कालच्या सिद्दी/हबशी पोस्टबाबत अजून एक प्रश्न विचारला गेला आहे.
"दोन - तीनशे वर्षांपूर्वी जे हबशी महाराष्ट्रात होते त्यांचे पुढे काय झाले? पेशवाईत आणि नंतर हाबश्यांचे काय झाले ? आत्ता त्यांचे वंशज महाराष्ट्रात कोठे आहेत ? काय करतात ? वाचायला नक्की आवडेल" - भूषण विश्वनाथ
उत्तर:
कोंकणातील हबशी/सिद्दी यांचे वंशज हल्ली आहेत की नाही याबद्दल मी सांगू शकत नाही. जंजिऱ्याच्या सिद्दीचे वंशज आजही मुरुड शहरात आपल्या वाड्यात राहतात.
गुजरात आणि उत्तर कर्नाटकात हबशांचे वंशज अजूनही आहेत. यांच्यात सुद्धा हिंदू हबशी आणि मुसलमान हबशी असे प्रकार दिसतात. आदिवासी सारखं जगणं आणि गावातच राहणं यांना आवडतं.
शिवकाळात गुलाम विकत घेणाऱ्या आदिलशाही आणि क़ुतुबशाही ही दख्खनी राज्ये होती. या उलट, मुघल हे स्थानिक मनसबदारांच्या बळावर उभारलेली राजवट होती. त्यामुळे मुघलांना कधी गुलामांची खास गरज भासली नाही.
१६८६-८७ मध्ये, औरंजेबाने आदिलशाही आणि क़ुतुबशाही नष्ट केली, आणि २०० वर्षांपासून चालत आलेला हा गुलाम विकत घेण्याचा प्रकार एकदमच थांबला. भविष्यात याची पुनरावृत्ती झालीच नाही.
यामुळे, पेशवेकाळात सिद्दीच्या आरमारात आणि फौजेत बहुतांशी स्थानिक कोळी, आगरी, आणि भंडारी यांचा भरणा जास्त असे. खुद्द बाजीराव पेशवेंना मुरुड पर्यंत येण्याचा गुप्त मार्ग दाखवणारा सिद्दीचा फितूर सरदार शेखजी, हा सुद्धा एक बाटलेला कोळी होता.
नाना फडणीसच्या काळात जंजिरा संस्थानाची विभागणी झाली. ती याप्रकारे...
१. जंजिरा संस्थान. हे मूळ कोंकणातील संस्थान
२. सचिन संस्थान. हे गुजरात मध्ये आहे. (हा प्रांत १६७०-७१ साली औरंगजेबाने सिद्दी संबूळ याला आरमारासाठी दिला होता.)
याविषयावर काही चांगले संदर्भ ग्रंथ:
African elites in India: Habshi Amarat
- Kenneth X. Robbins, John McLeod
http://books.google.co.in/books?id=qBduAAAAMAAJ
India in Africa, Africa in India: Indian Ocean Cosmopolitanisms
-John C. Hawley
http://books.google.co.in/books?id=QMmu7gN8EwUC
The African Diaspora in the Indian Ocean
-Shihan de S. Jayasuriya, Richard Pankhurst
http://books.google.co.in/books?id=mdpcgy_aopwC

No comments:
Post a Comment