Saturday, December 27, 2014

पद्मदुर्गावर जागर - शिवरायांची पालखीतून मिरवणूक.

मुरुड: महाड येथील कोकण कडा मित्रमंडळाच्या वतीने शिवशाहीचा साक्षीदार शिवरायांचा पद्मदुर्ग (कासा) किल्ल्यात पद्मदुर्गचा जागर केला. किल्ल्याची स्वच्छता करून फुलांनी सजवला. शिवप्रतिमेचे पूजन भिवंडी येथील शिवप्रेमी शेखरमामा फरमन यांनी सपत्नीक केले. बुरुजावरून शिवरायांची पालखी वाजतगाजत काढताना माजी नगराध्यक्षा कल्पना पाटील, नगरसेवक संदीप पाटील, सुरेश पवार, दीपक शिंदे व शेकडो शिवप्रेमी.

छायाचित्र - श्री सुधीर नाझरे.

Thursday, December 18, 2014

Books by Prof. B Arunachalam

Prof B. Arunachalam was a prolific writer. He had authored and edited as many as 12 books, primarily concerning maritime heritage of India. He has also written around 130 research papers on maritime studies in reputed national and international journals.

 Books

  1. The Indian Ocean and Its Islands: Strategic, Scientific and Historical Perspectives (1992),
  2. Essays in Maritime Studies (1998),
  3. Heritage of Indian Sea Navigation (2002),
  4. Chola Navigation Package (2004),
  5. Essays in Maritime Studies Vol II (2004),
  6. Mumbai by the Sea (2005),
  7. Navigational Hazards, Landmark and Early Charting Special Study of Konkan and South Gujarat (2007)
  8. Navigation Environment of Ancient and Mediaeval Ports of Tamilaham (2008),
  9. Indian Boat Designs and Forms (2009),
  10. Maritime Heritage of Southern Peninsular India (2010),
  11. Maritime Heritage of Lakshadweep and Minicoy Islands (2011), &
  12. Maritime Heritage of Goa and Uttar Kannada (2012).

Articles

  1. Indian prelude to British cadastral and revenue maps
    http://mycoordinates.org/indian-prelude-to-british-cadastral-and-revenue-maps/all/1/

The Chola Voyage Simulation, 2008.

INS Tarangini at Kochi
In 2008, Prof. B Arunachalam simulated a sea voyage undertaken thousands of years ago.

It was a simulation of a sea voyage of the Cholas, an attempt to test the practical utility of the Cholas' traditional observational skills.

The Maritime History Society, Mumbai organized a voyage expedition across Southern Bay of Bengal to test the practical utility of traditional observational skills and hand tools for an overseas parallel sailing adopted during Rajendra Chola's convoy voyages in 1022 AD. The voyage conceived by Prof. B. Arunachalam, and sponsored by the Maritime History Society was supported by Western and Southern Naval Commands of the Indian Navy.

The voyage was undertaken on board the Naval Sailing vessel INS Tarangini, and took off from Kochi port on 2nd January, 2008 in the forenoon.

The basic objectives of the Voyage were to test the success of the Chola voyage for the victorious conquest of the ruling powers in Sumatra and Malaya by using parallel sailing in low latitude using navigation stars in their azimuthal positions and during their movement across the skies.  The hand tools used were the Naligai Vattil, Ra-Palagai, and Tappu-palagai. Observation skills of the sky cover and sea-conditions, apart from elementary thumb rules using the palm and fingers.  The Voyage was set to commence after Ardra Darshan – festival of the East coast Siva temples in the early morning, about the time of setting of Ardra and Mrigasirish, the path finders on the western horizon. This festival coincides with the closure of the tropical cyclone season at the end of the Northeast Trade wind circuit in early December.

The plan was to sail from Nagapattinam in coastal Tamil Nadu, to Port Blair in the Andamans. However, owing to unexpected harsh weather, the vessel reached the eastern shores of Sri Lanka. Eventually, it reached Port Blair on January 18, after a detour through Sumatra caused by adverse wind conditions. 

The Maritime History Society (MHS) sailing team consisted of Cdr GVK Unnithan (Retd) along with Vivek Ganpule of the Tata Institute of Fundamental Research (TIFR) and Umesh Solapurkar of the Bhabha Atomic Research Centre (BARC) with Arunachalam and Cdr Mohan Narayan providing for ground monitoring. The ship was under Cdr Patankar's command.

The voyage also tested hand tools that were adopted by Rajendra Chola's convoy voyages in 1022 AD. Chola's voyages are also credited with concepts like that of parallel sailing (sailing parallel to the equator), which can only be practised in the Indian and Pacific oceans.

During almost half the duration of the voyage, the skies were overcast, making it extremely difficult for the navigators to follow paths as planned. Also, owing to an extended cyclonic season that extended to March, the leg of the journey from Nagapattinam to Vishakhapatnam had to be abandoned.

Prof. Arunachalam, choosing to be modest, said the simulation was only a partial success owing to bad weather conditions.

Saturday, July 5, 2014

जंजिऱ्याचे सिद्दी

जंजिऱ्याचे सिद्दी
- सु. र. देशपांडे

रायगड जिल्ह्यातील जंजिरा या भूतपूर्व संस्थानचे राज्यकर्ते-नबाब. पश्चिम किनाऱ्यावरील राजपुरी (दंडा-राजपुरी) खाडीच्या मुखाच्या पश्चिमेस सु. ०·५ किमी.वर एका अवघड गोलाकार खडकाळ बेटावर जंजिरा किल्ला चौल (उत्तर) व दाभोळ (दक्षिण) या प्राचीन बंदरांच्या मधोमध वसला आहे. त्याला मुरुड-जंजिरा असेही म्हणतात. जझीरा (बेट) या अरबी शब्दावरुन जंजिरा हे नाव रुढ झाले आहे. परकीय प्रवाशांच्या वृत्तांतांत त्याचा सिगेरस किंवा झिगेरस बंदर असाही उल्लेख आढळतो. मराठाकालीन कागदपत्रांत क्वचित हबसाण असाही याचा उल्लेख येतो. ते ॲबिसियन किंवा अबिशियन शब्दाचे अपभ्रंश रुप असावे. या किल्ल्याच्या तटबंदीची उंची १३ ते १५ मी. असून महादरवाजा हुलमुखनामक दोन बुरुजांमध्ये आहे. त्याच्या कमानीवर अरबीत कालोल्लेखाचा कोरीव लेख आहे. कोटाच्या तटाला दोन किंवा तीन मजली २७ मीटरच्या अंतराने बांधलेले २२ बुरुज आहेत. त्यांतून माऱ्याची जागा तसेच आतील बाजूस विश्रांतीची जागा आहे. त्यात दारुगोळा ठेवण्याची सोय होती. तटभिंतींच्या आतील बाजूस चहूबाजूंनी खंदक होता. बालेकिल्ल्यात शियापंथीय पीराचे पंचायतन स्मारक असून कार्तिक पौर्णिमेला जत्रा भरते. मुळात हे कोळ्यांचे जुने श्रद्घास्थान असून त्यास रामपंचायतन म्हणतात. जवळच सिद्दी घराण्यातील पुरुषांच्या-सरदारांच्या कबरी आहेत. कोटात चार मशिदी, तलाव, मोहल्ले, वाडे वगैरेंचे अवशेष आढळतात. याशिवाय तेथील तीन देशी व सहा विदेशी तोफा हे पर्यटकांचे आकर्षण होय. विदेशी तोफांत तीन स्वीडनच्या आणि स्पेन, नेदर्लंड्स (हॉलंड) व फ्रान्स यांची प्रत्येकी एक तोफ आहे. किल्ल्यात अनेक फार्सी शिलालेख असून १५७६-७७ च्या शिलालेखात निजामशहाच्या आज्ञेने फाहिमखानाची जंजिऱ्याचा मुख्याधिकारी म्हणून नेमणूक झाली आणि त्याने हा अभेद्य किल्ला व तटबंदी बांधली, असा उल्लेख आहे. अरबी समुद्राच्या पश्चिम किनाऱ्यावरील हा सुप्रसिद्घ किल्ला मराठे, डच, इंग्रज आणि ईस्ट इंडिया कंपनी यांच्या सैन्यांनी अनेकदा हल्ले करुनही अजिंक्य राहिलेला आहे. पंधराव्या शतकाच्या मध्यास ॲबिसिनिया व पूर्व आफ्रिकेतून पश्चिम भारतात लोक येऊ लागले. अरब-अल्-हबीश (हबश) येथून येणारे हे लोक हबशी म्हणून ओळखले जात. त्यांना सौदी असेही म्हणत. सय्यद वा सय्यदी (हजरत महंमदांचा वंशज) या नावाचा अपभ्रंश होऊन सिद्दी हा शब्द रुढ झाला असावा. हबशांना मुख्यतः गुलाम म्हणून पोर्तुगीजांनी हिंदुस्थानात आणले; तरी त्यांची निष्ठा, धैर्य व कार्यक्षमता यांमुळे बहमनी दरबारात त्यांना दर्जा लाभला. अल्पावधीत हबशी लोक हे पश्चिम भारतातील कुशल व धाडसी दर्यावर्दी आणि सैनिक म्हणून प्रसिद्घ झाले. ‘सेंटर फॉर सेल्युलर अँड मॉलिक्युलर बायोलॉजी’ हैदराबाद (दक्षिण) या संस्थेने सिद्दी जमातीचा सर्वंकष अभ्यास व संशोधन करुन ऐतिहासिक पुराव्यांशी सुसंगत काही निष्कर्ष काढले आहेत (२०११).

जंजिरा निजामशाहीच्या अखत्यारीत येण्यापूर्वीचा सुसंगत इतिहास उपलब्ध नाही. येथे पूर्वी कोळ्यांची वस्ती होती. दर्यावर्दी चाचे व लुटारुंपासून संरक्षण व्हावे, म्हणून त्यांनी या सुरक्षित बेटावर लाकडी मेढेकोट बांधला होता. बहमनी सुलतानांच्या कारकीर्दीत जुन्नरचा सुभेदार मलिक अहमद याने १४८२-८३ दरम्यान किल्ल्याला वेढा दिला; पण यश मिळाले नाही. बहमनी सत्तेच्या विभाजनानंतर मलिक अहमद या निजामशाहीच्या पहिल्या सुलतानाने १४९० मध्ये जंजिरा जिंकून कोळ्यांना ठार केले. किल्ल्याची डागडुजी करुन याकूतखान या हबशी आरमार प्रमुखाच्या तो ताब्यात दिला. दुसऱ्या एका प्रवासवर्णनातील वृत्तांतानुसार (क्लूनची इटिनेररी) पेरिमखान नावाच्या सिद्दीने कोळ्यांना फसवून जंजीरा हस्तगत केला, असा उल्लेख मिळतो. पेरिमखान बारा वर्षे जंजिऱ्यावर होता आणि १५३८ मध्ये मरण पावला. लारकोमच्या माहितीनुसार अहमदनगरच्या बुऱ्हान निजामशहाने (१५०९— ५३) जंजिरा व दंडा-राजपुरीचा सुभा त्याचा इराणी शिया मंत्री शाह ताहिर याच्याकडे सोपविला; तथापि पेरिमखानानंतर आलेल्या बुऱ्हान या आरमार प्रमुखाने १५६७— ७१ दरम्यान हा बुलंद किल्ला बांधला असा उल्लेख मिळतो. त्याने त्यास ‘मेहरुब’ (चंद्रकोर) हे नाव दिले; मात्र तेथील उपलब्ध फार्सी शिलालेखात फाहिमखान याने १५७६-७७ दरम्यान किल्ला बांधल्याची नोंद आहे. पुढे १६०० मध्ये अकबराने अहमदनगर जिंकले, तरी लवकरच मलिक अंबरने (१५४९— १६२६) निजामशाहीचा बराच प्रदेश परत मिळविला. १६१८ मध्ये जंजिऱ्याचा सिद्दी सिरुर (सुरुल) हा निजामशहाकडून जहागीरदार म्हणून सनद घेऊन आला व त्याने स्वतःस जंजिरा संस्थानचा पहिला नबाब म्हणून जाहीर केले. त्यावेळी दंडा-राजपुरी हे मुख्यालय असून जंजिऱ्याच्या नबाबाच्या आधिपत्याखाली सावित्री नदीपासून नागोठाण्यापर्यंतचा मुलूख होता. त्याच्या जागी १६२० मध्ये सिद्दी याकुतखान आला. त्यानंतर १६२१ मध्ये सिद्दी अंबर नबाब झाला. मोगलांनी निजामशाही नष्ट करेपर्यंत (१६३६) दंडा-राजपुरीसह कुलाबा अहमदनगरच्या सुलतानांकडेच होता. मोगलांनी जंजिऱ्यासकट कोकणचा प्रदेश विजापूरच्या आदिलशाहीकडे सुपूर्त केला. त्याबरोबर सिद्दी अंबर विजापूरचा ताबेदार झाला. यावेळी जंजिरा संस्थानच्या सीमा वाढल्या होत्या. पूर्वेस रोहा-माणगाव तालुके, दक्षिणेस बाणकोटची खाडी, पश्चिमेस अरबी समुद्र व उत्तरेस रोह्याच्या खाडीपर्यंत ते विस्तारले होते. त्याचा उपयोग विजापूरचा सागरी व्यापार व मक्केसाठी जाणाऱ्या यात्रेकरुंना होऊ लागला. जंजिऱ्याच्या सिद्दी प्रमुखास आदिलशहाने वझीर किताब दिला. वझीर सिद्दी अंबर १६४६ मध्ये मरण पावला. त्याच्या जागी सिद्दी युसुफ नबाब झाला. त्याच्या मृत्यूनंतर (१६५५) फतेहखान वझीर झाला. यापूर्वी शिवाजी महाराजांनी जंजिरा घेण्याचे प्रयत्न केले होते. पण यश आले नाही. म्हणून १६७० मध्ये महाराजांनी जंजिऱ्यास खुष्कीच्या मार्गाने तसेच समुद्रमार्गे वेढा घातला. पोर्तुगीजांनी सिद्दीस गुप्तपणे दारुगोळा पुरविला; तरी महाराजांचे सैन्यबळ पाहून सिद्दी जंजिरा त्यांच्या स्वाधीन करण्यास राजी झाला. तेव्हा सिद्दी फतेहखानाच्या हाताखालील सरदार संबळ, कासिम व खैरियत सिद्दी यांनी विरोध करुन फतेहखानास कैद केले व लढा चालू ठेवला. त्यांनी मोगलांचे मांडलिकत्व स्वीकारुन मदत मागितली. सुरतच्या मोगल अधिकाऱ्याने ती दिली. औरंगजेबाने सिद्दी संबळ यास याकुतखाँ हा किताब दिला व त्यास सुरतच्या महालातून तीन लाखांची जहागीर दिली. त्यामुळे सिद्दी संबळ मोगल आरमाराचा प्रमुख झाला आणि सिद्दीचे वर्चस्व सुरतपर्यंत प्रस्थापित झाले. सिद्दी कासिम व सिद्दी खैरियत यांना अनुक्रमे मे जंजिरा आणि किनाऱ्यावरील दंडा-राजपुरी व अन्य प्रदेश देण्यात आले, त्यामुळे यावेळीही महाराजांना यश लाभले नाही. त्यानंतरही शिवाजी महाराजांनी १६७१, १६७३ व १६७६ मध्ये इंग्रज, पोर्तुगीज यांच्याबरोबर तह करुन जंजिरा घेण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. १६७६ मध्ये संबळ व कासिम यांत वैर निर्माण झाले. तेव्हा कासिमने नौदलप्रमुख पद मिळविले. शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर (१६८०) छत्रपती संभाजींनी जंजिरा घेण्याचा निकराचा प्रयत्न केला (१६८२); पण त्यांनाही ते जमले नाही. संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर (१६८९) रायगडसह अनेक किल्ले मोगलांच्या हाती आले. कान्होजी आंग्रे हा मराठ्यांच्या आरमारातील अत्यंत पराक्रमी व धैर्यवान नेता होता. १६९४ ते ९८ पर्यंत कोकणपट्टीतले मोगलांनी व इतरांनी काबीज केलेले मराठ्यांचे त्याने सर्व किल्ले परत घेतले गेले. कान्होजीच्या मोहिमेचे मुख्य ध्येय संभाजींच्या हत्येनंतरच्या संघर्षात सिद्दीने बळकावलेला मराठा प्रदेश पुन्हा मिळविणे हे होते. सिद्दी आणि पोर्तुगीजांनी आंग्रेच्या विरोधात मुघलांशी सलोखा केला; परंतु कान्होजीने या त्रयींचा पराभव केला. औरंगजेबाने सिद्दीने केलेल्या मदतीपोटी त्याला मराठ्यांची कोकणातील सर्व ठाणी दिली. मराठ्यांचे रायगड, सुवर्णदुर्ग, पद्मदुर्गासह अनेक किल्ले त्याच्या ताब्यात आले होते. सिद्दी घराण्यातील सिद्दी सात हा गोवलकोट व अंजनवेल किल्ल्यांवर मुख्य प्रशासक होता. महाराणी ताराबाईंच्या कारकिर्दीत रामचंद्रपंतांनी सिद्दीवर हल्ला केला (१७०१); परंतु यश आले नाही.

