Tuesday, December 24, 2013

Datta Pal - दत्तपाल

"दत्त" पाल. - Datta Pal

छ.शिवाजी. वास्तूसंग्रहालय येथील मॉडेल.
A model at Chhatrapati Shivaji Museum.

Monday, December 23, 2013

Mahadev Pal - महादेवपाल

८-एप्रिल-१७८३ रोजी रत्नागिरी येथे इंग्रजांच्या "रेंजर" जहाजासोबत झालेल्या लढाईत पराक्रम गाजवणारा "महादेव" पाल.

"Mahadev Pal", fought with distinction with the HCS Ranger at the battle of Ratnagiri.

Sunday, December 22, 2013

Narayan Pal - नारायण पाल

८-एप्रिल-१७८३ रोजी रत्नागिरी येथे इंग्रजांच्या "रेंजर" जहाजासोबत झालेल्या लढाईत पराक्रम गाजवणारा "नारायण" पाल.
खुद्द सुभेदार आनंदराव धुळप यांच्या स्वारीचे पाल.

"Narayan Pal", flagship of Subhedar Aanandrao Dhulap. Fought with distinction with the HCS Ranger at the battle of Ratnagiri.

Wednesday, December 18, 2013

Surf riding fishing boat

Surf riding fishing boats. Used on the western coast of India in general, and Kerala in particular.

Surf rider म्हणजे पाणी कापून जाण्याऐवजी लाटांवर स्वार होऊन जाणारा. यांचा आकार आणि वजन कमी असून, यांचा प्रमुख वापर छोटे मच्छीमार करत. तसेच हे बंदर-बोट म्हणून सुद्धा वापरत.

Copyrights: National Geographic Channel Türkiye

Thursday, October 31, 2013

Maratha Navy Day - मराठा आरमार दिन

आज ३१ ऑक्ट २०१३ म्हणजेच वसुबारस म्हणजेच आरमार दिन. आजच्याच दिवशी मराठा फौजांनी कल्याण आणि भिवंडी शहर जिंकले. भिवंडीला त्याकाळी आदिलशाहीत इस्लामाबाद म्हणत.
कल्याण खाडी शेजारी महाराजांनी दुर्गाडीचा किल्ला बांधायला सुरुवात करून मराठा आरमाराचा पाया रचला.
तिथि: अश्विन कृष्ण द्वादशी शके १५७९
जुलियन तारीख: २४ ऑक्ट १६५७
ग्रेगोरियन तारीख: ३ नोव १६५७

Today is Vasubaras, Maratha Navy Day. On this day Maratha forces captured the cities of Kalyan and Bhiwandi(then known as Islamabad).
On the shores of Kalyan river, Maharaj laid the foundation of Durgadi fort, and thus began Maratha Navy - मराठा आरमार.
Hindu date: Ashwin 12th day of Waning fortnight.
Julian date: 24 Oct 1657
Gregorian date: 3 Nov 1657




Wednesday, October 2, 2013

Maratha anchor - मराठा नांगर


Maratha anchor - मराठा नांगर
लाल बहादूर शास्त्री नॉटिकल अॅंड इंजिनीअरींग कॉलेज, येथे हे नांगर आहे. ह्या नांगराच्या संदर्भात खालील माहिती नमूद केली आहे.
"हा नांगर पश्चिम किनाऱ्यावरील विजयदुर्ग खाडीतील प्राचीन आरमारी गोडीच्या धक्याजवळून मिळवण्यात आला. हा निश्चितपणे अठराव्या शतकातील मराठा आरमाराच्या पाल-गुराबाचा आहे."

या व्यतिरिक्त अजून एका नांगराचा संदर्भ आहे, तो असा. 
५ फेब्रुवारी १९५६ साली मराठा आरमारातील जहाजाचा एक नांगर विजयदुर्ग बंदराजवळ समुद्रात मिळाला. तो कमीतकमी १०० वर्षे पाण्याखाली पाण्याखाली असावा असा तज्ञांचा अंदाज आहे. त्याची लांबी १३.५ फूट, रुंदी ८ फूट व त्याच्या मधल्या रुळाचा परिघ २ फूट आहे. जे आर डेव्हिस या भारत सरकारच्या नॉटिकल अॅडव्हायजरनी तो तेथून काढून मुंबईतील मॅरीटाईम म्यूझियम मध्ये आणला. संदर्भ: Entry under "Vijaydurg", in "Places of Interest", from "Ratnagiri District Gazetteer."

This anchor is placed at Lal Bahadur Shastri Nautical and Engineering College, Mumbai. Information plaque besides the anchor states that "the anchor was found near the Naval docks of Vijaydurg fort. It must have belonged to a Paal or Gurab of Maratha navy."

Besides this, there is a reference to another anchor.
An old anchor (length 13', breadth 8' and rod circumference 2'), belonging to the Maratha Navy was found lying in water near the port for over hundred years and still in good condition. It was removed to the Maritime Museum, Bombay, from the port at the request of Captain J. R. Davis, Nautical Adviser to the Government of India on 5th February 1956.
Quoted verbatim, entry under "Vijaydurg", in "Places of Interest", from "Ratnagiri District Gazetteer."

Where you can see this now.
Lal Bahadur Shastri Nautical and Engineering College,
Hay bandar road,
near Reay road station,
Mumbai - 400033

Tuesday, October 1, 2013

कान्हीजी आंग्रे यांच्यावर दूरदर्शन मालिका काढावी

"कान्हीजी आंग्रे यांच्यावर दूरदर्शन मालिका काढावी" या आशयाचे पत्र ९३ साली चुनाभट्टीचे दत्ताराम गायकर यांनी दैनिक सामनाला पाठवले होते.

सदर पत्र सोबत देत आहे.

दैनिक सामना
दिनांक २ सप्टेंबर १९९३