Showing posts with label Fort Conservation. Show all posts
Showing posts with label Fort Conservation. Show all posts

Saturday, March 1, 2014

एक आवाहन

|| एक आवाहन ||

श्री शिवछत्रपतींनी जवळपास ३०० गडांवर राज्य केले. त्यापैकी बरेचसे गड त्यांनी स्वतः बांधवून घेतले, परंतु एकही गडावर त्यांनी आपले नाव कोरून ठेवले नाही. राज्यकर्ता असल्याने त्यांना हे शक्य होते, तर त्यांनी ते स्वकर्तृत्वाने इतिहासात कोरून ठेवले आहे आणि आम्ही करंटे कोठे एखादा दगड पहिला तर आमचे नाव मिळेल त्याने कोरून ठेवतो. का? तुमच्या मनात जर खरोखरच राजांबद्दल आदर असेल तर या वास्तू जोपासा, सांभाळा, पाळा. नपेक्षा स्वतःला भारतीय म्हणणे सोडून द्या.