सिद्दी कासिम मरण पावल्यावर (१७०७) पद्मदुर्गाचा किल्लेदार सिरुरखान त्याच्या जागी आला. त्याच्या मृत्यूनंतर (१७३४) सिद्दी रेहमान जंजिऱ्याचा नबाब झाला. १७३९ मध्ये हुसेनने त्यास पदच्युत करुन नबाबी मिळविली. तत्पूर्वी सिद्दी सात या शूर, मर्द व राजकारणी सेनापतीचा चिमाजी आप्पांनी पराभव करुन त्यास रेवासजवळ चरईच्या लढाईत ठार केले. त्याच्या सोबतच्या या लढाईत (१७३६) देवकोंड नाईक, सुभानजी घाटगा, फाईम, बाळाजी शेणवी वगैरे जंजिऱ्याचे मातब्बर सरदारही मारले गेले. हुसेन सिद्दीनंतर (१७४५) सय्यद अल्लाना गादीवर आला; पण त्यास सिद्दी इब्राहिमने पदच्युत करुन (१७४६) गादी बळकाविली.

मिया आचन सिद्दी १७४८ मध्ये जंजिऱ्याचा प्रशासक बनला. पुढे १७५१ मध्ये सिद्दी मसूदने त्यास घालविले. मसूद वारल्यानंतर (१७५६) बरेच सिद्दी बदलले. मराठ्यांविरुद्घ इंग्रज सतत सिद्दीस मदत करीत, तसेच गोव्याचे पोर्तुगीजही, त्यांना दारुगोळा व शस्त्रसामग्री पुरवीत असत. तथापि या दोन्ही परकीय सत्तांना जंजिऱ्यावर वर्चस्व मिळविता आले नाही. सिद्दी घराण्यात गादीवरुन अंतःकलह चालू झाले. त्याचा फायदा नाना फडणीसांनी १७९१ मध्ये घेऊन सिद्दी गादीचा एक हक्कदार बालूमिया याला सुरतेजवळची सचिनची जहागीर देवविली व जंजिऱ्याचा करार केला; पण पेशवे प्रत्यक्ष जंजिऱ्याचा ताबा मिळवू शकले नाहीत. त्या वेळचा जंजिऱ्याचा नबाब सिद्दी जोहर इंग्रजांना शरण गेला. पेशवाईच्या अस्तानंतर (१८१८) इंग्रजांनी जंजिऱ्यावर वर्चस्व प्रस्थापित करुन १८३४ मध्ये त्यास मांडलिक केले. तेथील टांकसाळ बंद केली. सिद्दी मुहम्मद याने १८४८ मध्ये राज्यत्याग करुन सिद्दी इब्राहिम या मुलास गादीवर बसविले. १८६७ मध्ये जंजिऱ्याचा नबाब व तेथील सरदार यांत तीव्र मतभेद निर्माण झाले. इंग्रजांनी तेथील नबाबाला पदच्युत करुन (१८६९) तिथे इंग्रज रेसिडेंट नेला. पुढे नबाबाने इंग्रजांशी करारनामा केला. तेव्हा त्याचे पद चालू ठेवले, पण अधिकार कमी केले. सिद्दी इब्राहिम खान १८७९ मध्ये मरण पावला. त्याच्या तीन मुलांपैकी (पहिले दोन अनौरस व धाकटा औरस) धाकट्या अल्पवयीन सिद्दी अहमद खान या मुलास इंग्रजांनी गादीवर बसविले. त्याने राजकोट-पुण्याला शिक्षण घेऊन सज्ञान झाल्यावर त्याच्याकडे इंग्रजांनी राज्यकारभार दिला. त्याने संस्थानात शाळा काढली. मुरुडचे जंगल तोडून रस्ते केले. १८९२ मध्ये पिण्याच्या पाण्यासाठी व्हिक्टोरिया ज्युबिली वॉटर वर्क्स ही योजना राबविली. शिवाय नगरपालिका आणि लोकल बोर्डाची स्थापना करुन पायाभूत सुविधा निर्माण केल्या. या त्याच्या कार्याविषयी ब्रिटिशांनी त्यास के. सी. आय्. ई. हे बिरुद बहाल केले. त्यास ७०० लोकांचे संरक्षक दल ठेवण्याची मुभा होती. भारतीय स्वातंत्र्यानंतर (१९४७) जंजिरा संस्थान भारतीय संघराज्यात विलीन झाले (१९४८) व ते मुंबई राज्यात समाविष्ट करण्यात आले.

सिद्दी लोक पराक्रमी, लढवय्ये होते, त्याचबरोबर उत्तम खलाशी होते. मलिक अंबर, मलिक काफूर, मलिक याकुब, फतेहखान, सिद्दी संबळ, याकुबखान, सिद्दी कासीम, सिद्दी मसूद, सिद्दी सात, सिद्दी खान, सिद्दी सुभान इ. अनेक सरदार हुशार, बुद्घिमान आणि लढवय्ये म्हणून विख्यात होते. अरबी समुद्रात मोठ्या प्रमाणात चाचेगिरी करण्याचा त्यांचा उद्योग होता.

पहा : जंजिरा संस्थान.

संदर्भ :
१. केळकर, य. न. इतिहासातील सहली, पुणे, १९५१.
२. देवळे, श. रा. महाराष्ट्रातील किल्ले, पुणे, १९८१.
३. पुरोहित, श्री. रा. किल्ले जंजिरा, भारतीय इतिहास आणि संस्कृती, त्रैमासिक, १ एप्रिल १९६९, मुंबई.
४. बेंद्रे, वा. सी. जंजिरेकर सिदी; शिवाजी निबंधावली, भाग २, पुणे, १९३४.
५. भोसले, बा. के. जंजिरा संस्थानचा इतिहास, बडोदे, १८९८.
६. सरदेसाई, गो. स. मराठी रियासत (सुधारित आवृत्ती), खंड १ ते ३, मुंबई, १९८८ व १९८९.

http://marathivishwakosh.in/khandas/khand19/index.php?option=com_content&view=article&id=10404

Thursday, June 26, 2014

Battle of Satavli - सातवलीची लढाई

१६७१ पासून सिद्दीने घेतलेला आक्रमक पवित्रा वाढतच चालला होता. दंडाराजपुरीच्या विजयानंतर खुद्द आलमगीर-औरंगजेबाने सिद्दीच्या डोक्यावर हात ठेवला होता. सिद्दी संबूल हा मुघलांचा आरमारी सुभेदार झाला. म्हणजेच अमीर अल बहऱ्र.

त्याने दाभोळ आणि नागोठणे सारखी संपन्न शहरे बेचिराख केली. तर केळशी येथील मराठ्यांच्या आरमाराची एक संपूर्ण तुकडीच जाळून राख केली.

आलमगीराचे द्रव्य आणि सिद्दींचा आरमारी हुन्नर, या संयुक्त बळापुढे नवख्या मऱ्हाटी आरमाराचे काय होणार हा प्रश्न सर्वांसमोर उभा होता.

आता सगळं काही एका निर्णायक लढाईच्या निकालावर अवलंबून होते.

त्यात सन १६७४ उजाडले. महाराजांनी रायगडावर राज्याभिषेक करून घेण्याचा निर्णय केला होता. पण जंजिरा हा रायगडापासून एका मजलीच्या अंतरावर होते. त्यामुळे सिद्दीचा धोका दूर करणे महत्वाचे होते.

महाराजांनी नेमके काय केले हे इतिहास सांगत नाही. पण मार्च १६७४ मध्ये इतिहासाची दिशा काही अशाप्रकारे बदलली.

मुचकुंदीच्या खाडीत (आजच्या पूर्णगड किल्ल्या समोर), आणि सातवली नावाच्या छोट्या कसब्याजवळ, सिद्दी संबूल आणि दौलतखान यांची दर्या गाजवणारी लढाई झाली.

दोन्ही बाजूंनी पराक्रमाची शर्थ झाली. सिद्दी संबूल आणि दौलतखान जातीने आपल्या आरमाराचे नेतृत्व करत होते. एकमेकांवर बाणांचा वर्षाव करून दोन्ही आरमार हातात तलवारी घेऊन भिडले.

मराठ्यांची ४४ माणसे कामी आली. तर खुद्द दौलतखानाच्या पायाला बाण लागून तो जखमी झाला.
पण सिद्दीचा दारूण पराभव झाला.
सिद्दी कडील १०० माणसे मेली, तर सिद्दी संबूलच्याच गलबताला आग लागली. यात त्याचे दोन्ही हात भाजले.

संबूलने इथून जो पळ काढला तो थेट हरीहरेश्वरला पोहोचल्यावरचं थांबला.

एकाप्रकारे दौलतखानाने महाराजांना राज्याभिषेकासाठी दिलेला नजराणाच हा.

या लढाईमुळे मराठ्यांना राजापूर ते बारदेश हा पूर्ण तळकोंकण प्रांत, सिद्दीची चिंता न करता, जिंकता आला.

राज्याभिषेकाला त्रास देणे सोडाच, उलट सिद्दीने परत आलमगीरकडे कुमक पाठवण्याची केविलवाणी विनंती सुरु केली. आणि चक्क सप्टेंबर १६७५ पर्यंत, म्हणजे दीड वर्ष, कोणत्याही प्रकारे मराठ्यांच्या नादी लागला नाही.

Sunday, June 1, 2014

आंग्रे घराणे

आंग्रे घराणे
- सु. र. देशपांडे.

मराठ्यांचा इतिहास घडविणाऱ्या प्रसिद्ध घराण्यांपैकी एक. पुणे जिल्ह्यातील काळोसे हे आंग्रे घराण्याचे मूळ गाव व शखपाळ-शंकपाळ-संकपाळ हे त्यांचे मूळ आडनाव; परंतु आंगरवाडी ह्या काळोसेतील एका छोट्या भागावरून त्यांस पुढे आंग्रे हे उपनाव प्राप्त झाले. सेखोजी हे या घराण्यातील पहिले ज्ञात पुरुष. त्यांचे चिरंजीव तुकोजी हे उत्तर कोकण काबीज करीत असता शहाजींनी चौलजवळ १६४० मध्ये जी दर्यावरील लढाई केली, तीत प्रथम प्रसिद्धीस आले. १६५९ मध्ये ते शिवाजीच्या पदरी गेले. त्यांस मराठी आरमारातील २५ असामींची मुखत्यारी होती. पुढे ते आपल्या कर्तबगारीने सरनौबतीच्या हुद्द्यापर्यंत चढले. १६८०त तुकोजींचे निधन झाल्यावर त्यांचा मुलगा कान्होजी  ह्यांनी त्यांचे कार्य पुढे चालू ठेवले. कान्होजी हेच आंग्रे घराण्यातील सर्वांत कर्तबगार पुरुष आणि आंग्रे घराण्याचे खरे संस्थापक होत.

छत्रपती संभाजींच्या वधानंतर छत्रपती राजाराम ह्यांस जिंजी येथे जावे लागले. त्या सुमारास कान्होजींचा पराक्रम कोकणपट्टीवर दिसू लागला. १६९४–१७०४च्या दरम्यान त्यांनी पश्चिम किनारपट्टीतील मोगलाकडे गेलेले मराठ्यांचे सर्व किल्ले परत घेतले; शिवाय कुलाबा जिंकून त्यास आपले प्रमुख ठिकाण केले व त्यांनी  “आपण कोकणकिनाऱ्याचे राजे” अशी घोषणा केली. छत्रपती राजाराम ह्यांनी त्यांची ही कामगिरी व पराक्रम लक्षात घेऊन त्यांस मराठी आरमाराचे आधिपत्य देऊन सरखेल हा किताब दिला. राजारामांच्या मृत्यूनंतर त्यांची पत्‍नी ताराबाई ह्यांनी कान्होजींस आपल्या पक्षात सामील करून घेऊन त्यांस राजमाचीचा किल्ला व भिवंडी प्रांताचा बंदोबस्त करण्यास दिला आणि सरखेल हा किताब कायम केला. पुढे १७०७ मध्ये छत्रपती शाहू  हे मोगलांच्या कैदेतून सुटून आल्यानंतर छत्रपतींच्या गादीबद्दल ताराबाई व शाहू ह्या उभयतांत वाद निर्माण झाला. पण अखेर शाहूंची सरशी होऊन सातारची छत्रपतींची गादी शाहूंस मिळाली. नंतर शाहूंनी कान्होजींवर बहिरोपंत पिंगळे ह्या आपल्या पेशव्यास धाडले. परंतु त्याचा काही उपयोग न होता तो कान्होजींच्या कैदेत मात्र पडला. तेव्हा शाहूंनी बाळाजी विश्वनाथ व कान्होजी ह्यांचे पूर्वीचे मैत्रीचे संबंध लक्षात घेऊन बाळाजीविश्वनाथह्या आपल्या पेशव्यास त्यांविरुद्ध धाडले. बाळाजींने कान्होजींबरोबर तह करून त्यांस शाहूंच्या पक्षात सामील करून घेतले आणि त्यांस काही मुलुख, सरखेलपद आणि मराठी आरमाराचे आधिपत्य शाहूंकडून देवविले. ते अखेरपर्यंत, म्हणजे १७२९ पर्यंत शाहूंच्या पक्षात होते.

