Thursday, February 6, 2014

Siddi/Habshi - सिद्दी/हबशी

श्री अमित बर्वे यांनी विचारलेला प्रश्न.
"सिद्धी आणि हबशी एकच कि वेगवेगळे.?"

उत्तर:

सिद्दी आणि हबशी या दोन्ही शब्दांचे अर्थ वेगवेगळे होते. पण कालांतराने या डोंघांचे अर्थ एकच झाले आहे. 

आज ज्या देशाला Ethiopia म्हणून ओळखले जाते, त्याला पूर्वी अरबी लोक "अल-हबश" म्हणत. आणि तिथे राहणाऱ्यांना "अल-हबसाह".
या "अल-हबश"चे इंग्रजांनी पुढे Abyssinia करून टाकले. तर मराठीत "हबसाण" झाले. आणि हबसाणात राहणारा तो हबशी. कालांतराने हबशीचा अर्थ आफ्रिकन झाला.

भारतातील मुसलमान राजवटींना सत्ता टिकवण्यासाठी भारतीय गुलामांवर टिकून राहणे धोक्याचे वाटत. म्हणून हबसाण आणि शेजारच्या सोमालिया येथून मुद्दाम या लोकांना पकडून, कैद करून, बाटवून गुलाम बाजारांत विकले जाई. अशाच बाजारातून हे भारतात आणत. याच गुलाम हबशीना आपण "सिद्दी" म्हणून ओळखतो.

सिद्दी हा शब्द अरबी "अल-सय्यीद" मधून आलेला आहे. "अल-सय्यीद" म्हणजे मालक. यातूनच "सय्यीदी" (इंग्रजीतील "My Lord" सारखं) हा संबोधनपर शब्द निघतो. हे गुलाम सतत आपल्या मालकाला "सय्यीदी" म्हणून हाक मारी म्हणून त्यांना लोकं "सय्यीदी" म्हणू लागले. आणि त्याचेच पुढे सिद्दी झाले.

सोबत जोडलेल्या नकाशात हबसाण/Ethiopia (भगवा) आणि सोमालिया (लाल) यांची जागा दर्शवली आहे. हेच आजच्या सिद्दींचे मूळ स्थान.

No comments: