्या दोघांकडे आपले चांगलेच वजन निर्माण केले होते. ते १७५९ मध्ये मरण पावले.

तुळाजी व मानाजी ह्यांच्या नंतर रघोजी हा मानाजींचा ज्येष्ठ पुत्र सरखेलपदावर आला (१७५९–९३). ह्या सुमारास अलिबागच्या उत्तरेकडील पूर्वपश्चिमपट्टी आंग्रे व पेशवे ह्यांच्या संयुक्त अंमलाखाली होती. फक्त जंजिरकर सिद्दी यांचा उंदेरीचा भाग त्यात समाविष्ट नव्हता. सिद्दीच्या उंदेरी येथे झालेल्या संपूर्ण पराभवानंतर तो पेशव्यांनी घेतला आणि त्यास ‘जयदुर्ग’असे नाव देऊन तिथे आपला अंमलदार नेमला. ही एवढी घटना सोडता रघोजींची उर्वरित कारकीर्द शांततेची गेली. मात्र इथून पुढे आंग्रे हे केवळ एक नामधारी सरदार राहिले.

दुसरे मानाजी हे रघोजींचे ज्येष्ठ पुत्र रघोजींच्या मृत्यूनंतर सरखेल झाले (१७९३–९९). अल्पवयीन असल्यामुळे त्या वेळी त्यांचा सावत्र भाऊ जयसिंगराव ह्यांना पेशव्यांनी कुलमुखत्यार म्हणून नेमले. अर्थात ही गोष्ट मानाजींची आई आनंदीबाई ह्यांना खपली नाही. त्यांनी जयसिंगरावांस मारण्याचा कट रचिला. साहजिकच उभयतांत यादवीस सुरुवात झाली. पुणे दरबारने एकंदरीत सर्व राजकीय परिस्थिती पाहून मानाजी ह्यांना साहाय्य करण्याचे ठरविले. तेव्हा जयसिंगरावांनी आलीजाह बहादुर शिंदे लष्करकर यांच्याकडे मदतीची याचना केली. शिंद्यांकडून जयसिंगरावास मानाजी व पेशवे ह्यांच्या विरुद्ध मदत म्हणून पहिले कान्होजी यांचा नातू (येसजीचा मुलगा) बाबुराव ह्यांना पाठविण्यात आले. प्रथम बाबुरावांनी जयसिंगरावांना मदत केली परंतु कुलाबासंस्थानची तत्कालीन राजकीय स्थिती लक्षात घेऊन जयसिंगराव व मानाजी ह्या दोघांस बाजूस सारून बाबुराव आपणच सरखेलपदी चढले (१७९९–१८१३). दरम्यान पेशवाई खिळखिळी होऊन अंत:स्थ कलहाला सुरुवात झाली होती. बाबुरावांच्या कारकिर्दीत सकवारबाई (जयसिंगरावांची पत्‍नी) हिचे बंड सोडले, तर इतर सर्व कारकीर्द गेली. त्यांनी अनेक लोककल्याणाची कामे केली व संस्थानातील दंगेधोपे शमविले. बाबुराव जामगाव (अहमदनगर) मुक्कामी मरण पावले. नंतर विनायक परशुराम ह्या दिवाणजींच्या मध्यस्थीने दुसरे मानाजी पुन्हा सरखेलपदी आले (१८१३–१७). पण पुढे मानाजी व दिवाणजी यांच्यात वितुष्ट आले. लवकरच दुसरे मानाजी निधन पावले. त्यांच्यानंतर दुसरे रघोजी ह्या मानाजींच्या मुलास सरखेलीची वस्त्रे दुसरे बाजीराव पेशवे यांजकडून मिळाली (१८१७–३८). हा काल मराठी सत्तेच्या धामधुमीचा व अवनतीचा होता. तथापि रघोजींनी अत्यंत शांततेने संस्थानचा कारभार केला व संस्थानची आबादानी केली. १८२२च्या इंग्रजांबरोबरच्या तहामुळे रघोजींवर अनेक निर्बंध आले. ते १८३८ मध्ये कुलाबा येथे निधन पावले. त्यांना दोन मुलगे होते. त्यांपैकी एक रघोजींच्या अगोदर मृत्यू पावला व दुसरा रघोजींच्या मृत्यूनंतर जन्मास आला. त्यांचे नाव ‘कान्होजी’असे ठेवण्यात आले, परंतु ते अल्पवयीनच १८३९ मध्ये मरण पावले. त्यामुळे कंपनी सरकारने कुलाबा संस्थानाची जप्ती केली. १८३९–४४ ह्या अवधीत राण्यांनी दत्तक घेण्याबाबत खटपट चालविली होती, पण कंपनी सरकारने मयत दुसरे कान्होजी आंग्रे ह्यांस वारस नाही म्हणून १८४४ मध्ये कुलाबा संस्थान खालसा केले, आणि डेव्हिस ह्या इंग्रजी अधिकाऱ्यास दिवाण विनायक परशुराम ह्यांजकडून संस्थानच्या सर्व मालमत्तेचा ताबा घेण्यास फर्माविले.