कान्होजींनी  मराठ्यांचे आरमार वृद्धिंगत आणि कार्यक्षम केले. त्यांच्या कारकिर्दीत कोणपपट्टीत इंग्रज, फ्रेंच, पोर्तुगीज वगैरे परकीय किंवा सिद्दी यांसारख्यांवर मराठ्यांचा वचक होता. कान्होजींची जहाजे त्रावणकोर-कोचीनपासून उत्तरेस सुरत-कच्छपर्यंत निर्वेधपणे समुद्रातून संचार करीत. कान्होजींनी कुलाब्यास जहाजे बांधण्याचे काम सुरू करून जहाजबांधणीधंद्यास उत्तेजन दिले होते. त्यांनी मराठेतर जहाजांना सुरक्षिततेची हमी म्हणून काही कर घेऊन परवाने देण्याचा यशस्वी उपक्रम यूरोपीय सत्ताधाऱ्यांप्रमाणे चालू केला. त्यामुळे मराठ्यांचा व्यापार वाढला आणि मराठी सत्तेचा मान द्दढावला.

कान्होजींस सेखोजी, संभाजी, मानाजी, तुळाजी, येसजी व धोंडजी असे सहा पुत्र झाले. कान्होजींच्या मृत्यूनंतर त्यांचे ज्येष्ठ पुत्र सेखोजी हे सरखेल (१७२९–३४) झाले. ह्या वेळी सिद्दीसाताने ब्रह्मेंद्रस्वामींचे परशुरामक्षेत्र उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्‍न केला. तेव्हा सिद्द्याचे पारिपत्य करण्यासाठी पहिले बाजीराव कोकणात उतरले. त्यास सेखोजींनी मदत केली. त्यांनी पेशवे व छत्रपत्ती ह्या दोघांशी सलोखा ठेवून आरमाराची वृद्धी केली. पण ते १७३३ मध्ये निधन पावल्यावर आंग्रे घराण्यात अंत:स्थ कलह सुरू झाला. संभाजी व मानाजी या भावांत सरखेलीबद्दल वितुष्ट निर्माण होऊन त्याचा परिणाम साहजिकच सिद्दी, इंग्रज, पोर्तुगीज इत्यादींवरील मराठ्यांचा वचक कमी होण्यात झाला. दोघेही आपले स्वार्थ व सत्ता वाढविण्याच्या मागे लागले. त्यामुळे परस्परांविरुद्ध दोघेही परकीयांची मदत घेऊ लागले. म्हणून पहिले बाजीराव ह्यांनी ह्या भांडणात मध्यस्थी करून १७३५ मध्ये संभाजींस सरखेल हा किताब व सुवर्णदुर्ग आणि मानाजींस वजारत-म्-आब हा किताब व कुलाबा देऊन दोघांना खूष करण्याचा प्रयत्‍न केला. मात्र त्यामुळे मराठी आरमारात दोन सत्ताधारी निर्माण झाले. संभाजी १७४२ मध्ये मरण पावले. त्यांस मुलगा नसल्यामुळे त्यांचा दुसरा सावत्र भाऊ तुळाजी सुवर्णदुर्गाचे अधिपती (१७४२–५६) झाले. त्यांच्या आरमारात ७४ तोफांचा गुराब, २० ते ३० टनी ८ गुराब व ६० गलबते होती. त्यांनी इंग्रज पोर्तुगीजांची अनेक जहाजे पकडली व त्यांना आपले परवाने (दस्तक) घ्यावयास भाग पाडले. सिद्दीचे अजिंक्य समजले जाणारे गोवळकोट व अंजनवेल किल्ले जिंकले व सर्वत्र दरारा निर्माण केला, पण त्यांचे पेशव्यांशी कधीच पटले नाही. त्यांनी प्रतिनिधी, अमात्य, सावंतवाडीकर, कोल्हापूरकर इत्यादींच्या प्रदेशावर अनेक वेळा आक्रमणे केली, शिवाय पेशव्यांविरुद्ध ताराबाईंशी संधान बांधले. तेव्हा पेशव्यांनी इंग्रजांच्या मदतीने १७५६ मध्ये त्यांवर विजयदुर्ग इथे चढाई केली. तीत तुळाजींचा पराभव होऊन पेशव्यांनी त्यांस कैद केले; आणि इंग्रजांनी सदर चढाईत तुळाजींचे आरमार जाळले. ह्यामुळे मराठी आरमार पुढे कायमचे खच्ची झाले. तेव्हा पेशव्यांनी स्वतचे आरमार उभे केले. कान्होजींनंतर तुळाजींइतका पराक्रमी पुरुष आंग्रे घराण्यात पुढे झाला नाही.

ह्यापूर्वी व ह्या सुमारास मानाजी आंग्रे मात्र पेशव्यांस सर्वतोपरी मदत करीत होते. त्यांनी १७३७–३९च्या मराठे-पोर्तुगीज युद्धात पोर्तुगीजांची समुद्रात नाकेबंदी करून त्यांना जेरीस आणले; आणि पुढे १७४० मध्ये तर मानाजींनी पोर्तुगीजांच्या आरमाराचा धुव्वा उडविला. सिद्दीविरुद्धच्या मराठ्यांच्या लढाईत मानाजींनी पेशव्यांस साहाय्य केले. १७५५ मधील उंदेरीच्या मोहिमेत पेशव्यांच्या मदतीला मानाजी गेले होते. या संधीचा फायदा घेऊन सिद्दींचा सरदार आबाजी घाटगे ह्याने आंग्र्यांच्या मुलुखावर स्वारी केली. त्यामुळे मानाजी तातडीने कुलाब्यास आले आणि सिद्द्यांची कायमची खोड मोडण्याचा त्यांनी निर्धार केला. त्यांच्यानंतर त्यांचे ज्येष्ठ पुत्र रघोजी यांनी हे कार्य पुढे तडीस नेले. मानाजींनी  आपल्या मनमिळाऊ व साहाय्य करण्याच्या प्रवृत्तीमुळे छत्रपती व पेशवे ह्या दोघांकडे आपले चांगलेच वजन निर्माण केले होते. ते १७५९ मध्ये मरण पावले.

तुळाजी व मानाजी ह्यांच्या नंतर रघोजी हा मानाजींचा ज्येष्ठ पुत्र सरखेलपदावर आला (१७५९–९३). ह्या सुमारास अलिबागच्या उत्तरेकडील पूर्वपश्चिमपट्टी आंग्रे व पेशवे ह्यांच्या संयुक्त अंमलाखाली होती. फक्त जंजिरकर सिद्दी यांचा उंदेरीचा भाग त्यात समाविष्ट नव्हता. सिद्दीच्या उंदेरी येथे झालेल्या संपूर्ण पराभवानंतर तो पेशव्यांनी घेतला आणि त्यास ‘जयदुर्ग’असे नाव देऊन तिथे आपला अंमलदार नेमला. ही एवढी घटना सोडता रघोजींची उर्वरित कारकीर्द शांततेची गेली. मात्र इथून पुढे आंग्रे हे केवळ एक नामधारी सरदार राहिले.

दुसरे मानाजी हे रघोजींचे ज्येष्ठ पुत्र रघोजींच्या मृत्यूनंतर सरखेल झाले (१७९३–९९). अल्पवयीन असल्यामुळे त्या वेळी त्यांचा सावत्र भाऊ जयसिंगराव ह्यांना पेशव्यांनी कुलमुखत्यार म्हणून नेमले. अर्थात ही गोष्ट मानाजींची आई आनंदीबाई ह्यांना खपली नाही. त्यांनी जयसिंगरावांस मारण्याचा कट रचिला. साहजिकच उभयतांत यादवीस सुरुवात झाली. पुणे दरबारने एकंदरीत सर्व राजकीय परिस्थिती पाहून मानाजी ह्यांना साहाय्य करण्याचे ठरविले. तेव्हा जयसिंगरावांनी आलीजाह बहादुर शिंदे लष्करकर यांच्याकडे मदतीची याचना केली. शिंद्यांकडून जयसिंगरावास मानाजी व पेशवे ह्यांच्या विरुद्ध मदत म्हणून पहिले कान्होजी यांचा नातू (येसजीचा मुलगा) बाबुराव ह्यांना पाठविण्यात आले. प्रथम बाबुरावांनी जयसिंगरावांना मदत केली परंतु कुलाबासंस्थानची तत्कालीन राजकीय स्थिती लक्षात घेऊन जयसिंगराव व मानाजी ह्या दोघांस बाजूस सारून बाबुराव आपणच सरखेलपदी चढले (१७९९–१८१३). दरम्यान पेशवाई खिळखिळी होऊन अंत:स्थ कलहाला सुरुवात झाली होती. बाबुरावांच्या कारकिर्दीत सकवारबाई (जयसिंगरावांची पत्‍नी) हिचे बंड सोडले, तर इतर सर्व कारकीर्द गेली. त्यांनी अनेक लोककल्याणाची कामे केली व संस्थानातील दंगेधोपे शमविले. बाबुराव जामगाव (अहमदनगर) मुक्कामी मरण पावले. नंतर विनायक परशुराम ह्या दिवाणजींच्या मध्यस्थीने दुसरे मानाजी पुन्हा सरखेलपदी आले (१८१३–१७). पण पुढे मानाजी व दिवाणजी यांच्यात वितुष्ट आले. लवकरच दुसरे मानाजी निधन पावले. त्यांच्यानंतर दुसरे रघोजी ह्या मानाजींच्या मुलास सरखेलीची वस्त्रे दुसरे बाजीराव पेशवे यांजकडून मिळाली (१८१७–३८). हा काल मराठी सत्तेच्या धामधुमीचा व अवनतीचा होता. तथापि रघोजींनी अत्यंत शांततेने संस्थानचा कारभार केला व संस्थानची आबादानी केली. १८२२च्या इंग्रजांबरोबरच्या तहामुळे रघोजींवर अनेक निर्बंध आले. ते १८३८ मध्ये कुलाबा येथे निधन पावले. त्यांना दोन मुलगे होते. त्यांपैकी एक रघोजींच्या अगोदर मृत्यू पावला व दुसरा रघोजींच्या मृत्यूनंतर जन्मास आला. त्यांचे नाव ‘कान्होजी’असे ठेवण्यात आले, परंतु ते अल्पवयीनच १८३९ मध्ये मरण पावले. त्यामुळे कंपनी सरकारने कुलाबा संस्थानाची जप्ती केली. १८३९–४४ ह्या अवधीत राण्यांनी दत्तक घेण्याबाबत खटपट चालविली होती, पण कंपनी सरकारने मयत दुसरे कान्होजी आंग्रे ह्यांस वारस नाही म्हणून १८४४ मध्ये कुलाबा संस्थान खालसा केले, आणि डेव्हिस ह्या इंग्रजी अधिकाऱ्यास दिवाण विनायक परशुराम ह्यांजकडून संस्थानच्या सर्व मालमत्तेचा ताबा घेण्यास फर्माविले.

कुलाबकर सरखेल आंग्रे यांची एक शाखा मूळ संस्थापक कान्होजी यांचे चिरंजीव येसजी यांच्या वेळेपासून ग्वाल्हेरास आहे. येसजींची मुलगी मैनाबाई ही त्या वेळी शिंदे घराण्यात दिली होती. हे शिंदे पुढे ग्वाल्हेरात संस्थानाचे अधिपती झाली. त्या वेळी सरखेलपद मिळण्याची संधी आपणास नाही असे पाहून येसजींचे मुलगे मावजी व बाबुराव हे बहिणीकडे जाऊन राहिले. बाबुरावांनी आपल्या सेनेसह शिंदे ह्यांना अनेक लढायांत मदत केली म्हणून आंग्र्यांना भोरासा, नेओरी आणि पानविहार हे भाग जहागीर म्हणून मिळाले. शिवाय सर्व लवाजमा व ‘वजारत-माब-सरखेल’ ह्या किताबात ‘सवाई’ हा आणखी एक किताब बहाल करण्यात आला. बाबुरावांस संतती नसल्यामुळे त्यांनी मावजी ह्या आपल्या भावाचा संभाजी हा मुलगा दत्तक घेतला व ते अलिबागेस परतले. ह्या वेळी माळव्यात अनेक उचापती व लूटमार चालू होती. ती संभाजींनी थांबवून ग्वाल्हेर संस्थानास हरएक प्रकारे मदत केली. म्हणून शिंद्यांनी आणखी काही मुलूख त्यांस दिला. संभाजींसही मुलगा नसल्यामुळे त्यांनी आपल्या मुलीचा मुलगा अप्पासाहेब (बाबुराव) हा १८३९ मध्ये दत्तक घेतला. संभाजी १८४६ मध्ये मरण पावले. बाबुरावांनी संस्थानात अनेक हुद्द्यांच्या जागांवर काम केले. त्यांनाही मुलगा नसल्यामुळे त्यांनी अलिबागकर आंग्रे घराण्यातील ‘त्र्यबकराव’ नावाचा मुलगा दत्तक घेण्याचे ठरविले, तथापि ते १८९१ मध्ये दत्तक घेण्यापूर्वी मृत्यू पावले. तेव्हा त्यांनी ठरविलेला दत्तक पुढे १८९२ साली घेण्यात येऊन त्याचे नाव ‘संभाजी ’ ठेवण्यात आले. त्यांना १८९६ मध्ये मुलगा झाला. हे चंद्रोजीराव व त्यांचे चिरंजीव संभाजीराव सध्या विद्यमान असून चंद्रोजीराव हे विद्वान, अभ्यासू व समाजकार्यकर्ते म्हणून प्रसिद्ध आहेत. संस्थानिकांच्या राजकारणात त्यांनी अनेक वेळा पुढाकार घेतला होता. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात ते हिंदुमहासभेचे अध्यक्ष होते.

संदर्भ : 1. Burrows, C. B., Pub. Representative Men of Central India, Bombay, 1902.
            2. Sen, S. N. The Military System of the Marathas, Calcutta, 1958.
            ३. ढबू, दा. गो. कुलाबकर आंग्रे सरखेल,  अलिबाग, १९३९.

Friday, May 30, 2014

भारतीय नौसेना १९४७ पर्यंत

तेराव्या शतकापासून ते इ. स.१९४७ पर्यंत भारताने नौसेनाक्षेत्रात महत्त्वाचे कार्य केले नाही. याची कारणे म्हणजे दीर्घकालीन पारतंत्र्य व जमिनीवर होणाऱ्या लढाया ही होत. आठव्या शतकापासून ते सतराव्या शतकाअखेरपर्यंत हिंदुस्थानावर खुष्कीच्या मार्गाने परकीय आक्रमणे झाली. पंधराव्या शतकाच्या अखेरीपासून पाश्चात्त्यांनी सागरामार्गे व्यापारी आक्रमणे करून शेवटी इंग्रजांनी हिंदुस्थानावर राज्य स्थापले. इ. स. पू. सु. सोळाव्या शतकापूर्वी म्हणजे आर्यांच्या आक्रमणापूर्वी सिंधू संस्कृतीचा सुमेर, अक्कड इत्यादींबरोबर सागरी व्यापार चाले. हा व्यापार निर्विघ्नपणे चालत असण्याचा संभव नाही; परंतु तत्कालीन नौसेना कशा असाव्यात, हे मात्र सांगता येत नाही. पुरातत्त्व उत्खननात सापडलेल्या मुद्रा व भांड्यांवरील नौकांच्या चित्रांवरून त्या काळी शिडांची जहाजे होती हे कळते. रामायणामध्ये (अयोध्याकांड ९५) नदीत लढणाऱ्या नौका व सेना यांचा उल्लेख आहे. महाभारतात नौसेना हे एक सेनांग आहे. ऋग्वेदामध्ये (मंडल १, ७ व १०) नौकांचे उल्लेख आहेत; परंतु त्यांचे स्वरूप कळत नाही. पुराण, जातक इ. वाङ्‌मयात नौका, सागरी व्यापार इत्यादींची वर्णने आहेत.

