Tuesday, January 14, 2014

मराठेकालीन प्लास्टिक सर्जरी

कोवासजी नामक एक दलित बैलगाडीवाला चेन्नई येथील कंपनी फौजेत दाणागोटा पोहोचवण्याचे कामास ठेवला होता.
१७९२ साली टिपु सोबतच्या युद्धात इंग्रजांच्या बुणग्यात हा ही होता. एकदा टिपूच्या फौजेने या बुणग्यांवर हल्ला करून कोवासजी सोबत ४ इंग्रज गारदी पकडले. चारही गारद्यांचे हात, तर कोवासजीची नाक कापून त्यांना मुंबईस धाडले.

वाटेत यांचा मुक्काम पुण्यात झाला. इथे, पेशवे दरबारातील इंग्रजांचा वकील चार्ल्स मालेट यांनी या सगळ्यांची दशा पाहून वैद्यांना धाडले.
कोवासजीवर एका स्थानिक कुंभार वैद्याने शस्त्रक्रीया करून त्याला कृत्रिम नाक बनवून दिले.

या शस्त्रक्रीयेच्या वेळी दोन इंग्रज डॉक्टर,थोमस कृसो आणि जेम्स फिन्डले, तसेच लेफ्टनंट कर्नल वार्ड हजर होते. सहा महिन्यानंतर जेम्स वेल्स या चित्रकाराने कोवासजीचे चित्र रेखाटले. लवकरच हे चित्र आणि शस्त्रक्रियेचे पूर्ण वृत्तांत १७९३च्या मद्रास गॅझेटीयेर मध्ये छापले गेले.

पुढे, ऑक्ट १७९४ साली हे वृत्तांत इंग्लंडच्या जेंटलमेन्स मॅगझीन मध्ये प्रकाशित झाले. या बातमीमुळे इंग्लंड मध्ये Plastic Surgery, आणि Rhinoplasty चे नविन वेड लागले. प्रत्येक डॉक्टर ही प्रक्रिया पुन्हा करू पाहत होता. शेवटी १८१४ साली डॉक्टर कार्पू यांनी इंग्लंड मधील पहिली Rhinoplasty पार पाडली.

1 comment:

किरण क्षीरसागर said...

नमस्‍कार, या माहितीचा स्रोत काय ते कळू शकेल का? कृपया संपर्क करावा अथवा तुमचा संपर्क कळवावा.
9029557767