कुलाबकर सरखेल आंग्रे यांची एक शाखा मूळ संस्थापक कान्होजी यांचे चिरंजीव येसजी यांच्या वेळेपासून ग्वाल्हेरास आहे. येसजींची मुलगी मैनाबाई ही त्या वेळी शिंदे घराण्यात दिली होती. हे शिंदे पुढे ग्वाल्हेरात संस्थानाचे अधिपती झाली. त्या वेळी सरखेलपद मिळण्याची संधी आपणास नाही असे पाहून येसजींचे मुलगे मावजी व बाबुराव हे बहिणीकडे जाऊन राहिले. बाबुरावांनी आपल्या सेनेसह शिंदे ह्यांना अनेक लढायांत मदत केली म्हणून आंग्र्यांना भोरासा, नेओरी आणि पानविहार हे भाग जहागीर म्हणून मिळाले. शिवाय सर्व लवाजमा व ‘वजारत-माब-सरखेल’ ह्या किताबात ‘सवाई’ हा आणखी एक किताब बहाल करण्यात आला. बाबुरावांस संतती नसल्यामुळे त्यांनी मावजी ह्या आपल्या भावाचा संभाजी हा मुलगा दत्तक घेतला व ते अलिबागेस परतले. ह्या वेळी माळव्यात अनेक उचापती व लूटमार चालू होती. ती संभाजींनी थांबवून ग्वाल्हेर संस्थानास हरएक प्रकारे मदत केली. म्हणून शिंद्यांनी आणखी काही मुलूख त्यांस दिला. संभाजींसही मुलगा नसल्यामुळे त्यांनी आपल्या मुलीचा मुलगा अप्पासाहेब (बाबुराव) हा १८३९ मध्ये दत्तक घेतला. संभाजी १८४६ मध्ये मरण पावले. बाबुरावांनी संस्थानात अनेक हुद्द्यांच्या जागांवर काम केले. त्यांनाही मुलगा नसल्यामुळे त्यांनी अलिबागकर आंग्रे घराण्यातील ‘त्र्यबकराव’ नावाचा मुलगा दत्तक घेण्याचे ठरविले, तथापि ते १८९१ मध्ये दत्तक घेण्यापूर्वी मृत्यू पावले. तेव्हा त्यांनी ठरविलेला दत्तक पुढे १८९२ साली घेण्यात येऊन त्याचे नाव ‘संभाजी ’ ठेवण्यात आले. त्यांना १८९६ मध्ये मुलगा झाला. हे चंद्रोजीराव व त्यांचे चिरंजीव संभाजीराव सध्या विद्यमान असून चंद्रोजीराव हे विद्वान, अभ्यासू व समाजकार्यकर्ते म्हणून प्रसिद्ध आहेत. संस्थानिकांच्या राजकारणात त्यांनी अनेक वेळा पुढाकार घेतला होता. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात ते हिंदुमहासभेचे अध्यक्ष होते.

संदर्भ : 1. Burrows, C. B., Pub. Representative Men of Central India, Bombay, 1902.
            2. Sen, S. N. The Military System of the Marathas, Calcutta, 1958.
            ३. ढबू, दा. गो. कुलाबकर आंग्रे सरखेल,  अलिबाग, १९३९.

Friday, May 30, 2014

भारतीय नौसेना १९४७ पर्यंत

तेराव्या शतकापासून ते इ. स.१९४७ पर्यंत भारताने नौसेनाक्षेत्रात महत्त्वाचे कार्य केले नाही. याची कारणे म्हणजे दीर्घकालीन पारतंत्र्य व जमिनीवर होणाऱ्या लढाया ही होत. आठव्या शतकापासून ते सतराव्या शतकाअखेरपर्यंत हिंदुस्थानावर खुष्कीच्या मार्गाने परकीय आक्रमणे झाली. पंधराव्या शतकाच्या अखेरीपासून पाश्चात्त्यांनी सागरामार्गे व्यापारी आक्रमणे करून शेवटी इंग्रजांनी हिंदुस्थानावर राज्य स्थापले. इ. स. पू. सु. सोळाव्या शतकापूर्वी म्हणजे आर्यांच्या आक्रमणापूर्वी सिंधू संस्कृतीचा सुमेर, अक्कड इत्यादींबरोबर सागरी व्यापार चाले. हा व्यापार निर्विघ्नपणे चालत असण्याचा संभव नाही; परंतु तत्कालीन नौसेना कशा असाव्यात, हे मात्र सांगता येत नाही. पुरातत्त्व उत्खननात सापडलेल्या मुद्रा व भांड्यांवरील नौकांच्या चित्रांवरून त्या काळी शिडांची जहाजे होती हे कळते. रामायणामध्ये (अयोध्याकांड ९५) नदीत लढणाऱ्या नौका व सेना यांचा उल्लेख आहे. महाभारतात नौसेना हे एक सेनांग आहे. ऋग्वेदामध्ये (मंडल १, ७ व १०) नौकांचे उल्लेख आहेत; परंतु त्यांचे स्वरूप कळत नाही. पुराण, जातक इ. वाङ्‌मयात नौका, सागरी व्यापार इत्यादींची वर्णने आहेत.