अर्थशास्त्रातील नावाध्यक्ष (२·२८) या प्रकरणात शत्रूच्या नौकांचा विध्वंस करावा असे म्हटले आहे; तथापि चाणक्याने नौसेनेचा उल्लेख केलेला नाही. पुराणांत व जातकादी वाङ्‌मयात नौका, नौकाबांधणी व पर्यटन यांचे उल्लेख आहेत. गुप्त, कलिंग, हर्ष, यादव, कदंब व शिलाहार इत्यादींच्या नौसेना असाव्यात. चौलांनी नाविक बळाचा उपयोग करून जावा, सुमात्रा व कंबोज या देशांत साम्राज्यविस्तार केला होता. अकबराच्या आइन-इ-अकबरीत मोगली नौसेनेची माहिती मिळते.

नौकाबांधणीबद्दल युक्तिकल्पतरु या मध्ययुगीन ग्रंथात माहिती मिळते. ज्या नौकांच्या लांबी-उंचीचे प्रमाण १० : १ व रुंदी-उंचीचे प्रमाण १·२५ : १ असते, त्या नौका अस्थिर असतात आणि ज्यांचे प्रमाण २ : १ व १ : १ असते, त्या संकट आणतात; असा इशारा देण्यात आला आहे. एकंदरीत नौशिल्पकल्पना अवास्तव वाटतात. संस्कृत ग्रंथ घटक-कारिका (१६ ते १८ वे शतक) व औरंगजेबकालीन फतिया-इ-इब्रिया या ग्रंथांत नौकांविषयी पुष्कळ वर्णने आहेत.

स्वतंत्र भारताच्या व पाकिस्तानच्या नौसेनांचे मूळ, १६१३ साली सुरत येथे ईस्ट इंडिया कंपनीने स्थापिलेल्या ‘हिंदुस्थानी मरीन’ (इंडियन मरीन) या नौदलात सापडते. अरबी समुद्रात चाचेगिरी चाले. या चाच्यांशी मुकाबला करता यावा म्हणून ५ सप्टेंबर १६१२ रोजी दोन शस्त्रास्त्रयुक्त व्यापारी जहाजे ब्रिटिशांच्या सुरत वखारीत दाखल झाली; हीच इंडियन मरीनची सुरुवात होय. इंडियन मरीनमध्ये गुरब व गलबते (सु. ७५ ते ३०० टनभाराची) पुढे आली. त्यात हिंदू कोळ्यांची नौसैनिक म्हणून भरती केली जाई. खंबायतचे आखात, तापी व नर्मदा यांच्या मुखाजवळील सागरीक्षेत्राचे रक्षण हे काम मरीनकडे होते. सुरत, अहमदाबाद आणि खंबायत येथे नाविक प्रशिक्षण दिले जाई. १६१५ पर्यंत १० गुरब आणि गलबते काम करीत. १६२२ मध्ये इराणी आखातातील ओर्मुझ बंदर ‘मरीन’ ने ताब्यात घेऊन चाचेगिरीला बराच आळा घातला. १६६४ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराशी इंडियन मरीनला लढावे लागले. ५ जानेवारी १६६४ रोजी शिवाजी महाराजांच्या सुरतवरील हल्ल्या मरीनने तोफा डागून फॅक्टरीचे रक्षण केले. १६७९ मध्ये खांदेरी बेटावर शिवाजींनी जलदुर्ग बांधून ब्रिटिश, सिद्दी व पोर्तुगीज यांच्या सागरी सत्तेवर दडपण आणले. खांदेरीवरून मराठा आरमाराला हुसकावून लावण्यात इंडियन मरीन व इतर अयशस्वी झाले. १६८३ मध्ये सुरत सोडून मुंबईत इंडियन मरीनचा तळ हलविण्यात आला व त्यास ‘बाँबे मरीन’ हे नवे नाव देण्यात आले. १६८६ ते १७३६ पर्यंत मराठा आरमार व बाँबे मरीन यांच्यात पश्चिम किनाऱ्यावरील वर्चस्वासाठी सागरी लढाया चालू होत्या. ब्रिटिश शाही नौसेना, सिद्दी व पोर्तुगीज यांचे साहाय्य बाँबे मरीनला जर मिळाले नसते, तर मराठ्यांनी सरखेल आंग्रे यांच्या नेतृत्वाखाली हिंदुस्थानच्या पश्चिम किनाऱ्यावर स्वामित्व स्थापले असते व हिंदुस्थानच्या इतिहासाला कदाचित निराळे वळण लागले असते. १६८० ते १७०७ या काळात मराठ्यांना जमिनीवर मोगलांशी निर्वाणीचा लढा द्यावा लागला, ही वस्तुस्थिती या संदर्भात महत्त्वाची ठरते. १७१६ च्या सुमारास बाँबे मरीनकडे २५ गुरब व गलबते होती. या नौकांवर एकूण ३८४ लहानमोठ्या तोफा होत्या. कमोडोर मॅथ्यूझ हा मरीनचा सरखेल होता. अठराव्या शतकात यूरोपात इंग्रज-फ्रेंच यांच्यामध्ये युद्धे चालू होती. त्यामुळे बाँबे मरीनची झपाट्याने प्रगती होत राहिली. १७३५ मध्ये मुंबईत हल्ली असलेल्या नाविक गोदीची बांधणी पुरी होऊन तेथे नौकाबांधणीस सुरुवात झाली. १७५० मध्ये सुकी गोदी तयार झाली. १७५१ मध्ये मरीनकडे ११ मोठ्या युद्धनौका, २५२ तोफा व पुष्कळ गलबते होती. १७४८ ते १७५६ च्या दरम्यान सरखेल संभाजी आंग्रे यांच्या मराठा आरमाराचा धुव्वा उडविण्यासाठी ब्रिटिशांनी फार प्रयत्न केले. आंग्रे यांचा वरचष्मा पेशव्यांना सहन होत नसे. नानासाहेब पेशव्याने जमिनीच्या बाजूने व बाँबे मरीनने सागरी मार्गाने धेरीया ऊर्फ सुवर्णदुर्गावर चढाई करून आंग्र्यांचा पराभव केला. या लढाईत ब्रिटिशांचे रॉबर्ट क्लाइव्ह व वॉटसन हे अधिकारी होते. पेशव्यांनी अदूरदर्शीपणाने ब्रिटिशांना पश्चिम किनाऱ्यावर सत्ता स्थापण्यास आणि मराठा साम्राज्याचा ऱ्हास करण्यात मदत केली. १७६१ च्या सुमारास बाँबे मरीनला नाविक गणवेष देण्यात आला. त्यातील अधिकारी इंग्रज असत. नौसैनिकांपैकी ७५% सैनिक कोकणी असत. मराठा आरमाराचा निकाल लावल्यावर हैदर अलीची बंदरे बाँबे मरीनने जिंकली. एकोणिसाव्या शतकारंभी जावा, सुमात्रा यांवर हल्ले करण्यात मरीन यशस्वी झाले. १७९८ मध्ये मुंबई येथे मरीन बोर्ड स्थापण्यात आले. बोर्डाच्या आज्ञेप्रमाणे सागरी वाहतुकीचे संरक्षण, मुंबई बंदरात जलमार्ग दर्शन, सागरी सर्वेक्षण व जलालेखन इ. कामे मरीनला देण्यात आली. काठेवाड, सिंध, मकरान किनारा व इराणी आखाताचे जलालेखन मरीनने केले. १८२४ मध्ये मरीनने ब्रह्मदेशावरील आक्रमणात भाग घेतला. १८२९ साली लष्करी कायदा लागू करून ‘बाँबे मरीन’ ला ‘मरीन कोअर’ नाव देण्यात आले. अमेरिकेत झालेल्या राज्यक्रांतीमुळे ब्रिटिशांना तेथील उत्तम प्रकारचे लाकूड मिळणे अशक्य झाले. जहाज बांधणीस मलबारी सागवान लाकूड उत्कृष्ट गणले जाते. परिणामतः मुंबई बंदरात जहाजबांधणीस चालना मिळाली. मुंबईच्या याट (खेळाच्या बोटींच्या) क्लबपाशी सुक्या गोदीत जहाजबांधणीसाठी तीन घसरमार्ग बांधण्यात आले. येथेच २,५९१ टनभाराची मिआनी युद्धनौका बांधण्यात आली. १८३० साली ‘मरीन कोअर’ हे नाव बदलून ‘इंडियन नेव्ही’ (हिंदी नौसेना) हे नाव देण्यात आले. २० मार्च १८३० रोजी मुंबई गोदीत बांधलेल्या व वाफेवर चालणाऱ्या ह्यू लिंडसे नौकेला समुद्रात सोडण्यात आले. शीडयुक्त जहाजांना समुद्रात ओढून नेऊन वाऱ्यात सोडण्यासाठी वाफेवर चालणाऱ्या जहाजांचा उपयोग होत असे. शिडाच्या जहाजांच्या अस्तास सुरुवात होऊन वाफेची जहाजे हिंदी नौसेनेत भरती होऊ लागली. नौकांचा टनभार (६००–७०० टनभार) वाढीस लागून सु. २०·३२ सेंमी. च्या (८ इंची) भारी तोफा प्रचारात येऊ लागल्या. १८३९ मध्ये एडन बंदर ईस्ट इंडिया कंपनीने काबीज केले. १८४३ च्या सुमारास हिंदुस्थानी नौसेनेत वाफेची ११ फ्रिगेट व इतर १५ युद्धनौका होत्या. १८४५ साली मुंबईपाशी बुचर बेटावर नाविक तोफखाना शाळा सुरू झाली. शीख-इंग्रज युद्धात नौसेनेत मुलतान मोहिमेत भाग घेतला. १८५२–५६ मध्ये ब्रह्मदेश व इराण-मोहिमांत कामगिरी केली. 

१८५७ च्या उठावात नौसैनिकांचा पायदळासारखा उपयोग झाला. एका हिंदी सैनिकाला व्हिक्टोरिया क्रॉस मिळाला. उठावाचा विलक्षण परिणाम म्हणजे हिंदी नौसेनेचे विघटन होऊन मुंबई व कलकत्ता मरीन अशी दोन बिनलढाऊ नौकादले संघटित झाली. तारायंत्राच्या तारा समुद्रात सोडणे व जलालेखन करणे ही कामे त्यांस देण्यात आली. १८७७ मध्ये महाराणीचे ‘इंडियन मरीन’ उभारले गेले. हेदेखील बिनलढाऊच होते. काही पाणतीर नौका मरीनला मिळाल्या. ईजिप्त व ब्रह्मदेश यांवरील आक्रमणात मरीनने वाहतुकीचे काम सांभाळले. १८९० मध्ये मुंबईत एक पाणतीर गोदी बांधण्यात आली. १८९२ मध्ये इंडियन मरीन नाव जाऊन ‘शाही हिंदी मरीन’ हे नाव मिळाले. १८९६ ते १९०४ या काळात पूर्व आफ्रिकेत व बोअर युद्धात या मरीनने बिनलढाऊ कामे केली. पहिल्या महायुद्धात मरीनच्या बिनलढाऊ नौकांचे हत्यारी नौकात रूपांतर झाले. या युद्धाच्या अखेरीस ५०० ब्रिटिश अधिकारी व १३,००० सैनिक मरीनच्या सेवेत होते. १९१८ साली लढाऊ कारवाया करण्यास मरीनला समर्थ करावे व त्यासाठी मरीनला युद्धनौका पुरवाव्या अशी ब्रिटिश शाही नौसेनेच्या कार्यालयाला अ‍ॅड्‌मिरल ऑफ द फ्लीट लॉर्ड जेलिकोने शिफारस केली; परंतु अ‍ॅड्‌मिरल मॉवबी याच्या नेमणुकीशिवाय दुसरी भरीव कामे पुढे ढकलण्यात आली. पुन्हा १९२५ मध्ये जनरल रॉलिन्सन, अ‍ॅड्‌मिरल सर रिचमंड व कॅप्टन हेडलम या तिघांच्या समितीने पुढीलप्रमाणे शिफारसी केल्या : मरीनऐवजी शाही हिंदी नौसेना नाव द्यावे. ४ स्लूप युद्धनौका, २ गस्ती, ४ ट्रॉलर, २ सर्वेक्षण व १ भांडार अशा १३ नौका नौसेनेत असाव्या इत्यादी. ११ नोव्हेंबर १९२८ रोजी शाही हिंदी नौसेना कार्यान्वित झाली. ध्वज ब्रिटिशांच्याच सेनेसारखा होता व त्यात एकही हिंदी अधिकारी नव्हता. सैनिक मात्र कोकणी व बंगाली होते. १९२८ साली केंद्रीय विधानसभेत हिंदी नौसेना-शिस्त कायदा विचारासाठी आला; पण तो एकमताने फेटाळला गेला. शेवटी ८ सप्टेंबर १९३४ रोजी कायदा संमत झाला व २ ऑक्टोबर १९३४ रोजी मुंबईत हिंदी नौसेना कायदेशीरपणे प्रस्थापित झाली आणि २,००० वर्षांच्या भारतीय सागरी परंपरेचे पुनरुज्जीवन घडून आले. १९३४ पासून आगामी यूरोपीय महायुद्धाची चाहूल लागली. अ‍ॅड्‌मिरल ऑफ द फ्लीट लॉर्ड चॅटफील्ड याच्या नौसेनासुधारणा शिफारशी तत्काळ मंजूर झाल्या. नौसेनेच्या वाढीस व आधुनिकीकरणास गती मिळाली. अ‍ॅड्‌मिरल सर हरबर्ट फिट्‌सहरबर्ट हे नौसेनापती झाले. राखीव व स्वयंसेवक दले उभारण्यात आली. उमेदवारांकरिता नाविक प्रशिक्षणाची सोय झाली. १९४५ अखेर हिंदी नौसेनेत १५ युद्धनौका (स्लूप, फ्रिगेट व कॉर्व्हेट) आणि ४५७ इतर पूरक नौका, ३,०४४ नाविकाधिकारी व २७,४३४ नौसैनिक होते. मुंबई, कलकत्ता, विशाखापटनम्, कोचीन व मद्रास येथे मुख्य नाविक तळ होते. विविध प्रकारच्या नाविक प्रशिक्षणाच्या संस्था पुढील ठिकाणी होत्या. पाणबुडी विरोधी अधिकारीप्रशिक्षण व संदेश दळणवळण संस्था, मुंबई; तोफखाना, कराची; अभियांत्रिकी, ठाणे व तुर्भे आणि लोणावळा; प्रशिक्षणव्यवस्था, मुंबई व कराची; रडार, कराची. दुसऱ्या महायुद्धात हिंदी नौसेनेच्या पठाण, पार्वती व सिंधू या तीन युद्धनौका कामास आल्या. १९४१ मध्ये मुंबईहून प्रमुख नौसेना कार्यालय दिल्लीला हलविण्यात आले. १८ फेब्रुवारी १९४६ रोजी मुंबई येथे नौसेनेने बंड पुकारले. युद्धानंतर नौसेनेत झालेली व होणारी सैनिककपात व भविष्यकाळाची काळजी ही बंडाची कारणे होती. हिंदुस्थानातील राजकीय असंतोषाची छायाही बंडवाल्यांवर पडली होती. शेवटी राजकीय पुढाऱ्यांनी सैनिकांची मने वळविली.

