डॉ. सचिन पेंडसे यांचे काल दिनांक १३ जानेवारी रोजी हार्टअटॅकने निधन झाले. ते ५६ वर्षांचे होते.
डॉ. सचिन पेंडसे, "मराठा आरमार - एक अनोखे पर्व" च्या प्रकाशनावेळी |
डॉ. पेंडसे हे अंधेरी, मुंबई येथील तोलानी कॉलेज येथे सहयाय्क प्राध्यापक म्हणून अध्यापन करीत होते. ते मुंबई विद्यापीठातून भूगोलात पदव्युत्तर व विद्यावाचस्पती पदवीधर होते.
भारतीय नौसेनेच्या पश्चिम कमांडच्या मरिटाईम हिस्ट्री सोसाईटी, इंस्टिट्यूट ऑफ डिफेन्स स्टडीज अँड अॅनॅलिसीस, नॅशनल मरिटाईम फाउंडेशन व कोंकण इतिहास परिषदेचे आजीवन सभासद होते. यांनी लिहिलेले अनेक शोधनिबंध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पत्रिकांमध्ये प्रसिद्ध झालेले आहेत.
प्रख्यात सामुद्रिक इतिहास अभ्यासक व मुंबई विद्यापीठाचे भूगोल विधागाचे माजी-प्रमुख बी. अरुणाचलम यांच्या सोबत यांनी "Maritime Heritage of Goa and Uttar Kannada" सारखे अभ्यासपूर्ण ग्रंथ लिहिलेले आहेत. तसेच, मरिटाईम हिस्ट्री संस्थेच्या "एस्सेस इन मरिटाईम स्टडीज" याच्या ३ ऱ्या खंडाचे संपादन सुद्धा यांनी केले आहे.
फ्रेंच सरकार व पॅरीस विद्यापिठाच्या संयुक्त विद्यमाने प्रणीत Association Oceanides (आसोसिआस्यों ओसानिदे) या जागतिक सामुद्रिक इतिहास प्रकल्पात "मराठा आरमार" व "पारंपारिक भारतीय जहाज बांधणी" या विषयावर लेखन केलेले आहे.
अमेरिकेच्या आरमारी युद्ध महाविद्यालयात (Naval War College) "मराठ्यांचा आरमारी लढा" (Maratha Naval Resistance) या विषयावर व्याख्यान दिले आहे. या व्यतिरिक्त त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर ८ व राष्ट्रीय स्तरावर ५ परिसंवादात सहभाग घेतला होता.
डॉ. पेंडसे यांच्या जाण्याने मराठा आरमार अभ्यासाच्या क्षेत्रात एक न भरून येणारी पोकळी निर्माण झालेली आहे.
No comments:
Post a Comment