अर्थशास्त्रातील नावाध्यक्ष (२·२८) या प्रकरणात शत्रूच्या नौकांचा विध्वंस करावा असे म्हटले आहे; तथापि चाणक्याने नौसेनेचा उल्लेख केलेला नाही. पुराणांत व जातकादी वाङ्‌मयात नौका, नौकाबांधणी व पर्यटन यांचे उल्लेख आहेत. गुप्त, कलिंग, हर्ष, यादव, कदंब व शिलाहार इत्यादींच्या नौसेना असाव्यात. चौलांनी नाविक बळाचा उपयोग करून जावा, सुमात्रा व कंबोज या देशांत साम्राज्यविस्तार केला होता. अकबराच्या आइन-इ-अकबरीत मोगली नौसेनेची माहिती मिळते.

नौकाबांधणीबद्दल युक्तिकल्पतरु या मध्ययुगीन ग्रंथात माहिती मिळते. ज्या नौकांच्या लांबी-उंचीचे प्रमाण १० : १ व रुंदी-उंचीचे प्रमाण १·२५ : १ असते, त्या नौका अस्थिर असतात आणि ज्यांचे प्रमाण २ : १ व १ : १ असते, त्या संकट आणतात; असा इशारा देण्यात आला आहे. एकंदरीत नौशिल्पकल्पना अवास्तव वाटतात. संस्कृत ग्रंथ घटक-कारिका (१६ ते १८ वे शतक) व औरंगजेबकालीन फतिया-इ-इब्रिया या ग्रंथांत नौकांविषयी पुष्कळ वर्णने आहेत.