माहिती साभार : मराठी विश्वकोश

Saturday, May 24, 2014

Shaniwarwada by William Carpenter

Shaniwarwada by William Carpenter

Dated between Jun - Dec 1850

http://collections.vam.ac.uk/item/O108183/gateway-to-the-shanwar-palace-painting-carpenter-william/


Wednesday, May 21, 2014

RIP M P Anil Kumar

During 9th or 10th STD, in my English textbook, I had a chapter titled, Airborne to Chairborne.

It was an autobiographical account of a fighter pilot, who due to a tragic injury, became paralysed below his neck.

It was the most emotional prose I had ever read, and made me realise how life can turn in a second. But after the tears have been shed, your heart starts to glow. It was his will to live on which makes you realise something. No matter how harshly life treats you; You owe it to yourself, you owe it to your parents who sacrificed for you, and you owe it to every friend who believed in you, to get back up and keep on fighting.

Yesterday Flying Officer M P Anil Kumar took off on his final sortie into the sunset. Forever.

RIP Sir.
And thank you for inspiring millions like me.




Tuesday, May 20, 2014

गारगोटीयुक्त बंदुकीच्या काही भागांची नावे

गारगोटीयुक्त बंदुकीच्या काही भागांची नावे.

A. चाप - lock, इथे अर्थ "जबडा" असा आहे. चापात गारगोटी धरली जाते. तसेच याला अजून एक भाग आहे, फिरकी - screw, ज्याला फिरवून चापात ठेवलेली गारगोटी घट्ट केली जाते.
B. गारगोटी - flint. याचा वापर आगीच्या ठिणग्या काढण्यासाठी होतो.
C. घोडा - hammer/cock. (आणि आज आपण बंदुकीला घोडा म्हणतो :P )
D. चाप - trigger. लक्ष्य देण्यासारखी गोष्ट आहे की दोन वेगळ्या पुर्ज्याना एकच नाव आहे.
E. कमाण/(न) - spring. (अगदी घडाळ्याच्या स्प्रिंगला सुद्धा कमान म्हणतात)
F. पेला आणि कान - priming pan and touchhole.
बंदुकीच्या नळीतल्या दारूला पेट देण्यासाठी नळीला एक छोटं छिद्र कोरलं जातं. हा असतो "कान".
या कानाच्या समोर एक छोटंसं पोकळ भाग असतो, म्हणजेच "पेला". यात चिमुटभर दारू ठेवली जाते. पेल्यातली दारू पेटली की त्याची ज्वाला नळीत पोहोचते, आणि नळीतल्या दारूचा विस्फोट होतो.
G. नळी - barrel. बंदुकीची नळी. यात क्रमाने दारू आणि गोळी ठासली जाते.
H. याला Frizzen किंवा Steel म्हणत. याचं मराठी नाव मिळत नाही. इंग्रजी L आकाराचा हा पुर्जा आहे. याच्या उभ्या भागावर नेलकटर सारखे कानस(file) असते. यावर गारगोटी घासली की त्यातून निघणाऱ्या ठिणग्या पेल्यात पडतात. याच्या आडव्या बाजूचं काम पेल्याला झाकून त्यातील दारू खुश्क ठेवण्यापुरते होते.
टीप : चित्रामध्ये या Frizzenचा "L" आडवा पडला आहे.

Sunday, May 18, 2014

जुनी विक्रांत, नवी विक्रांत

जुनी विक्रांत, नवी विक्रांत

- विनायक तांबेकर

भारत-पाकिस्तानच्या १९७१च्या युद्धामध्ये महत्त्वपूर्ण कामगिरी बजावलेली 'विक्रांत' ही विमानवाहू युद्धनौका मोडीत काढली जाणार होती. परंतु, त्याला आता सर्वोच्च न्यायालयानेही स्थगिती दिली आहे. दुसरीकडे भारतीय नौदलाने नवी विक्रांत बनवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत. २0१७-१८मध्ये नवी आयएनएस विक्रांत नौदलात कार्यरत होईल. नवी विक्रांत पूर्वीच्याच दिमाखात पुन्हा एकदा नौदलाचे भूषण बनेल, यात शंका नाही.

भारतीय नौदलाची पहिली विमानवाहू नौका (एअरक्राफ्ट कॅरियर) आय. एन. एस. विक्रांत मोडीत निघण्याची चर्चा गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहे. १९७१ च्या भारत-पाक युद्धात महत्त्वाची कामगिरी बजावणारी 'विक्रांत' आता दिसणार नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. या युद्धनौकेवर इतिहासाला उजाळा देणारे संग्रहालय उभारावे, अशी कल्पना होती; परंतु नंतर ही युद्धनौका मोडीत काढून भंगारात देण्याची वेळ येऊन ठेपली होती. त्याविरोधात न्यायालयात याचिका दाखल केल्यानंतर न्यायालयाने 'विक्रांत जैसे थे' स्थितीत ठेवण्याचे आदेश दिलेले आहेत.
भारतीय नौदलाने ही विमानवाहू नौका ब्रिटिशांकडून खरेदी केली. त्या वेळी तिचे नाव एच. एम. एस. 'हर्क्युलिस' होते. विक्रांतची लांबी ७०० फूट, रुंदी १२८ फूट असून, तिचा १६ हजार टनांचा डिसप्लेसमेंट होता. त्या काळात १९५५ ते १९६५ ही युद्धनौका प्रचंडच समजली जात असे. विक्रांत नोव्हेंबर १९६१ मध्ये भारतात आले. त्या वेळी मुंबईच्या नौदल गोदीतील बॅलार्ड पियर येथे विक्रांतचे जंगी स्वागत झाले होते. पंतप्रधान पंडित नेहरू स्वत: या समारंभास हजर होते. विक्रांतचे पहिले कमांडिंग आॅफिसर कॅप्टन प्रीतमसिंग होते. तर, विमानाच्या विभागाचे प्रमुख लेफ्टनंट राम तहिलीयानी होते. हेच पुढे भारतीय नौदलाचे प्रमुख झाले, हा योगायोग म्हणावा का?
पूर्व, पश्चिम आणि दक्षिणेस सागराने वेढलेल्या भारत देशाच्या नौदलात कमीत कमी दोन विमानवाहू नौका असाव्यात, असे सर्वांनाच वाटत होते; परंतु विमानवाहू नौका असणे आणि त्याची देखभाल करणे फार खर्चिक काम असते. तरीसुद्धा त्यावेळचे नौदलप्रमुख व्हाईस अ‍ॅडमिरल कटारी यांच्या आग्रहाने पं. नेहरूंनी विक्रांत खरेदीस हिरवा कंदील दाखविला. भारतीय नौदलाच्या इतिहासात मराठी दर्यावर्दी अधिकाºयांचे मोठे योगदान आहे.
विक्रांत भारतात आल्यानंतर लगेचच ३ वर्षांत १९६५ चे भारत-पाक युद्ध झाले. त्या वेळी विक्रांत मुंबईच्या नौदल गोदीत रिफीटसाठी होते; मात्र पाकिस्तान मीडियाने पाक नौदलाने विक्रांत बुडविल्याचे जाहीर केले होते! विक्रांतवरच्या विमानांना मुंबईच्या संरक्षणाची जबाबदारी देण्यात आली होती. त्यानंतर १९७१ च्या बांगलादेश निर्मिती युद्धात विक्रांतने आपले योगदान चोखपणे दिले. पूर्व पाकिस्तानातून व्यापारी जहाजामधून लपूनछपून पाकिस्तानला परत जाण्याचा डाव विक्रांतच्या विमानांनी हाणून पाडला. पूर्व पाकिस्तानातील पाक सैन्याचा पराभव जेव्हा अटळ झाला. त्या वेळी त्यांच्या पुढे फक्त शरणागतीचा पर्याय होता. विक्रांतच्या सी हॉक, अ‍ॅविझे विमानांनी चिटगाव कॉक्स बझार, खुलना इ. बंदरांवर तुफान बॉम्ब हल्ले करून बंदरे निकामी केली. त्यामुळे पश्चिम पाकिस्तानला पळून जाण्याची त्यांची योजना निष्फळ ठरली. भारतीय सेनादलाच्या इतिहासातच नव्हे, तर जगाच्या इतिहासात न भूतो न भविष्यति अशी ९० हजार पाक सैनिकांची शरणागती भारतीय सेनादलाने २१ डिसेंबर १९७१ रोजी ढाक्यातील एका समारंभात स्वीकारली ! हा दिवस अजूनही भारतीय सेना विजय दिवस म्हणून साजरा करते. त्या वेळी सुरुवातीला विक्रांत अंदमान - निकोबार बेटाजवळ उभे करण्यात आले होते. त्यानंतर ते पूर्व पाकिस्तानच्या नजीकच्या समुद्रात उभे करण्यात आले. या संग्रमात नौदल अधिकाºयांनी आणि सैनिकांनी दाखविलेल्या शौर्याबद्दल २ महावीर चक्र आणि १२ वीर चक्र देऊन त्यांना गौरविण्यात आले. त्यानंतर १९९७ पर्यंत म्हणजेच सेवेतून निवृत्त होईपर्यंत विक्रांतला सागरी युद्धाची संधी मिळाली नाही. परंतु, त्या आधी विक्रांत सदिच्छा भेटीवर मध्य पूर्व आणि दक्षिण एशिया देशामध्ये जाऊन आले होते. काळानुसार विक्रांतची टरबाईन्स इंजिने आणि इतर यंत्रणा कालबाह्य आणि जुन्या होत गेल्या. या ३६ वर्षांच्या कालावधीत विक्रांतने ४ लाख ९० हजार नॉटिकल मैलांचा सागरी प्रवास केला होता. अखेर ३१ जानेवारी १९९७ रोजी समारंभपूर्वक विक्रांतला नौदलातून निवृत्त (डी कमिशन) करण्यात आले. त्याच वेळी हे जहाज मोडीत काढण्यापेक्षा यावर नौदलाचे संग्रहालय करावे, अशी कल्पना मांडली गेली. असे सांगणे सोपे आहे. परंतु या जहाजासाठी जागा, त्यावर ठेवण्याच्या वस्तू आणि त्याची देखभाल यासाठी लागणारा सेवकवर्ग, त्यांचा खर्च, तसेच संग्रहालय बघायला येणाºयांची सुरक्षितता आणि नौदल सुरक्षितता या सर्व गोष्टींचा सखोल विचार करणे गरजेचे होते. १९९८-९९ मध्ये महाराष्ट्रात शिवसेनेचे युती सरकार होते. विक्रांतवर संग्रहालय सुरू करण्यास ६५ कोटी रुपयांची गरज होती. बाळासाहेबांनी मुख्यमंत्र्यांना फोन करून निधीची तरतूद करण्यास सांगितले. दुसºया दिवशी बाळासाहेबांचा विक्रांतवर फोटो आला आणि विक्रांत वाचल्याची बातमी! हे म्युझीयम नौदलाने उभे केले. त्यामध्ये भारतीय नौदलाचा इतिहास, विमानांच्या प्रतिकृती, मिसाईल इ. हे संग्रहालय पुढे ८/१० वर्षे चालू होते. परंतु, दिवसेंदिवस म्युझियमचा देखभालखर्च वाढत होता. अखेरीस आॅगस्ट २०१३ मध्ये मुंबईच्या नौदल पश्चिम विभागाचे प्रमुख व्हाईस अ‍ॅडमिरल सिन्हा यांनी विक्रांत मोडीत काढण्याची शिफारस केंद्र सरकारकडे केली. केंद्राने ती मान्य केली आणि विक्रांत मोडीत काढण्याचा निर्णय झाला. विक्रांतवरील म्युझियम पुढे चालू ठेवण्यासाठी कोणतीही खासगी कंपनी किंवा राज्य सरकार पुढे आले नाही. कारण त्यावरील होणारा खर्च. केंद्र सरकार आणि नौदल मुख्यालयाच्या विक्रांत मोडीत काढण्याच्या निर्णयाविरुद्ध 'विक्रांत वाचवा' समितीतर्फे किरण पैगणकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली. (नोव्हे. २०१३) ती उच्च न्यायालयाने फेटाळून लावली. समितीने सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली आणि आता विक्रांत भंगारात काढण्याच्या निर्णयाला स्थगिती मिळाली आहे.
दरम्यान, विक्रांतचे नाव व परंपरा चालू ठेवण्यासाठी नौदलाने आणि केंद्र सरकारने नवीन विमानवाहू नौका भारतातच तयार करण्याचा निर्णय घेतला. जगातील फक्त ५/६ देशच एअरक्राफ्ट कॅरियरची निर्मिती करू शकतात. भारत त्यापैकी एक आहे. या विमानवाहू नौकेच्या निर्मितीसाठी आधुनिक तंत्रज्ञान, तंत्रज्ञ, स्पेशालिस्ट इंजिनियर्स, डिझायनर्स आणि खास उपकरणाची गरज असते. विक्रांतच्या देशांतर्गत निर्मितीचा निर्णय घेतल्यानंतर (१९९८- ९९) तब्बल १० वर्षांनी (२००५-२००६) कोची येथील नौदल गोदीत विक्रांत उभारणीस प्रारंभ झाला. गेले ८ वर्षे नव्या विक्रांतवर कोची गोदीत काम चालू असून, त्याची चाचणी २०१६ मध्ये होईल. त्यानंतर २०१७ मध्ये हे नवे आधुनिक पुनरुज्जीवित विक्रांत भारतीय नौदलात सामील होईल. त्यावरची विमानेही आधुनिक असतील. रशियन बनावटीची आणि भारतात निर्माण केलेली असतील. लाईट कॉम्बॅट एअरक्राफ्ट (नौदलासाठी) ही विमाने आणि हेलिकॉप्टर त्यावर असतील. या जहाजाच्या निर्मितीसाठी ४ हजार टन स्पेशल स्टील लागते. यावरून नव्या विक्रांतच्या भव्यतेची कल्पना यावी. थोडक्यात, २०१७-१८ मध्ये दोन शक्तिशाली विमानवाहू नौका आय.एन.एस. विक्रमादित्य आणि आय.एन.एस. विक्रांत आपल्या नौदलात कार्यरत राहतील. नवी विक्रांत त्याच दिमाखात पुन्हा एकदा नौदलाचे भूषण बनेल, यात शंका नाही.
(लेखक निवृत्त कर्नल आहेत.)

