Monday, July 29, 2013

Samandar - समंदर

खूप पूर्वी ही सिरीयल यायची. आठवतं का तुम्हाला?
This program was telecast quite a long time ago. Does anyone remember it?

Sunday, July 28, 2013

Zanzibar Sailors - झांझिबारचे खलाशी


जंजिऱ्याचे सिद्दी कसे होते?

असा जर आपल्याला प्रश्न पडला असेल तर हा विडियो तुमच्या साठीच आहे.
अबिसिनिया, सुमालीया सारखेच झांझिबार सुद्धा आपल्या हबशी खालाशांसाठी प्रसिद्ध आहे.
सदर विडियो मध्ये आपण झांझिबारच्या स्वाहिली जमातीच्या लोकांना गलबते चालवताना पाहू शकता. हे हबशी किती कुशल नाविक होते हे तुमच्या पटकन लक्षात येईल.

अशा तरबेज लोकांशी समुद्रावर सामना देणे, शिवधनुष्य उचलण्या सारखेच आहे. आणी हा शिवधनुष्य उचलला राजा शिवछत्रपती यांनी.

Thursday, July 18, 2013

Maritime Museums in India

Maritime Museum, Kochi
Ancient canons, telescopes, navigation charts, missiles and guns, a visit to the Naval Maritime Museum guarantees an adrenalin rush. It documents the history of the Indian Navy right down to the tiniest detail. The museum offers a glimpse into the various operations of the Navy. One can learn the technicalities of ship building and see the armaments and equipment used by the Naval force. Some of them on display are a Tem-3 sweep diverter, deployed by mine-sweeping vessels to neutralise underwater mines, a vintage anti-aircraft gun from World War II, a replica of the destroyer INS Delhi and personal mementos such as the ceremonial sword. It is at the Navy’s Missile and Gunnery School, INS Dronacharya, Fort Kochi.
Time: 9.30 a.m. to 12.30 p.m. & 2.30 p.m. to 5.30 p.m.
Entry fee: Rs. 25 for adults and Rs. 15 for Indians
An additional Rs.100 will be charged for a camera and Rs. 150 for video camera.


Odisha State Maritime Museum, Jobra, Cuttack.
Monday's closed.
Entry fee: Rs 10
Group tickets for persons above 25 years (30 visitors in a group) Rs 200 will be collected
No entry fee from students and children below 10 years


INS Kursura Submarine Museum, RK Beach, Visakhapatanam.
Adult: Rs.40
Children: Rs.20
For Camera: Rs.50
For Video camera: Rs.200
Timings: 2.00 PM to 9.00 PM
Monday closed 


Naval Aviation Musuem, Bogmalai Beach, Dabolim, Goa.
Timings: 10 AM to 5 PM
Monday closed


Ballard Gatehouse, Ballard Estate, Fort, Mumbai.
Details coming soon.

Source: https://www.facebook.com/notes/maratha-navy-%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0/maritime-museums-in-india/333663243433272

Wednesday, July 17, 2013

Dhow Ships of Gujarat - गुजरातचे डाव गलबत

डाव: डाव हे एक विशिष्ट प्रकारचे गलबत नसून बरेच वेगवेगळ्या गलबत प्रकारांचा समूहाला दिलेले एक नांव आहे.

मराठा आरमारात वापरण्यात आलेले गलबत, महागिरी, मछवे, पडाव, फतेमार इत्यादी गलबते "डाव"च्याच पोटजाती आहेत.

प्रस्तुत विडियो गुजरात मध्ये बांधलेल्या डाव गलबतांवर आहे.

Dhow: Dhow is an Umbrella term rather than a specific ship-type.
Many boats & ships of Maratha Navy fall into the Dhow category, e.g. Galbat(Gallivat), Mahagiri, Machwa, Padao, Fatehmaar(Pattamar) etc.
Following video is on the Dhows built in Gujarat.




Monday, July 15, 2013

डच जहाज: अॅमस्टरडॅम


जर तुम्हाला कधी विचार पडला असेल की आंग्रेकाळात डचांचे जहाज कशे होते तर हा विडियो पहा.

हे जहाज १९८५-१९९० सालात तब्बल ४०० स्वयंसेवकांच्या पुढाकाराने बांधले गेलेले आहे. यांत आधुनिक औजार न वापरता तद्कालीन, म्हणजेच १७४० मध्ये उपलब्ध असलेले औजार वापरलेले आहे. आज हे नेदरलांद्स मरीटाइम म्युझियम येथे नांगरले आहे. 