स्वतंत्र भारताच्या व पाकिस्तानच्या नौसेनांचे मूळ, १६१३ साली सुरत येथे ईस्ट इंडिया कंपनीने स्थापिलेल्या ‘हिंदुस्थानी मरीन’ (इंडियन मरीन) या नौदलात सापडते. अरबी समुद्रात चाचेगिरी चाले. या चाच्यांशी मुकाबला करता यावा म्हणून ५ सप्टेंबर १६१२ रोजी दोन शस्त्रास्त्रयुक्त व्यापारी जहाजे ब्रिटिशांच्या सुरत वखारीत दाखल झाली; हीच इंडियन मरीनची सुरुवात होय. इंडियन मरीनमध्ये गुरब व गलबते (सु. ७५ ते ३०० टनभाराची) पुढे आली. त्यात हिंदू कोळ्यांची नौसैनिक म्हणून भरती केली जाई. खंबायतचे आखात, तापी व नर्मदा यांच्या मुखाजवळील सागरीक्षेत्राचे रक्षण हे काम मरीनकडे होते. सुरत, अहमदाबाद आणि खंबायत येथे नाविक प्रशिक्षण दिले जाई. १६१५ पर्यंत १० गुरब आणि गलबते काम करीत. १६२२ मध्ये इराणी आखातातील ओर्मुझ बंदर ‘मरीन’ ने ताब्यात घेऊन चाचेगिरीला बराच आळा घातला. १६६४ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराशी इंडियन मरीनला लढावे लागले. ५ जानेवारी १६६४ रोजी शिवाजी महाराजांच्या सुरतवरील हल्ल्या मरीनने तोफा डागून फॅक्टरीचे रक्षण केले. १६७९ मध्ये खांदेरी बेटावर शिवाजींनी जलदुर्ग बांधून ब्रिटिश, सिद्दी व पोर्तुगीज यांच्या सागरी सत्तेवर दडपण आणले. खांदेरीवरून मराठा आरमाराला हुसकावून लावण्यात इंडियन मरीन व इतर अयशस्वी झाले. १६८३ मध्ये सुरत सोडून मुंबईत इंडियन मरीनचा तळ हलविण्यात आला व त्यास ‘बाँबे मरीन’ हे नवे नाव देण्यात आले. १६८६ ते १७३६ पर्यंत मराठा आरमार व बाँबे मरीन यांच्यात पश्चिम किनाऱ्यावरील वर्चस्वासाठी सागरी लढाया चालू होत्या. ब्रिटिश शाही नौसेना, सिद्दी व पोर्तुगीज यांचे साहाय्य बाँबे मरीनला जर मिळाले नसते, तर मराठ्यांनी सरखेल आंग्रे यांच्या नेतृत्वाखाली हिंदुस्थानच्या पश्चिम किनाऱ्यावर स्वामित्व स्थापले असते व हिंदुस्थानच्या इतिहासाला कदाचित निराळे वळण लागले असते. १६८० ते १७०७ या काळात मराठ्यांना जमिनीवर मोगलांशी निर्वाणीचा लढा द्यावा लागला, ही वस्तुस्थिती या संदर्भात महत्त्वाची ठरते. १७१६ च्या सुमारास बाँबे मरीनकडे २५ गुरब व गलबते होती. या नौकांवर एकूण ३८४ लहानमोठ्या तोफा होत्या. कमोडोर मॅथ्यूझ हा मरीनचा सरखेल होता. अठराव्या शतकात यूरोपात इंग्रज-फ्रेंच यांच्यामध्ये युद्धे चालू होती. त्यामुळे बाँबे मरीनची झपाट्याने प्रगती होत राहिली. १७३५ मध्ये मुंबईत हल्ली असलेल्या नाविक गोदीची बांधणी पुरी होऊन तेथे नौकाबांधणीस सुरुवात झाली. १७५० मध्ये सुकी गोदी तयार झाली. १७५१ मध्ये मरीनकडे ११ मोठ्या युद्धनौका, २५२ तोफा व पुष्कळ गलबते होती. १७४८ ते १७५६ च्या दरम्यान सरखेल संभाजी आंग्रे यांच्या मराठा आरमाराचा धुव्वा उडविण्यासाठी ब्रिटिशांनी फार प्रयत्न केले. आंग्रे यांचा वरचष्मा पेशव्यांना सहन होत नसे. नानासाहेब पेशव्याने जमिनीच्या बाजूने व बाँबे मरीनने सागरी मार्गाने धेरीया ऊर्फ सुवर्णदुर्गावर चढाई करून आंग्र्यांचा पराभव केला. या लढाईत ब्रिटिशांचे रॉबर्ट क्लाइव्ह व वॉटसन हे अधिकारी होते. पेशव्यांनी अदूरदर्शीपणाने ब्रिटिशांना पश्चिम किनाऱ्यावर सत्ता स्थापण्यास आणि मराठा साम्राज्याचा ऱ्हास करण्यात मदत केली. १७६१ च्या सुमारास बाँबे मरीनला नाविक गणवेष देण्यात आला. त्यातील अधिकारी इंग्रज असत. नौसैनिकांपैकी ७५% सैनिक कोकणी असत. मराठा आरमाराचा निकाल लावल्यावर हैदर अलीची बंदरे बाँबे मरीनने जिंकली. एकोणिसाव्या शतकारंभी जावा, सुमात्रा यांवर हल्ले करण्यात मरीन यशस्वी झाले. १७९८ मध्ये मुंबई येथे मरीन बोर्ड स्थापण्यात आले. बोर्डाच्या आज्ञेप्रमाणे सागरी वाहतुकीचे संरक्षण, मुंबई बंदरात जलमार्ग दर्शन, सागरी सर्वेक्षण व जलालेखन इ. कामे मरीनला देण्यात आली. काठेवाड, सिंध, मकरान किनारा व इराणी आखाताचे जलालेखन मरीनने केले. १८२४ मध्ये मरीनने ब्रह्मदेशावरील आक्रमणात भाग घेतला. १८२९ साली लष्करी कायदा लागू करून ‘बाँबे मरीन’ ला ‘मरीन कोअर’ नाव देण्यात आले. अमेरिकेत झालेल्या राज्यक्रांतीमुळे ब्रिटिशांना तेथील उत्तम प्रकारचे लाकूड मिळणे अशक्य झाले. जहाज बांधणीस मलबारी सागवान लाकूड उत्कृष्ट गणले जाते. परिणामतः मुंबई बंदरात जहाजबांधणीस चालना मिळाली. मुंबईच्या याट (खेळाच्या बोटींच्या) क्लबपाशी सुक्या गोदीत जहाजबांधणीसाठी तीन घसरमार्ग बांधण्यात आले. येथेच २,५९१ टनभाराची मिआनी युद्धनौका बांधण्यात आली. १८३० साली ‘मरीन कोअर’ हे नाव बदलून ‘इंडियन नेव्ही’ (हिंदी नौसेना) हे नाव देण्यात आले. २० मार्च १८३० रोजी मुंबई गोदीत बांधलेल्या व वाफेवर चालणाऱ्या ह्यू लिंडसे नौकेला समुद्रात सोडण्यात आले. शीडयुक्त जहाजांना समुद्रात ओढून नेऊन वाऱ्यात सोडण्यासाठी वाफेवर चालणाऱ्या जहाजांचा उपयोग होत असे. शिडाच्या जहाजांच्या अस्तास सुरुवात होऊन वाफेची जहाजे हिंदी नौसेनेत भरती होऊ लागली. नौकांचा टनभार (६००–७०० टनभार) वाढीस लागून सु. २०·३२ सेंमी. च्या (८ इंची) भारी तोफा प्रचारात येऊ लागल्या. १८३९ मध्ये एडन बंदर ईस्ट इंडिया कंपनीने काबीज केले. १८४३ च्या सुमारास हिंदुस्थानी नौसेनेत वाफेची ११ फ्रिगेट व इतर १५ युद्धनौका होत्या. १८४५ साली मुंबईपाशी बुचर बेटावर नाविक तोफखाना शाळा सुरू झाली. शीख-इंग्रज युद्धात नौसेनेत मुलतान मोहिमेत भाग घेतला. १८५२–५६ मध्ये ब्रह्मदेश व इराण-मोहिमांत कामगिरी केली. 