लोकमत मंथन, पान ४

Saturday, May 17, 2014

उपेक्षित जलदुर्ग

उपेक्षित जलदुर्ग
- अ‍ॅड. श्रीपाद भोसले

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यासाठी आरमाराची मुहूर्तमेढ रोवली त्याला आता साडेतीनशे वर्ष उलटली आहेत. महाराजांच्या द्रष्टेपणाला मुजरा करण्यासाठी जलमार्गाने दुर्गभ्रमंतीचे आयोजन ‘सेक्रेड हार्ट स्कूल, कल्याण’ व ‘गिरिविराज हायकर्स’ यांच्या सहकार्याने केले होते.
खाडी मार्गाने प्रवास करायची ही पहिलीच वेळ होती, तेव्हा थोडं कुतूहल आणि आनंद होत होता.
सकाळचे दहा वाजले होते, भरतीची वेळ झाली होती. लगबगीने आमचे आधुनिक मावळे गलबतावर आले.
शिडे उभारली गेली.
कल्याण-डोंबिवली खाडी मार्ग तसा उथळ असून ब-याच भागात खडक डोकावत असतात. हे खडक चुकवत आमचा प्रवास सुरू झाला.
डोंबिवलीच्या बंदरात दोन्ही बाजूला लाल, पिवळे झेंडे फडकत असलेल्या होड्या जणू आमचं स्वागतच करत होत्या. थोडं पुढे येताच पारसिकचा किल्ला व त्या मधोमध असलेल्या मुंब्रादेवीचं दर्शन झालं.
छत्रपती संभाजी राजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या पारसिक किल्ल्याला खाडीतून पाहताना वेगळाच आनंद होत होता.
सोबतीला खाडी किना-यावरील गर्द झाडी होती. कॅमे-यातून हा निसर्ग टिपत आमचा प्रवास सुरू होता.
आता मात्र घाई करावी लागणार होती, कारण कळवा व ठाणे या खाडीत मोठा खडक होता. हा खडक पार करायचा असल्यास भरती चुकवून चालणार नव्हते. जर भरती चुकली तर पुन्हा सात-आठ तास भरतीची वाट बघावी लागणार होती.
खडकावरील चिंचोळ्या जागेतून वाट काढत होडी पुढे जात होती. तर होडीवर असणारा तांडेल खडक चुकवण्यासाठी प्रचंड खटपट करत होता. एवढ्यात दगडावर बोट आदळल्याचा आवाज झाला. सगळे एकदम स्तब्ध झालो. लागलीच बोटीचं इंजिन बंद करण्यात आलं.
अक्षरश: पंधरा मिनिटं होडीला काठीने पुढे ढकलण्यात आले.
तांडेलाने पाण्यात उतरून बोटीची स्थिती पाहिली, पण सुदैवाने काही मोडतोड झाली नव्हती. अखेर आम्ही वाशीच्या प्रशस्त खाडीत शिरलो. एका बाजूला पारसिकची डोंगररांग व दुस-या बाजूला उंच गगनचुंबी इमारती दिसत होत्या. खाडीत
रेती काढणा-या बार्ज रांगत होत्या. संध्याकाळचे चार वाजले होते. एलिफंटा बेटाला मागे सोडत आम्ही अरबी सागराच्या कुशीत झेपावत होतो. आता आम्हाला प्रचंड मोठी मालवाहू जहाजं दिसू लागली. गेट वे ऑफ इंडियाजवळ पर्यटकांना
फिरवणा-या होड्या दिसत होत्या.
समुद्रावरचं खारं वारं अंगाला झोंबत होतं. अंधार पडता-पडता खांदेरी-उंदेरी जवळ केलं. पण बराच अंधार झाल्यानं इथं न थांबता कोर्लई व रेवदंड्याच्या पायथ्याशी छोटय़ा खाडीत नांगर टाकायचा ठरवला.
रात्रीचे नऊ वाजले होते. खाडीत असणा-या खडकांचा अंदाज घेत गलबत खाडीत शिरत होते.
दिवसभराच्या थकव्यामुळे डोळे कधी मिटले ते कळलेच नाही. पहाटे बंदरातील होड्या मच्छीमारीसाठी सागराकडे निघाल्या असताना आमची कोर्लईचा पूर्व किनारा गाठण्याची लगबग सुरू झाली. पण खडक व चिखलातून पुढे सरकता येईना. शेवटी तिथल्या होडीला हाक देऊन त्या छोट्या पडावातून किनारा गाठला. गडाच्या पायथ्याशी मोठा कोळीवाडा आहे.
येथूनच गडावर जाणारी वाट आहे. गडाची उंची शंभर मीटर एवढी आहे.
किल्ला उभा राहण्यापूर्वी ही जागा ‘चौलचा खडक’ म्हणून ओळखली जायची. काही काळ मराठ्यांचा तोफा बनवण्याचा कारखाना याच किल्ल्यावर होता. आजही गडावर गंजलेल्या तोफा पाहायला मिळतात. तटा-बुरुजांमध्ये झाडेवेली वाढल्याने तटबंदी ढासळत असल्याचे दिसत होते.
हिंदवी आरमाराचे काही काळ असलेलं हे ठाणं पाहून आम्ही पद्मदुर्ग-जंजि-याच्या प्रवासाला निघालो. भूमार्गाने कोर्लई ते मुरुड अंतर साधारण सत्तावीस किमी आहे. सागरी प्रवासात मात्र भरती-ओहोटीचं भान राखणं महत्त्वाचं असतं.
अखेर दुपारी दोन वाजता दांडा-राजापुरी जेटी येथे पायउतार झालो. तिथे जमलेल्या कोळ्यांच्या शुभेच्छा स्वीकारून आम्ही सुवर्णदुर्गच्या दिशेने गलबत हाकारलं.
या टप्प्यात आम्हाला डॉल्फिनची सोबत होती. त्यांचे भरपूर फोटो काढता आले.
सुर्वणदुर्ग गाठल्यावर सामोरे आलेल्या राजेश लिंगायत यांची आम्हाला मोलाची मदत झाली. किल्ला आमच्या बरोबर स्वत: फिरायला आले. एकेकाळी स्वराज्यातील महत्त्वाचा आरमारी किल्ला असलेल्या या जलदुर्गात आता भरपूर रान माजले आहे. दुर्गप्रेमी वगळता इतरांकडून दुर्लक्षित अवस्थेतील हे जलदुर्ग आज उपेक्षित आहेत, याचीच खंत मनात घेऊनच जड पावलांनी परतीची वाट धरली.

PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS: 10 March, 2010
http://archive.prahaar.in/dil_se/21282.txt

Friday, May 16, 2014

Krishnarao (Babasaheb) Dhulap II - कृष्णराव (बाबासाहेब) धुळप, दुसरे

Krishnarao (Babasaheb) Dhulap II - कृष्णराव (बाबासाहेब) धुळप, दुसरे

Great grandson of Aanandrao Dhulap. He succeeded to the Jagir and Inam of Vijaydurg in 1874 after the death of his father Raghunathrao Dhulap.
Image must be from (or before) 1912.

आनंदराव धुळप यांचे पणतू. वडील रघुनाथराव यांच्या निधनानंतर, १८७४ साली, हे विजयदुर्ग येथील इनाम आणि जहागिरीचे धनी झाले.
छायाचित्र अंदाजे १९१२ किंवा त्या आधीचे असावे.

संदर्भ : मराठा कुलांचा इतिहास, १९१२

Thursday, May 15, 2014

Kanhoji Angre - Manohar Malgaonkar | कान्होजी आंग्रे - मनोहर मळगावकर

१८व्या शतकाच्या सुरुवातीला जमिनीवर कोणाचीही सत्ता असो. खंदक आणि भिंतीच्या बंदोबस्ताआड असणाऱ्या व्यापारी वसाहतीवर कोणाचीही मालकी असो. पण कोंकणच्या पाण्यावर सत्ता कोणाची होती यात दुमत नव्हतं.
सत्ता होती ती फक्त "कान्होजी आंग्रे" यांचीच.....

कान्होजी आंग्रे- मनोहर मळगावकर
, अनुवाद - पु.ल. देशपांडे



Wednesday, May 14, 2014

An unknown piece of Indian Maritime History

Yesterday I attended a lecture by Prof. Ranabir Chakravarti. The subject was "India and the Indian Ocean: Issues in the History of Politics (upto c. 1500 CE)."

Beginning from Mauryas he takes us through Satavahanas, Kadambas, Shilaharas, right upto Vasco da Gama's arrival at Calicut.

One of the most interesting things which I learned here was about a manuscript by Guillelmus Ade (William of Adam), titled "Tractatus quomodo Sarraceni sunt expugnandi." Which is a latin treatise roughly translated as "How to Defeat the Saracens." 'Saracens' here being the Mamluk Sultanete of Egypt in particular, and Arabs of Middle East in general.

The treatise, which is very polemical in nature, lays a five-fold strategy to destroy the Saracens and capture the holy land. Each of these strategies are elaborated in great detail in independent sections. The last and the most interesting strategy of these is an excellent example of naval strategy, probably on par with R.Adm Alfred Mahan, or Sir Julian Corbett.

Why is it "the most interesting" of the lot? Check out the two quotes from the text below.

"No one questions how great a profit the Saracens of Egypt derive from India by the maritime trade across the ‘Indian sea’ (mari Indico)."
// Note - 'Indian' not 'Arabian' sea.

"For all of the things that are sold in Egypt, such as pepper, ginger and other spices; gold and precious stones, silk and those precious materials dyed with the colors of India; and all other precious things are carried from India to Egypt. .... Therefore, anyone can observe, as I said before, that India is truly and effectively, and not casually or occasionally, the source of all the evils which I described above."

It should be noted that the author was not some tom-dick-&-harry who had an over-inflated opinion of his own skills. He was a Dominican Friar at the beginning of his career. And had lived at Smyrna (Aegean Sea), Constantinople (1307), Syria, and Sultanieh (in Persia under Ilkhanid rule). By his own admission he had " traversed the entire empire (of Persia) as far as it extends."

Prof. Chakravarti has rightly titled this section "Blueprint of a Naval Blockade". This entire treatise was intended for the Pope's eyes. One among many such similar treatises produced during that era. However, nothing seems to have been done about this.

There's quite a lot to write on this subject, but I'll end here. To read more on the subject, please go through the links below.

An article by Prof Chakravarti concerning the above mentioned text -
INDIA AND THE WESTERN INDIAN OCEAN: GLEANINGS FROM A FOURTEENTH CENTURY LATIN CRUSADE TRACT
http://jhss.org/articleview.php?artid=221

Sample preview of ebook -
How to Defeat the Saracens, William of Adam; Text and Translation with Notes. - by Giles Constable
https://www.academia.edu/5929775/How_to_Defeat_the_Saracens_William_of_Adam_Text_and_Translation_with_Notes

Prof. Ranabir Chakravarti's Academia account.
https://independent.academia.edu/RanabirChakravarti

गाबती/गाबीत

गाबती/गाबीत -

या जातीची लोकसंख्या (१९११) २४,८१८. रत्नागिरी व कानडा जिल्ह्यांतील समुद्रकांठचा प्रदेश व सांवतवाडी संस्थान येथें हे लोक आढळतात. यांचीं गाबीत किंवा ग्राबती अशींहि दुसरी नांवे आहेत. गाबती हें नांव पडावयाचें कारण असें सांगतात कीं शिवाजी महाराजांनीं आरमार तयार केलें. त्यावेळीं त्यांत तिर्कटीतारूं, गलबत, मचवा, पडाव, शिबाड, होडी, डोण, पगार व ग्राब अशीं निरनिराळीं गलबतें होती. ग्राबजहाज हें लढाऊ असे. त्यावर तोफा असत. ग्राब (गुराब) हा आरबी शब्द आहे. त्याचा अर्थ गनबोट होय. या ग्राबावर जे लढाऊ मराठे कोंकणी नोकर राहिले ते हे ग्राबती होत. गाबीत हा शब्द खरा नाहीं (हा सेन्सस रिपोर्टांत येतो.) ग्राबती व गाबती एकच. आम्हीं कोंकणी मराठे असून आमचे पूर्वज पूर्वी शिवाजीच्या आरमारखात्यांत नोकर होते असें हे म्हणतात. म्हणून जैतापूर, विजयदुर्ग, देवगड, मालवण, वेंगुर्ले या पूर्वीच्या आरमाराच्या ठिकाणीं यांची वस्ती जास्त आहे. पेशवाई बुडाल्यानंतर त्यांनीं कोळ्याचा धंदा सुरू केला असें म्हणतात. १७६० च्या अगोदर व त्यानंतर सुमारें ४० वर्षेपर्यंत हे लोक दर्यावर्दीपणाचा धंदा करीत होते. यांच्या बायकामुलांनीं (पुरुष आरमारावर नौकर असल्यामुळें) शेजारी रहात असलेल्या कोळ्यांचा धंदा व मोलमजुरी करण्यास प्रारंभ केला. त्यामुळें मराठे व या लोकांचा संबंध दुरावला. साठसत्तर वंर्षापूर्वी मराठ्यांचा व यांचा रोटीबेटीव्यवहार असे पण हल्ली नाहीं. त्यावेळीं मालंडकर परब (ग्राबती) यांची मुलगी विजयदुर्गाच्या धुळपांकडे दिली होती असें म्हणतात. यांचीं आडनांवेंहि मराठ्यांच्या आडनांवांची आहेत. वेंगुर्ले येथें कुबल आडनावांचीं पांच घराणीं असून त्यापैकीं चार मराठे व एक गाबती आहे. मानमरातब पंचांनांहि सारखाच मिळतो. हुद्यांचीं दर्शक आडनांवें यांच्यांत आहेत तीः- तांडेल, साततांडेल, पडतांडेल, फडतांडेल, तिळतांडेल, मायनाक, नाईक, पडनाईक, फडनाईक, महालनाईक, मुकनाईक, सारंग, मोठेसारंग, बुड्ये इत्यादि. या लोकांमध्यें कुळें व देवकें आहेत व त्यावरून ते मूळचे मराठे असण्याचा फार संभव दिसतो. मासे पकडून विकणें व दर्यावर्दीपणा करणें हे त्यांचे परंपरागत धंदे होत. यांमध्यें गोत्रेंहि आहेत. परंतु त्यांचा उपयोग होत नाहीं. विवाहाच्या चालीरीति वेगवेगळ्या आहेत. यांच्या गलबतांवरील विशिष्ट दोर्‍यांचीं नांवे शिवाजी, संभाजी, शाहू, गाई, वासरूं अशीं असतात. पन्नास वर्षांपूर्वीपर्यंत यांच्या गलबतावर तोफा असत. त्यावेळीं महादू बुदबाराव कुबल नांवाच्या गृहस्थाच्या हातून तोफेच्या अपघातानें एक बाई मेल्यामुळें तेव्हांपासून तोफा ठेवण्यास बंदी झाली. ग्राब ठेवण्याच्या जागेस गुराब देवणें म्हणतात. यांची कुलदैवतं महादेव व पार्वती होत. यांच्या सर्व चालीरीती मराठ्यांप्रमाणेंच आहेत असें म्हणतात. कुळांवरून लग्नें ठरतात. कळंब, आंबा वगैरें देवकें यांच्यांत आहेत. आतेबहिणीशीं लग्न करण्यास उलट सांखळी म्हणतात. लग्नाच्या वेळीं नव-याच्या डोक्यावर उलट धार करून शस्त्र धरतात. लग्नानंतर वधुवर कोण्या तरी इष्ट मित्राच्या घरीं पाहुणचारास जातात. तेथें रात्रीं एकांतांत वरास आपली अंगठी वधूस द्यावी लागते. लग्नाच्या वेळीं वरास जानवें देतात. पुढें धंद्याच्या गैरसोयीमुळें तें खुंटीस ठेवतात. विवाहादि सर्व संस्कार ग्रामजोशी ब्राह्मण उपाध्याय करतो. या जातीच्या रखेलीपासून झालेली संतति मराठा जातींत मोडते; त्यांची निराळी जात नाहीं. मात्र अशा पहिल्या पिढीस बंदा म्हणतात व त्यापुढील संतति आस्ते आस्ते पक्क्या मराठ्यांत मोडते. त्यांच्यापैकीं कांही वारकरी व रामदासी पंथाचे आहेत. यांच्या गांवोगांवी पंचायती होत्या व सर्वसाधारण पंचायत मालवणास होती. तिचा अध्यक्ष वंशपरंपरेचा असतो. हल्ली फार थोड्या पंचायती शिल्लक आहेत. पूर्वी निवाडे लिहून ठेवण्याची पद्धति होती. निकाल न पाळल्यास गुडगुडी, पाणी, विस्तव, रोटीव्यवहार हे बंद करणें किंवा दंड करणें या शिक्षा असत. कांहीं गांवी जातीचीं मालकीचीं देवस्थानें आहेत. जातीचा कर नाहीं. ब्राह्मण, मराठे व वाणी यांच्या बरोबर यांचा अन्नोदकव्यवहार चालतो. यांच्यांत पोटजाती नाहींत. संकेश्वर मठ हा या जातीच्या धर्मगुरूचा मठ होय. यांच्यांत दोन शिक्षणविषयक फंड आहेत. या जातीबद्दल एन्थॉलॉजिकलसर्व्हे डिपार्टमेंटकडून चौकशी होत असतां ''आमच्या जातीपैकीं कोणाहि गृहस्थाचा सल्ला घेण्यांत आला नाहीं; उलट प्रतिस्पर्धी जातीकडून भलती नालस्ती करणारी चुकीची माहिती मिळवून सरकारनें मोनोग्राफ छापला. तो छापला गेल्यावर जातींतील पुढार्‍यांनीं एन्थॉ. डिपार्टमेंटला अर्ज करून त्यांत केलेल्या खोट्या विधानांबद्दल तक्रार केली व खरीखुरी माहिती पुराव्यानिशीं सादर केली. परंतु मोनोग्राफ पूर्वीच छापून निघाल्यामुळें त्याचा कांहीच उपयोग झाला नाहीं.'' असें रा. कृ. वि. कुबल म्हणतात. (सेन्सस ऑफ इंडिया १९११ व्हॉ. ७; रा. कृ. वि. कुबल यांनीं पुरविलेली माहिती.)