Friday, July 5, 2013

News in Punyanagari

लघुपटातून उलगडणार कान्होजी आंग्रेंचा इतिहास: मुंबईतील ध्येयवेड्या तरुणांचा उपक्रम
- पुण्यनगरी ५-जुलै-२०१३



अलिबाग : मराठा आरमाराचे सरदार आणि अरबी सागरावर अधिराज्य गाजवणारे सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या पराक्रमाचा खराखुरा इतिहास जगासमोर आणण्याचा संकल्प मुंबईतील दोन ध्येयवेड्या तरुणांनी सोडला आहे. हे दोघे कान्होजी आंग्रे यांच्या जीवनावर आधारित लघुपट तयार करणार आहेत. आनंद खर्डे व प्रतिश खेडेकर अशी त्यांची नावे आहेत. ते आनंद जाहिरात क्षेत्रात काम करतात.



आपण समाजात वावरत असताना समाजाचे काहीतरी देणे लागतो. ज्या अगणित व्यक्तींनी आपल्यासाठी खूप काही करून ठेवले आहे, त्यांच्या इतिहासाला उजाळा दिला नाही तर तो नष्ट होईल. सामाजिक दायित्वाच्या भावनेतून आम्ही हा उपक्रम हाती घेतला असून आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने कान्होजीराजेंचा गौरवशाली इतिहास जगासमोर येईल. कान्होजी आंग्रे यांच्या इतिहासाबाबत समाजात वेगवेगळे समज-गैरसमज आहेत. ते दूर होण्यासही मदत होईल, असे आनंद खर्डे यांनी सांगितले. प्रतिश खेडेकर हा कान्होजी आंग्रे यांच्या जीवनावर अभ्यास करत आहे. लघुपटासाठी संशोधनाची जबाबदारी त्याच्यावर आहे. भारतीयांपेक्षा अन्य देशातील नागरिकांना, संशोधकांना आपल्या इतिहासाबद्दल कुतूहल आहे; परंतु पुरेशी माहिती नसल्याने ते पुढे येत नाहीत. हा इतिहास जगासमोर आला पाहिजे, या उद्देशाने आम्ही मराठीबरोबरच अन्य भाषांमध्येही या लघुपटाची निर्मिती करणार आहोत, असे प्रतिश यांनी स्पष्ट केले. त्यांच्या वेगवेगळ्या पैलूंवर प्रकाश टाकणारे स्वतंत्र लघुपट बनवण्याचा निर्णय आम्ही घेतला. आंग्रे यांचे पूर्वायुष्य, त्यांनी केलेली आरमाराची बांधणी, वेगवेगळ्या लढाया, त्यांची दानपत्रे, इंग्रजांच्या बलाढय़ आरमाराशी त्यांनी दिलेला यशस्वी लढा असे विविध विषय या लघुपटातून मांडले जाणार आहेत. त्यासाठी आम्ही स्केचेसचा वापर करणार आहोत. त्याचबरोबर पार्श्‍वनिवेदन व पार्श्‍वसंगीतही असेल. साधारण वर्षभरात हे काम पूर्ण होईल, असा दावा त्यांनी केला. गुरुवारी कान्होजी आंग्रे यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून या दोघा तरुणांनी अलिबागमधील आंग्रे यांच्या समाधीस अभिवादन केले. त्यानंतर आंग्रे यांचे वंशज रघुजीराजे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. लघुपट बनवण्यासंदर्भात या वेळी प्राथमिक चर्चाही झाली. केवळ आंग्रे यांचे वारस म्हणून नव्हे तर इतिहासाचे चांगले अभ्यासक म्हणून आंग्रे यांनी या तरुणांना आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याचे मान्य केले. या तरुणांच्या उपक्रमातून कान्होजीराजे यांचा जाज्वल्य इतिहास जगासमोर येईल व भावी पिढीला नक्कीच तो प्रेरणादायी ठरेल, असा विश्‍वास रघुजीराजे आंग्रे यांनी व्यक्त केला.

http://epunyanagari.com/epapermain.aspx?eddate=7%2F5%2F2013+12%3A00%3A00+AM&queryed=10&a=4&b=13414