१८५७ च्या उठावात नौसैनिकांचा पायदळासारखा उपयोग झाला. एका हिंदी सैनिकाला व्हिक्टोरिया क्रॉस मिळाला. उठावाचा विलक्षण परिणाम म्हणजे हिंदी नौसेनेचे विघटन होऊन मुंबई व कलकत्ता मरीन अशी दोन बिनलढाऊ नौकादले संघटित झाली. तारायंत्राच्या तारा समुद्रात सोडणे व जलालेखन करणे ही कामे त्यांस देण्यात आली. १८७७ मध्ये महाराणीचे ‘इंडियन मरीन’ उभारले गेले. हेदेखील बिनलढाऊच होते. काही पाणतीर नौका मरीनला मिळाल्या. ईजिप्त व ब्रह्मदेश यांवरील आक्रमणात मरीनने वाहतुकीचे काम सांभाळले. १८९० मध्ये मुंबईत एक पाणतीर गोदी बांधण्यात आली. १८९२ मध्ये इंडियन मरीन नाव जाऊन ‘शाही हिंदी मरीन’ हे नाव मिळाले. १८९६ ते १९०४ या काळात पूर्व आफ्रिकेत व बोअर युद्धात या मरीनने बिनलढाऊ कामे केली. पहिल्या महायुद्धात मरीनच्या बिनलढाऊ नौकांचे हत्यारी नौकात रूपांतर झाले. या युद्धाच्या अखेरीस ५०० ब्रिटिश अधिकारी व १३,००० सैनिक मरीनच्या सेवेत होते. १९१८ साली लढाऊ कारवाया करण्यास मरीनला समर्थ करावे व त्यासाठी मरीनला युद्धनौका पुरवाव्या अशी ब्रिटिश शाही नौसेनेच्या कार्यालयाला अ‍ॅड्‌मिरल ऑफ द फ्लीट लॉर्ड जेलिकोने शिफारस केली; परंतु अ‍ॅड्‌मिरल मॉवबी याच्या नेमणुकीशिवाय दुसरी भरीव कामे पुढे ढकलण्यात आली. पुन्हा १९२५ मध्ये जनरल रॉलिन्सन, अ‍ॅड्‌मिरल सर रिचमंड व कॅप्टन हेडलम या तिघांच्या समितीने पुढीलप्रमाणे शिफारसी केल्या : मरीनऐवजी शाही हिंदी नौसेना नाव द्यावे. ४ स्लूप युद्धनौका, २ गस्ती, ४ ट्रॉलर, २ सर्वेक्षण व १ भांडार अशा १३ नौका नौसेनेत असाव्या इत्यादी. ११ नोव्हेंबर १९२८ रोजी शाही हिंदी नौसेना कार्यान्वित झाली. ध्वज ब्रिटिशांच्याच सेनेसारखा होता व त्यात एकही हिंदी अधिकारी नव्हता. सैनिक मात्र कोकणी व बंगाली होते. १९२८ साली केंद्रीय विधानसभेत हिंदी नौसेना-शिस्त कायदा विचारासाठी आला; पण तो एकमताने फेटाळला गेला. शेवटी ८ सप्टेंबर १९३४ रोजी कायदा संमत झाला व २ ऑक्टोबर १९३४ रोजी मुंबईत हिंदी नौसेना कायदेशीरपणे प्रस्थापित झाली आणि २,००० वर्षांच्या भारतीय सागरी परंपरेचे पुनरुज्जीवन घडून आले. १९३४ पासून आगामी यूरोपीय महायुद्धाची चाहूल लागली. अ‍ॅड्‌मिरल ऑफ द फ्लीट लॉर्ड चॅटफील्ड याच्या नौसेनासुधारणा शिफारशी तत्काळ मंजूर झाल्या. नौसेनेच्या वाढीस व आधुनिकीकरणास गती मिळाली. अ‍ॅड्‌मिरल सर हरबर्ट फिट्‌सहरबर्ट हे नौसेनापती झाले. राखीव व स्वयंसेवक दले उभारण्यात आली. उमेदवारांकरिता नाविक प्रशिक्षणाची सोय झाली. १९४५ अखेर हिंदी नौसेनेत १५ युद्धनौका (स्लूप, फ्रिगेट व कॉर्व्हेट) आणि ४५७ इतर पूरक नौका, ३,०४४ नाविकाधिकारी व २७,४३४ नौसैनिक होते. मुंबई, कलकत्ता, विशाखापटनम्, कोचीन व मद्रास येथे मुख्य नाविक तळ होते. विविध प्रकारच्या नाविक प्रशिक्षणाच्या संस्था पुढील ठिकाणी होत्या. पाणबुडी विरोधी अधिकारीप्रशिक्षण व संदेश दळणवळण संस्था, मुंबई; तोफखाना, कराची; अभियांत्रिकी, ठाणे व तुर्भे आणि लोणावळा; प्रशिक्षणव्यवस्था, मुंबई व कराची; रडार, कराची. दुसऱ्या महायुद्धात हिंदी नौसेनेच्या पठाण, पार्वती व सिंधू या तीन युद्धनौका कामास आल्या. १९४१ मध्ये मुंबईहून प्रमुख नौसेना कार्यालय दिल्लीला हलविण्यात आले. १८ फेब्रुवारी १९४६ रोजी मुंबई येथे नौसेनेने बंड पुकारले. युद्धानंतर नौसेनेत झालेली व होणारी सैनिककपात व भविष्यकाळाची काळजी ही बंडाची कारणे होती. हिंदुस्थानातील राजकीय असंतोषाची छायाही बंडवाल्यांवर पडली होती. शेवटी राजकीय पुढाऱ्यांनी सैनिकांची मने वळविली.