साभार : केतकर ज्ञानकोश

Tuesday, May 13, 2014

आरमाराचे सुभेदार धुळप यांच्या घराण्याची त्रोटक माहिती

आरमाराचे सुभेदार धुळप यांच्या घराण्याची त्रोटक माहिती.

धुळप यांचें मूळचें उपनांव मोरे, हे मूळ उत्तर हिंदुस्थानांतील रहिवासी. ह्या घराण्यांतील परसोजी बाजी व जयाजी बाजी या उभयतां बंधूंनीं सह्याद्रीच्या पूर्वेस कृष्णा व वारणा या दोन नद्यांच्या मध्यें जावळीं व त्याच्या सभोंवतालचा मुलूख काबीज करून, जावळी हें आपल्या राहण्याचें ठिकाण केलें. परसोजीस पांच पुत्र झाले. (१) हणमंतराव, (२) बागराव, (३) कमलराव, (४)सुर्याजीराव व (५) चंद्रराव. जयाजी हा निपुत्रिक होता. शिवाजीच्या कारकीर्दीत चंद्रराव, सूर्याजीराव व हणमंतराव ह्या त्रिवर्गांचा शेवट झाला, नंतर हणमंतराव याचे मुलगे खेमाजी व चायाजी; बागराव याचा प्रतापजी; सुर्याजीराव याचा दादाजी; व चंद्रराव याचा बाळाजी येणेप्रमाणें मोरे घराण्यांतील मंडळी स्वसंरक्षणार्थ विजापूरच्या बादशहाच्या आश्रयास जाऊन राहिली. वरील सहा जणांनीं विजापूरकरांच्या वतीनें समशेर गाजविल्यामुळें, बादशहानें खुष होऊन `धुळप’ असा बहुमानाचा किताब दिला, अशी माहिती मिळते. विजापूरकर व शिवाजी यांच्या झटापटींत या मोऱ्यांपैकीं-धुळपांपैकीं बरीच मंडळीं कामास येऊन, शेवटी छत्रपतींच्या धाकानें अवशिष्ट मंडळी वाट फुटेल तेथें जाऊन राहिली (हणमंतराव व चंद्रराव यांचे वंशज धवडे बंदरीं, बागराव यांचे दुदुशी दुदगांवीं, सूर्याजीराव यांचे वसईस व कमळराव यांचे बीरवाडीत गेले).

ह्या घराण्याचा यापुढील पाऊणशें वर्षांचा इतिहास उपलब्ध नाहीं. इ. स. १७५६ मध्यें तुळाजी आंग्रे यास कैद केल्यानंतर पेशव्यांनीं विजयदुर्ग येथें आपल्या प्रत्यक्ष अधिकाराखालीं आरमाराचें मुख्य ठिकाण करून त्यास सुभा आरमार अशी संज्ञा दिली. या आरमारावर मुख्य अधिकारी एक असून त्यास सुभेदार निसबत सुभा आरमार असें म्हणत. इ. स. १७६४ मध्यें हणमंतराव मोरे यांचे वंशज आनंदराव धुळप या दर्यायुद्धांत नाणवलेल्या गृहस्थाकडे मराठ्यांच्या आरमाराचें आधिपत्य आलें. इ. स. १७९४ पर्यंत म्हणजे जवळ जवळ ३० वर्षे आनंदराव हाच सुभ्याचा प्रामुख्येंकरून कारभार आटपीत असे (आनंदरावाची हकीकत ज्ञानकोश विभाग ७ यांत त्याच्या नांवाखालीं पृ. १५३ वर पहा.). आनंदरावाप्रमाणेंच हरबाजीराव, जानोजीराव इत्यादि धुळप मंडळींनीं आरमाराची उत्कृष्ट कामगीरी करून पेशव्यांकडून वेळोवेळीं बक्षिसेंहि मिळविली. इ. स. १८१८ मध्यें पेशवाई नष्ट झाल्यानंतर त्याच्या वंशजांस इंग्रजांनीं `पोलिटिकल पेन्शन’ करून दिलें. श्री. कृष्णराव रघुनाथराव ऊर्फ बाबासाहेब या घराण्याचे विद्यामान वंशज हल्लीं विजयदुर्ग येथें राहतात.विजयदुर्ग येथील किल्ला, गोदी, वगैरे स्थलें प्रेक्षणीय आहेत. थोरले माधवराव पेशवे यांनीं स. १७७४ त जानोजी धुळप यास दक्षिणेंत स्वारीस पाठविलें होतें. इ. स. १७७५ मध्यें महीच्या पैलतीरी हरिपंत फडके व दादासाहेब यांचें युद्ध झाल्यावर पेशव्यानें जानराव धुळप यांस सांगितलें कीं दादासाहेब मुरतेकडून जाहाजांतून जलमार्गे एखादेंकडे जातील, याची बातमी व बंदोबस्त ठेवून, प्रसंगीं त्यांशीं गांठ घालून हस्तगत करून घेणें. ले. प्रूएन वगैरे इंग्रजांशीं झालेल्या दर्यायुद्धांत (१७८३ एप्रिल) धुळपांनीं फार पराक्रम केला. त्याबद्दल पेशव्यांनीं त्यांस बक्षीसें दिलीं. [भा.इ.मं. अहवा. १८३३; लो.- हिस्टरी ऑफ धि नेव्ही; स्टेट पेपर्स बाँबे.]

साभार : केतकर ज्ञानकोश.

टीप : वरील माहिती हि दुसऱ्या महायुद्धा आधी लिहिलेली आहे. त्यामुळे यात नवीन माहिती नाही आहेत.

Dahisar gavdevi - दहिसर गावदेवी

ही माहिती आमच्या दहिसरच्या गावदेवी मंदिराबाबत मिळते.

"फार वर्षांपूर्वी वसईचे शूर चिमाजी आप्पा यांना स्वप्नात देवीच्या शिलामुर्ती दिसल्या. त्या मुर्त्या होत्या श्री वर्धकनी देवी व दोन रक्षक श्री शिंदोबादेव आणि श्री कोल्हापूर देव. त्यांना ज्या ठिकाणी दिसल्या त्याच ठिकाणी मुर्त्या सापडल्या व त्यांनी त्याच ठिकाणी त्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली. कालांतराने हि देवी संपूर्ण दह्हीसार परिसराची श्री गावदेवी म्हणून मानली गेली."

Sunday, May 11, 2014

The Bombay Governor's residence

The Bombay Governor's residence

This building was originally a Portuguese Franciscan friary, completed in 1673 and taken over by Governor Boone in 1719 as a country residence after which it became the official summer home of Governors of Bombay, and Parel developed as an affluent district.
In 1771, when William Hornby resided here as Governor, it became the new Government House in place of the original one in the Fort. The banqueting hall and ballroom are housed in the shell of the original vaulted chapel, and were much admired for their splendour.
Several mills now sprang up on the newly-reclaimed flats around Parel and the ensuing congestion and pollution resulted in the shifting of the Governor's residence to a new Government House at Malabar Point. After the plague epidemics in the 1890s, the house at Parel was converted into the Haffkine Research Institute.

Saturday, May 10, 2014

सफर जलदुर्ग पद्मगडची - सदानंद कबरे

सफर जलदुर्ग पद्मगडची - सदानंद कबरे

लांबरुंद समुद्रकिनारे आणि नितळ पाणी हे मालवणच्या समुद्रकिना-याचं वैशिष्टय आहे. नैसर्गिक देखणेपण लाभलेल्या या समुद्रकिना-यावर पद्मगड हा जलदुर्ग दिमाखात उभा आहे. परकीय शत्रूंपासून कोकणपट्टय़ाचं संरक्षण व्हावं याकरिता सतराव्या शतकात पद्मगडाची निर्मिती करण्यात आली. मालवणात सहलीला जाणारे पर्यटक सहसा या किल्ल्याची फेरी चुकवत नाहीत..
सागरी सुरक्षेच्या दृष्टीने सिंधुदुर्गाचं महत्त्वाचं भौगोलिक स्थान शिवरायांनी ओळखलं होतं. त्यांनी सतराव्या शतकात मालवणच्या सागरतीरावर तीन जलदुर्गाची निर्मिती केली. ते जलदुर्ग म्हणजे पद्मगड, राजकोट आणि सर्जेकोट हे होत. या तिन्ही जलदुर्गापैकी पद्मगड पाहण्यासाठी भटक्यांची गर्दी होते. पद्मगडाची भौगोलिक रचना खासच आहे. मालवणच्या समुद्रकिना-यावरून सिंधुदुर्गाकडे पाहिल्यास डावीकडे ‘पद्मगड’ तर उजव्या किना-याच्या भूशिरावर ‘राजकोट’ आहे. सर्जेकोट मालवण किना-यापासून चार किलोमीटर अंतरावर आहे. समुद्राला ओहोटी आल्यावर सर्जेकोटापासून पद्मगडाला चालत जाता येतं.

पद्मगडाकडे जाताना किना-यावर दांडगेश्वराचं मंदिर लागतं. या मंदिराच्या समोर सिंधुदुर्गाकडे समुद्रात शिरलेली वाळूची पुळण दिसते. मागे आलेल्या त्सुनामीचा धक्का या मालवण समुद्रकिना-याला बसला होता. त्या वेळी सिंधुदुर्गाकडच्या मधल्या भागातील सर्व पूळणच वाहून गेली होती. त्यामुळे या भागात मोठया प्रमाणात खोलगट भाग तयार झाला होता. तेव्हा ओहोटीच्या वेळीसुद्धा पुरुषभरापेक्षा जादा उंचीचं पाणी भरायचं. त्या वेळी एखाद्या होडीनेच पद्मगडाकडे जावं लागायचं. गेल्या काही वर्षात पाणी पुन्हा साठल्यामुळे ओहोटीच्या वेळी कमरेएवढया पाण्यातून जावं लागायचं.

मालवणच्या धक्क्यापासून पद्मगडापर्यंत येण्यासाठी साधारण अर्धा तास लागतो. रचिव दगडांनी पद्मगडाची तटबंदी उभारलेली आहे. याचा दरवाजा बरोबर सिंधुदुर्ग किल्ल्याच्या दरवाजासमोरच आहे. किल्ल्याच्या लहानशा दरवाजातून आत गेल्यावर वेताळ मंदिर आहे. मालवणच्या कोळी बांधवांचं श्रद्धास्थान असल्याने त्यांची येथे नित्यनेमाने ये-जा चालू असते. त्यामुळे वेताळाची नियमित पूजाअर्चाही होते. पद्मगडाचा उपयोग शिवकाळामध्ये गलबतांच्या दुरुस्तीसाठी केला जायचा. त्यासाठी भरती ओहोटीच्या वेळा साधून या खडकाळ बेटावरील धक्क्यावर गलबतं आणली जायची. या गोदीत दुरुस्त झालेली अथवा नव्याने बांधलेली मध्यम आकारची गलबतं भरतीच्या वेळी बाहेर काढून सागरात दाखल व्हायची.