माहिती साभार : मराठी विश्वकोश

Saturday, May 24, 2014

Shaniwarwada by William Carpenter

Shaniwarwada by William Carpenter

Dated between Jun - Dec 1850

http://collections.vam.ac.uk/item/O108183/gateway-to-the-shanwar-palace-painting-carpenter-william/


Wednesday, May 21, 2014

RIP M P Anil Kumar

During 9th or 10th STD, in my English textbook, I had a chapter titled, Airborne to Chairborne.

It was an autobiographical account of a fighter pilot, who due to a tragic injury, became paralysed below his neck.

It was the most emotional prose I had ever read, and made me realise how life can turn in a second. But after the tears have been shed, your heart starts to glow. It was his will to live on which makes you realise something. No matter how harshly life treats you; You owe it to yourself, you owe it to your parents who sacrificed for you, and you owe it to every friend who believed in you, to get back up and keep on fighting.

Yesterday Flying Officer M P Anil Kumar took off on his final sortie into the sunset. Forever.

RIP Sir.
And thank you for inspiring millions like me.




Tuesday, May 20, 2014

गारगोटीयुक्त बंदुकीच्या काही भागांची नावे

गारगोटीयुक्त बंदुकीच्या काही भागांची नावे.

A. चाप - lock, इथे अर्थ "जबडा" असा आहे. चापात गारगोटी धरली जाते. तसेच याला अजून एक भाग आहे, फिरकी - screw, ज्याला फिरवून चापात ठेवलेली गारगोटी घट्ट केली जाते.
B. गारगोटी - flint. याचा वापर आगीच्या ठिणग्या काढण्यासाठी होतो.
C. घोडा - hammer/cock. (आणि आज आपण बंदुकीला घोडा म्हणतो :P )
D. चाप - trigger. लक्ष्य देण्यासारखी गोष्ट आहे की दोन वेगळ्या पुर्ज्याना एकच नाव आहे.
E. कमाण/(न) - spring. (अगदी घडाळ्याच्या स्प्रिंगला सुद्धा कमान म्हणतात)
F. पेला आणि कान - priming pan and touchhole.
बंदुकीच्या नळीतल्या दारूला पेट देण्यासाठी नळीला एक छोटं छिद्र कोरलं जातं. हा असतो "कान".
या कानाच्या समोर एक छोटंसं पोकळ भाग असतो, म्हणजेच "पेला". यात चिमुटभर दारू ठेवली जाते. पेल्यातली दारू पेटली की त्याची ज्वाला नळीत पोहोचते, आणि नळीतल्या दारूचा विस्फोट होतो.
G. नळी - barrel. बंदुकीची नळी. यात क्रमाने दारू आणि गोळी ठासली जाते.
H. याला Frizzen किंवा Steel म्हणत. याचं मराठी नाव मिळत नाही. इंग्रजी L आकाराचा हा पुर्जा आहे. याच्या उभ्या भागावर नेलकटर सारखे कानस(file) असते. यावर गारगोटी घासली की त्यातून निघणाऱ्या ठिणग्या पेल्यात पडतात. याच्या आडव्या बाजूचं काम पेल्याला झाकून त्यातील दारू खुश्क ठेवण्यापुरते होते.
टीप : चित्रामध्ये या Frizzenचा "L" आडवा पडला आहे.

Sunday, May 18, 2014

जुनी विक्रांत, नवी विक्रांत

जुनी विक्रांत, नवी विक्रांत

- विनायक तांबेकर

भारत-पाकिस्तानच्या १९७१च्या युद्धामध्ये महत्त्वपूर्ण कामगिरी बजावलेली 'विक्रांत' ही विमानवाहू युद्धनौका मोडीत काढली जाणार होती. परंतु, त्याला आता सर्वोच्च न्यायालयानेही स्थगिती दिली आहे. दुसरीकडे भारतीय नौदलाने नवी विक्रांत बनवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत. २0१७-१८मध्ये नवी आयएनएस विक्रांत नौदलात कार्यरत होईल. नवी विक्रांत पूर्वीच्याच दिमाखात पुन्हा एकदा नौदलाचे भूषण बनेल, यात शंका नाही.

भारतीय नौदलाची पहिली विमानवाहू नौका (एअरक्राफ्ट कॅरियर) आय. एन. एस. विक्रांत मोडीत निघण्याची चर्चा गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहे. १९७१ च्या भारत-पाक युद्धात महत्त्वाची कामगिरी बजावणारी 'विक्रांत' आता दिसणार नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. या युद्धनौकेवर इतिहासाला उजाळा देणारे संग्रहालय उभारावे, अशी कल्पना होती; परंतु नंतर ही युद्धनौका मोडीत काढून भंगारात देण्याची वेळ येऊन ठेपली होती. त्याविरोधात न्यायालयात याचिका दाखल केल्यानंतर न्यायालयाने 'विक्रांत जैसे थे' स्थितीत ठेवण्याचे आदेश दिलेले आहेत.
भारतीय नौदलाने ही विमानवाहू नौका ब्रिटिशांकडून खरेदी केली. त्या वेळी तिचे नाव एच. एम. एस. 'हर्क्युलिस' होते. विक्रांतची लांबी ७०० फूट, रुंदी १२८ फूट असून, तिचा १६ हजार टनांचा डिसप्लेसमेंट होता. त्या काळात १९५५ ते १९६५ ही युद्धनौका प्रचंडच समजली जात असे. विक्रांत नोव्हेंबर १९६१ मध्ये भारतात आले. त्या वेळी मुंबईच्या नौदल गोदीतील बॅलार्ड पियर येथे विक्रांतचे जंगी स्वागत झाले होते. पंतप्रधान पंडित नेहरू स्वत: या समारंभास हजर होते. विक्रांतचे पहिले कमांडिंग आॅफिसर कॅप्टन प्रीतमसिंग होते. तर, विमानाच्या विभागाचे प्रमुख लेफ्टनंट राम तहिलीयानी होते. हेच पुढे भारतीय नौदलाचे प्रमुख झाले, हा योगायोग म्हणावा का?
पूर्व, पश्चिम आणि दक्षिणेस सागराने वेढलेल्या भारत देशाच्या नौदलात कमीत कमी दोन विमानवाहू नौका असाव्यात, असे सर्वांनाच वाटत होते; परंतु विमानवाहू नौका असणे आणि त्याची देखभाल करणे फार खर्चिक काम असते. तरीसुद्धा त्यावेळचे नौदलप्रमुख व्हाईस अ‍ॅडमिरल कटारी यांच्या आग्रहाने पं. नेहरूंनी विक्रांत खरेदीस हिरवा कंदील दाखविला. भारतीय नौदलाच्या इतिहासात मराठी दर्यावर्दी अधिकाºयांचे मोठे योगदान आहे.
विक्रांत भारतात आल्यानंतर लगेचच ३ वर्षांत १९६५ चे भारत-पाक युद्ध झाले. त्या वेळी विक्रांत मुंबईच्या नौदल गोदीत रिफीटसाठी होते; मात्र पाकिस्तान मीडियाने पाक नौदलाने विक्रांत बुडविल्याचे जाहीर केले होते! विक्रांतवरच्या विमानांना मुंबईच्या संरक्षणाची जबाबदारी देण्यात आली होती. त्यानंतर १९७१ च्या बांगलादेश निर्मिती युद्धात विक्रांतने आपले योगदान चोखपणे दिले. पूर्व पाकिस्तानातून व्यापारी जहाजामधून लपूनछपून पाकिस्तानला परत जाण्याचा डाव विक्रांतच्या विमानांनी हाणून पाडला. पूर्व पाकिस्तानातील पाक सैन्याचा पराभव जेव्हा अटळ झाला. त्या वेळी त्यांच्या पुढे फक्त शरणागतीचा पर्याय होता. विक्रांतच्या सी हॉक, अ‍ॅविझे विमानांनी चिटगाव कॉक्स बझार, खुलना इ. बंदरांवर तुफान बॉम्ब हल्ले करून बंदरे निकामी केली. त्यामुळे पश्चिम पाकिस्तानला पळून जाण्याची त्यांची योजना निष्फळ ठरली. भारतीय सेनादलाच्या इतिहासातच नव्हे, तर जगाच्या इतिहासात न भूतो न भविष्यति अशी ९० हजार पाक सैनिकांची शरणागती भारतीय सेनादलाने २१ डिसेंबर १९७१ रोजी ढाक्यातील एका समारंभात स्वीकारली ! हा दिवस अजूनही भारतीय सेना विजय दिवस म्हणून साजरा करते. त्या वेळी सुरुवातीला विक्रांत अंदमान - निकोबार बेटाजवळ उभे करण्यात आले होते. त्यानंतर ते पूर्व पाकिस्तानच्या नजीकच्या समुद्रात उभे करण्यात आले. या संग्रमात नौदल अधिकाºयांनी आणि सैनिकांनी दाखविलेल्या शौर्याबद्दल २ महावीर चक्र आणि १२ वीर चक्र देऊन त्यांना गौरविण्यात आले. त्यानंतर १९९७ पर्यंत म्हणजेच सेवेतून निवृत्त होईपर्यंत विक्रांतला सागरी युद्धाची संधी मिळाली नाही. परंतु, त्या आधी विक्रांत सदिच्छा भेटीवर