माहिती साभार : Prahaar
लिंक : http://prahaar.in/feature/bhannat/131795

सदर छायाचित्र श्री संतोष पेडणेकर यांच्या ब्लॉग येथून घेण्यात आले आहे. तसेच या छायाचित्राचे सर्व हक्क त्यांच्याकडे राखीव आहेत.
आपण त्यांच्या ब्लॉगला खालील लिंकद्वारे भेट देऊ शकता.
http://santoshpednekar.wordpress.com/page/82/

Friday, May 9, 2014

भंडारी

नौकानयन व बरकंदाजी हे भंडारी लोकांचे पंरपरागत धंदे होत. समुद्रावरील सर्वांत मोठा अधिकारी 'महानायक' या पदवीचा असे. ‘महानायक’ या पदवी अगर अधिकारदर्शक नांवाचें 'मायनाक' हें अलीकडील रूप भंडा-याच्या आडनांवांत सांपडतें. कीर, पांजरी, नामनाईक-नांबनाईक (नौकानाईक), सारंग, तांडेल हीं भंडारी लोकांचीं आडनांवें देखील प्राचीन नौकानयनदृष्ट्या अशींच महत्त्वाचीं आहेत. होकायंत्राचा शोध लागला नव्हता अशा काळीं प्रत्येक तारवावर दूरवर उडून जाणा-या पक्ष्यांचा एक पिंजरा भरून ठेवलेला असे. समुद्रकिनारा सोडून तारवें दूरवर गेलीं, व दोन्हीं बाजूंचे तीर दिसेनासें झालें म्हणजे किनारा शोधून काढण्यासाठीं कीर नांवाचा तारवावरील अधिकारी या पिंज-यांतून दोन दोन तीन तीन पक्षी बाहेर सोडून देई. हे पक्षी आपल्या स्वाभाविक गुणांप्रमाणें किना-याकडे उडून जात. व किनारा बराच दूर असला म्हणजे संध्याकाळपर्यंत आकाशांत भ्रमण करून परत तारवावर येत. या त्यांच्या जाण्यायेण्याच्या मार्गाचें नीट धोरण राखून कीर तारूं हाकरण्याची इशारत देत असे. पांजरी या अधिका-याचें काम, राजांच्या गलबतावरील डोलकाठीच्या पिंज-यांत उभे राहून शत्रूंच्या जहाजांची टेहळणी करण्याचें असे. सारंग नांवाच्या अधिका-याला वारा कसा व कोणत्या दिशेनें वाहतो, कोठें खडक आहेत, तुफान वगैरे होण्याच्या पूर्व चिन्हांचीं व आकाशांतील नक्षत्रांची पूर्ण माहिती असावी लागे. तांडेल हा इतर खलाशी लोकांवरील मुख्य असे. लढाऊ जहाजांवरील मुख्य नांवनाईक किंवा नामनाईक असे. रत्नागिरी जिल्ह्यांतील विजयदुर्ग येथील जावकर घराण्याच्या मूळ पुरूषास, त्यानें जावा बेटांत कित्येक सफरी केल्या व तेथें जमीनजुमलाहि संपादिला होता म्हणून 'जावकर' म्हणूं लागले असें सांगतात. तेराव्या शतकांतदेखील. पश्चिमकिना-यावर भंडारी लोक समुद्रावर चांचेगिरी करून परकीय व्यापा-यांनां मनस्वी त्रास देत होते. शिवाजी महाराजानीं आरमार ठेविल्यावर चांचेगिरी करण्याचें सोडून बरेच भंडारी व कोळी लोक महराजांच्या सेवेत राहिले. महाराजांचा पहिला समुद्रसेनापति होण्याचा मानहि 'मायनाक' आडनांवाच्या भंडा-यासच मिळाला होता (१६४५ ते १६९०). दर्यासारंग, उदाजी पडवळ व सांवळ्या तांडेल नांवाचे दुसरे समुद्रसेनापतीदेखील भंडारीच होते. आंग्र्याच्या सरदारांत मायाजी भाटकर, इंद्राजी भाटकर, बकाजी नाईक, हरजी भाटकर, सारंग जावकर, तोंडवळकर आणि पांजरी वगैरे भंडारी होते (१६९० ते १७६०). त्याचप्रमाणें धुळपांच्या अधिकाराखालीं दामाजी नाईक कुवेसकर, शिवाजीराव सुर्वे, विठोजी नाईक बांवकर, अनाजी नाईक बोरकर, रायाजी नाईक बोरकर, गणोजी नाईक भाटकर, विठोजी नाईक पनळेकर, गोविंदराम बाबूराव सांळुख्ये व दरजी नाईक पाटील (१७६० ते १७९०) वगैरे सरदार भंडारी ज्ञातीचे होते. करवीर दरबारच्या मालवणच्या सरदारांत दादाजी नाईक तोंडवळकर हे भंडारी सरदार प्रमुख होते (१७८१ ते १७८२).

संदर्भ : केतकर ज्ञानकोश


टीप : वरील माहिती हि दुसऱ्या महायुद्धा आधी लिहिलेली आहे. त्यामुळे यात नवीन माहिती नाही आहेत.

Thursday, May 8, 2014

'गोपाळगड' राज्य संरक्षित कधी?

यशवंतगडासारखा प्रकार गोपाळगडासोबत सुद्धा होणार आहे बहुतेक.

सरखेल संभाजी आंग्रे यांच्या अकाली निधनामुळे सरखेलपद कोणास द्यावे हा प्रश्न निर्माण झाला होता.
शाहूछत्रपतींनी जाहीर आव्हान केले की, जो कोणी जंजिऱ्याच्या सिद्दी कडून अंजनवेल आणि गोवळकोट जिंकून घेईल त्याला सरखेलपद दिले जाईल.

हा विडा तुळाजी आंग्रे यांनी उचलला. त्यांनी दोन्ही किल्ले जिंकले. हर्षित झालेल्या शाहूछत्रपतींनी या दोन्ही किल्ल्यांना नविन नावे दिली.

अंजनवेल -> गोपाळगड
गोवळकोट -> गोविंदगड 

Monday, May 5, 2014

Sunday, April 27, 2014

विक्रांतसाठी टेक्नोसॅव्ही लढा!

विक्रांतसाठी टेक्नोसॅव्ही लढा! - व्ह्यू अँण्ड व्हिजन
- आनंद खर्डे, दैनिक लोकमत : पान ६, मुंबई आवृत्ती.

भारत-पाकिस्तान युद्धात महत्त्वपूर्ण कामगिरी बजावणारी 'आयएनएस विक्रांत युद्धनौका' वाचविण्यासाठी आता 'टेक्नोसॅव्ही' लढा सुरू करण्यात आला आहे. इतिहास संशोधक आनंद खर्डे यांनी यासाठी पुढाकार घेतला असून, इंटरनेटवर एक विशेष लिंक तयार करण्यात आली आहे. या लिंकवरील पाठिंब्याने चक्क ११ हजारांचा आकडा गाठला आहे. याच पार्श्‍वभूमीवर इतिहास संशोधक आनंद खर्डे यांच्याशी 'व्ह्यू अँण्ड व्हिजन' च्या माध्यमातून साधलेला हा संवाद खास 'लोकमत'च्या वाचकांसाठी...

* विक्रांतची सद्य:स्थिती काय?
जानेवारी १९९७ मध्ये विक्रांत युद्धनौका सेवेतून नवृत्त झाली होती. नवृत्त झाल्यानंतर मुंबईच्या समुद्रकिनार्‍यावर विक्रांतचे संग्रहालय करण्यात आले होते. शिवाय विक्रांत सांभाळण्याची जबाबदारी राज्य सरकार आणि नौदलाकडे होती. मात्र आता राज्य सरकारने विक्रांत ६० कोटींना भंगारात काढली आहे.* सध्या ती गुजरातमधील अलंग बंदरात उभी आहे. विक्रांतचे संग्रहालयात रूपांतरण करण्यासाठी अवघ्या ३०० कोटींची आवश्यकता आहे. यासाठी केंद्र सरकार, राज्य सरकार आणि स्थानिक स्वराज्य संस्थांसह उद्योगपती, राजकारण्यांसह प्रत्येकाने थोडाफार हातभार लावला तर विक्रांत भंगारात जाणार नाही.

* मोहीम ऑनलाइनच का?
भारतात तरुणवर्गाची संख्या अधिक आहे. हे सर्वच तरुण इंटरनेटशी जोडलेले आहेत. विक्रांतला वाचविण्यासाठी उर्वरित माध्यमांतूनही प्रयत्न सुरू आहेत. यासाठी ...
http://chn.ge/QaBJGu 
... ही लिंक इंटरनेटवर सुरू केली आहे. तुम्ही जगात कुठेही असला तरी या लिंकवर जाणे सहज सोपे आहे. आणि आता तर तळहातावर मावणार्‍या मोबाइलवरही इंटरनेट आहे. म्हणून सर्वांना सामावून घेण्यासाठी इंटरनेटचा आधार घेण्यात आला आहे.

* संकल्पना कशी सुचली?
'आयएनएस विक्रांत युद्धनौका' वाचविण्यासाठी अखेरचा प्रयत्न म्हणून सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यात आली आहे. स्वाक्षरी मोहीम म्हटले की प्रत्यक्ष लोकांपर्यंत पोहोचणे कठीण होते. मात्र इंटरनेट हे त्यासाठी साधे, सोपे आणि सरळ माध्यम आहे. आणि आता तर जगातील सर्वच देश इंटरनेटने एकमेकांशी जोडले गेले आहेत. म्हणून हा 'टेक्नोसॅव्ही' लढा सुरू करण्यात आला आहे. एका दिवसात त्यावर तब्बल पाच हजारांहून अधिक लोकांनी लिंकवर पाठिंबा दिला आहे. आणि आता तर या पाठिंब्याने चक्क ११ हजारांचा आकडा गाठला आहे.

* भारतीयांना कसा पाठिंबा देता येईल?
साधे, सोपे आणि सरळ आहे. एकतर भारतीयांना स्वाक्षरी मोहिमेत सहभागी होता येईल. दुसरे म्हणजे यासंदर्भातील प्रकाशित झालेले वृत्त अपलोड करता येईल. तिसरे विक्रांतसंदर्भातील उपलब्ध असणारी माहिती अपलोड करता येईल. चौथे उपलब्ध असणारी माहिती ई-मेल करता येईल. आणि पाचवे म्हणजे विक्रांतला वाचविण्यासाठीच्या प्रतिक्रिया देता येतील. एवढे केले तरी पुरे होईल. दिवसातल्या २४ तासांपैकी प्रत्येकाने आपले ३० सेकंद दिले तरी पुष्कळ होतील. आतापर्यंत जगभरातून या मोहिमेला पाठिंबा मिळत आहे. अगदी सांगायचे झाले तर अमेरिका, युरोप, बांगलादेश, इजिप्त आणि कॅनडा येथून 'टेक्नोसॅव्ही' लढय़ाला पाठिंबा मिळत आहे.

* पाठिंब्याचे तुम्ही काय करणार?
मी काय करणार? हा प्रश्नच नाही. आपण काय करणार; हा प्रश्न आहे. फक्त ३०० कोटी आवश्यक आहेत. आणि प्रत्येक भारतीयाने मनात आणले तर आपण एका दिवसात ३०० कोटी उभे करू शकतो. हा झाला पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा असा की; मी नाही तर आपण काय करणार? या लिंकवर जेवढी काही माहिती अपलोड होत आहे ती माहिती राष्ट्रपती, सर्वोच्च न्यायाधीश आणि संरक्षण मंत्रालय यांना पाठविली जाईल. म्हणजे विक्रांतसाठी आपण किती तळमळीने काम करत आहोत; हे त्यांच्या ध्यानात येईल. आपला लढा त्यांना समजेल. सर्वात म्हणजे विक्रांत वाचविण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर २९ एप्रिल रोजी सुनावणी आहे. त्यामुळे लढय़ाला सर्वच अर्थाने पाठबळ आवश्यक आहे.

* राजकारण्यांनी काय करावे?
आता विक्रांत जिथे उभी आहे; त्या स्थळाला काही राजकीय पक्षांनी भेटी दिल्या होत्या. मात्र फक्त भेटीच दिल्या. प्रत्यक्षात केले काहीच नाही. 'दादरला हेरिटेजचा दर्जा देण्याऐवजी विक्रांतला द्यावा,' असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्य सरकारला काही महिन्यांपूर्वी केले होते. शिवाय 'विक्रांत नव्हे तर देशाची अस्मिताच हे सरकार लिलावात काढू पाहत आहे. देशाच्या संरक्षणामध्ये ऐतिहासिक कामगिरी बजावलेली विक्रांत ही केवळ युद्धनौका नव्हे, तर देशाचे मानचिन्ह म्हणून ओळखली जात असताना सरकारने लिलावाची भाषा करावी, हे दु:खद व संतापजनक आहे,' अशी खंत माजी केंद्रीय पेट्रोलियम मंत्री राम नाईक यांनीही काही महिन्यांपूर्वी व्यक्त केली होती. मात्र याचे पुढे काय झाले? असे होऊ नये; एवढेच आमचे म्हणणे आहे. प्रत्येक राजकीय पक्षाने यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. आणि असे झाले तर आम्ही सर्वांचेच स्वागत करत आहोत.

* टेक्नोसॅव्ही लढ्याने विक्रांत वाचेल?
शंभर टक्के वाचेल. कारण ऑनलाईन मोहिमेसाठी आर्थिक पाठबळीची गरज नाही. गरज आहे ती; मानसिक पाठबळीची. आणि तेच तर आम्ही भारतीयांकडून मागत आहोत. सर्वात महत्वाचे म्हणजे हा काही 'पब्लिसिटी स्टंट' नाही. हे काम तळमळीने सुरु आहे. देशातील ज्या राज्यांना समुद्रकिनारा लाभला आहे त्या प्रत्येक राज्याने विक्रांत वाचविण्यासाठी पुढाकार घेतला. ऑनलाईन मोहिमेला पाठबळ दिले. आर्थिक मदतीसाठी दोन हात पुढे केले तर स्वागतच आहे. कारण त्याचीच जास्त आवश्यकता आहे. विक्रांत्चे नाविकी संग्रहालय म्हणून जतन संवर्धन होणे हे लोकाग्रहाला धरून आहे. इतर देशांप्रमाणे भारताचे स्वतःचे युध्दनौकाप्रणीत नाविकी संग्रहालय नाही. जेणेकरून नाविकी प्रशिक्षण, शिवाय इतिहास व सैनिकी शास्त्र यांचा विद्यार्थ्यांना उपयोग होऊ शकेल. भारतीय जनतेची मागणी आहे की, सर्वोच्च न्यायालयाने तिच्या मोडतोडीवर प्रतिबंध घालून, तिचे संग्रहालयात रुपांतर करावे.

*विक्रांतने १९७१ सालच्या युद्धात निर्णायक भूमिका बजावली होती. ४ मार्च १९६१ रोजी विक्रांतचा नौदलामध्ये समावेश केला होता. 
पण राज्य सरकारने ही नौका भंगारात काढल्यामुळे ती सध्या गुजरात येथील अलंग बंदरात उभी आहे. *

दैनिक लोकमत लिंक : http://epaper.lokmat.com/epaperimages/mum/2742014/2742014-lk-mum-08/D27251540.JPG

शुद्धीपत्रक : 
* महाराष्ट्र सरकारची विक्रांतबद्दलची अनास्था बघून, मुंबई उच्च न्यायालयाने जानेवारी २०१४ मध्ये संरक्षण मंत्रालयाला विक्रांत लिलाव करण्याची परवानगी दिली.

दैनिक लोकमतने या विषयाला वाचा दिल्याबद्दल त्यांचे आभार. 

आनंद खर्डे यांनी याच्यावर काही तोडगेही दिले होते, जे काही कारणास्तव छापून येऊ शकलेले नाही. ते याप्रमाणे.

१. केंद्रीय संरक्षण मंत्रालय, कुठलेही राज्य सरकार, व स्थानीय स्वराज्य संस्था, यांनी मिळून हे संग्रहालय राखावं.
२. भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्याच्या सहभागाने कॉर्पोरेट सोशियल रीस्पोन्सिबिलीटी (सी.एस.आर) फंड वापरून वापर करून संग्रहालय चालवता येईल.
३. सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली लोकवर्गणी उभी करावी. ज्यामुळे पारदर्शकता व विश्वासार्हता वाढून लोक सहभाग वाढेल.

विक्रांत वर २.६ लाख चौरस फूट एवढी जागा आहे. यांत, ६०,००० चौरस फूट संग्रहालयासाठी वापरता येईल. १ लाख चौ.फू. हे शैक्षणिक मनोरंजन साठी वापरता येईल. उदा. विज्ञान प्रदर्शनी. आणि उरलेल्या १ लाख चौ.फू. जागेत हॉटेलांना भाडेतत्वावर देता येईल, जेणेकरून तिथे येणाऱ्यांची सोय होईल.

अशाप्रकारे अनेक उपाय करता येतील. आपल्या इथे राजनैतिक इच्छाशक्ती नाही आहे. इच्छाशक्ती असेल तर हे सगळं सहज शक्य आहे.