मध्य पूर्व आणि दक्षिण एशिया देशामध्ये जाऊन आले होते. काळानुसार विक्रांतची टरबाईन्स इंजिने आणि इतर यंत्रणा कालबाह्य आणि जुन्या होत गेल्या. या ३६ वर्षांच्या कालावधीत विक्रांतने ४ लाख ९० हजार नॉटिकल मैलांचा सागरी प्रवास केला होता. अखेर ३१ जानेवारी १९९७ रोजी समारंभपूर्वक विक्रांतला नौदलातून निवृत्त (डी कमिशन) करण्यात आले. त्याच वेळी हे जहाज मोडीत काढण्यापेक्षा यावर नौदलाचे संग्रहालय करावे, अशी कल्पना मांडली गेली. असे सांगणे सोपे आहे. परंतु या जहाजासाठी जागा, त्यावर ठेवण्याच्या वस्तू आणि त्याची देखभाल यासाठी लागणारा सेवकवर्ग, त्यांचा खर्च, तसेच संग्रहालय बघायला येणाºयांची सुरक्षितता आणि नौदल सुरक्षितता या सर्व गोष्टींचा सखोल विचार करणे गरजेचे होते. १९९८-९९ मध्ये महाराष्ट्रात शिवसेनेचे युती सरकार होते. विक्रांतवर संग्रहालय सुरू करण्यास ६५ कोटी रुपयांची गरज होती. बाळासाहेबांनी मुख्यमंत्र्यांना फोन करून निधीची तरतूद करण्यास सांगितले. दुसºया दिवशी बाळासाहेबांचा विक्रांतवर फोटो आला आणि विक्रांत वाचल्याची बातमी! हे म्युझीयम नौदलाने उभे केले. त्यामध्ये भारतीय नौदलाचा इतिहास, विमानांच्या प्रतिकृती, मिसाईल इ. हे संग्रहालय पुढे ८/१० वर्षे चालू होते. परंतु, दिवसेंदिवस म्युझियमचा देखभालखर्च वाढत होता. अखेरीस आॅगस्ट २०१३ मध्ये मुंबईच्या नौदल पश्चिम विभागाचे प्रमुख व्हाईस अ‍ॅडमिरल सिन्हा यांनी विक्रांत मोडीत काढण्याची शिफारस केंद्र सरकारकडे केली. केंद्राने ती मान्य केली आणि विक्रांत मोडीत काढण्याचा निर्णय झाला. विक्रांतवरील म्युझियम पुढे चालू ठेवण्यासाठी कोणतीही खासगी कंपनी किंवा राज्य सरकार पुढे आले नाही. कारण त्यावरील होणारा खर्च. केंद्र सरकार आणि नौदल मुख्यालयाच्या विक्रांत मोडीत काढण्याच्या निर्णयाविरुद्ध 'विक्रांत वाचवा' समितीतर्फे किरण पैगणकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली. (नोव्हे. २०१३) ती उच्च न्यायालयाने फेटाळून लावली. समितीने सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली आणि आता विक्रांत भंगारात काढण्याच्या निर्णयाला स्थगिती मिळाली आहे.
दरम्यान, विक्रांतचे नाव व परंपरा चालू ठेवण्यासाठी नौदलाने आणि केंद्र सरकारने नवीन विमानवाहू नौका भारतातच तयार करण्याचा निर्णय घेतला. जगातील फक्त ५/६ देशच एअरक्राफ्ट कॅरियरची निर्मिती करू शकतात. भारत त्यापैकी एक आहे. या विमानवाहू नौकेच्या निर्मितीसाठी आधुनिक तंत्रज्ञान, तंत्रज्ञ, स्पेशालिस्ट इंजिनियर्स, डिझायनर्स आणि खास उपकरणाची गरज असते. विक्रांतच्या देशांतर्गत निर्मितीचा निर्णय घेतल्यानंतर (१९९८- ९९) तब्बल १० वर्षांनी (२००५-२००६) कोची येथील नौदल गोदीत विक्रांत उभारणीस प्रारंभ झाला. गेले ८ वर्षे नव्या विक्रांतवर कोची गोदीत काम चालू असून, त्याची चाचणी २०१६ मध्ये होईल. त्यानंतर २०१७ मध्ये हे नवे आधुनिक पुनरुज्जीवित विक्रांत भारतीय नौदलात सामील होईल. त्यावरची विमानेही आधुनिक असतील. रशियन बनावटीची आणि भारतात निर्माण केलेली असतील. लाईट कॉम्बॅट एअरक्राफ्ट (नौदलासाठी) ही विमाने आणि हेलिकॉप्टर त्यावर असतील. या जहाजाच्या निर्मितीसाठी ४ हजार टन स्पेशल स्टील लागते. यावरून नव्या विक्रांतच्या भव्यतेची कल्पना यावी. थोडक्यात, २०१७-१८ मध्ये दोन शक्तिशाली विमानवाहू नौका आय.एन.एस. विक्रमादित्य आणि आय.एन.एस. विक्रांत आपल्या नौदलात कार्यरत राहतील. नवी विक्रांत त्याच दिमाखात पुन्हा एकदा नौदलाचे भूषण बनेल, यात शंका नाही.
(लेखक निवृत्त कर्नल आहेत.)

लोकमत मंथन, पान ४