गाबती/गाबीत -
या जातीची लोकसंख्या (१९११) २४,८१८. रत्नागिरी व कानडा जिल्ह्यांतील समुद्रकांठचा प्रदेश व सांवतवाडी संस्थान येथें हे लोक आढळतात. यांचीं गाबीत किंवा ग्राबती अशींहि दुसरी नांवे आहेत. गाबती हें नांव पडावयाचें कारण असें सांगतात कीं शिवाजी महाराजांनीं आरमार तयार केलें. त्यावेळीं त्यांत तिर्कटीतारूं, गलबत, मचवा, पडाव, शिबाड, होडी, डोण, पगार व ग्राब अशीं निरनिराळीं गलबतें होती. ग्राबजहाज हें लढाऊ असे. त्यावर तोफा असत. ग्राब (गुराब) हा आरबी शब्द आहे. त्याचा अर्थ गनबोट होय. या ग्राबावर जे लढाऊ मराठे कोंकणी नोकर राहिले ते हे ग्राबती होत. गाबीत हा शब्द खरा नाहीं (हा सेन्सस रिपोर्टांत येतो.) ग्राबती व गाबती एकच. आम्हीं कोंकणी मराठे असून आमचे पूर्वज पूर्वी शिवाजीच्या आरमारखात्यांत नोकर होते असें हे म्हणतात. म्हणून जैतापूर, विजयदुर्ग, देवगड, मालवण, वेंगुर्ले या पूर्वीच्या आरमाराच्या ठिकाणीं यांची वस्ती जास्त आहे. पेशवाई बुडाल्यानंतर त्यांनीं कोळ्याचा धंदा सुरू केला असें म्हणतात. १७६० च्या अगोदर व त्यानंतर सुमारें ४० वर्षेपर्यंत हे लोक दर्यावर्दीपणाचा धंदा करीत होते. यांच्या बायकामुलांनीं (पुरुष आरमारावर नौकर असल्यामुळें) शेजारी रहात असलेल्या कोळ्यांचा धंदा व मोलमजुरी करण्यास प्रारंभ केला. त्यामुळें मराठे व या लोकांचा संबंध दुरावला. साठसत्तर वंर्षापूर्वी मराठ्यांचा व यांचा रोटीबेटीव्यवहार असे पण हल्ली नाहीं. त्यावेळीं मालंडकर परब (ग्राबती) यांची मुलगी विजयदुर्गाच्या धुळपांकडे दिली होती असें म्हणतात. यांचीं आडनांवेंहि मराठ्यांच्या आडनांवांची आहेत. वेंगुर्ले येथें कुबल आडनावांचीं पांच घराणीं असून त्यापैकीं चार मराठे व एक गाबती आहे. मानमरातब पंचांनांहि सारखाच मिळतो. हुद्यांचीं दर्शक आडनांवें यांच्यांत आहेत तीः- तांडेल, साततांडेल, पडतांडेल, फडतांडेल, तिळतांडेल, मायनाक, नाईक, पडनाईक, फडनाईक, महालनाईक, मुकनाईक, सारंग, मोठेसारंग, बुड्ये इत्यादि. या लोकांमध्यें कुळें व देवकें आहेत व त्यावरून ते मूळचे मराठे असण्याचा फार संभव दिसतो. मासे पकडून विकणें व दर्यावर्दीपणा करणें हे त्यांचे परंपरागत धंदे होत. यांमध्यें गोत्रेंहि आहेत. परंतु त्यांचा उपयोग होत नाहीं. विवाहाच्या चालीरीति वेगवेगळ्या आहेत. यांच्या गलबतांवरील विशिष्ट दोर्यांचीं नांवे शिवाजी, संभाजी, शाहू, गाई, वासरूं अशीं असतात. पन्नास वर्षांपूर्वीपर्यंत यांच्या गलबतावर तोफा असत. त्यावेळीं महादू बुदबाराव कुबल नांवाच्या गृहस्थाच्या हातून तोफेच्या अपघातानें एक बाई मेल्यामुळें तेव्हांपासून तोफा ठेवण्यास बंदी झाली. ग्राब ठेवण्याच्या जागेस गुराब देवणें म्हणतात. यांची कुलदैवतं महादेव व पार्वती होत. यांच्या सर्व चालीरीती मराठ्यांप्रमाणेंच आहेत असें म्हणतात. कुळांवरून लग्नें ठरतात. कळंब, आंबा वगैरें देवकें यांच्यांत आहेत. आतेबहिणीशीं लग्न करण्यास उलट सांखळी म्हणतात. लग्नाच्या वेळीं नव-याच्या डोक्यावर उलट धार करून शस्त्र धरतात. लग्नानंतर वधुवर कोण्या तरी इष्ट मित्राच्या घरीं पाहुणचारास जातात. तेथें रात्रीं एकांतांत वरास आपली अंगठी वधूस द्यावी लागते. लग्नाच्या वेळीं वरास जानवें देतात. पुढें धंद्याच्या गैरसोयीमुळें तें खुंटीस ठेवतात. विवाहादि सर्व संस्कार ग्रामजोशी ब्राह्मण उपाध्याय करतो. या जातीच्या रखेलीपासून झालेली संतति मराठा जातींत मोडते; त्यांची निराळी जात नाहीं. मात्र अशा पहिल्या पिढीस बंदा म्हणतात व त्यापुढील संतति आस्ते आस्ते पक्क्या मराठ्यांत मोडते. त्यांच्यापैकीं कांही वारकरी व रामदासी पंथाचे आहेत. यांच्या गांवोगांवी पंचायती होत्या व सर्वसाधारण पंचायत मालवणास होती. तिचा अध्यक्ष वंशपरंपरेचा असतो. हल्ली फार थोड्या पंचायती शिल्लक आहेत. पूर्वी निवाडे लिहून ठेवण्याची पद्धति होती. निकाल न पाळल्यास गुडगुडी, पाणी, विस्तव, रोटीव्यवहार हे बंद करणें किंवा दंड करणें या शिक्षा असत. कांहीं गांवी जातीचीं मालकीचीं देवस्थानें आहेत. जातीचा कर नाहीं. ब्राह्मण, मराठे व वाणी यांच्या बरोबर यांचा अन्नोदकव्यवहार चालतो. यांच्यांत पोटजाती नाहींत. संकेश्वर मठ हा या जातीच्या धर्मगुरूचा मठ होय. यांच्यांत दोन शिक्षणविषयक फंड आहेत. या जातीबद्दल एन्थॉलॉजिकलसर्व्हे डिपार्टमेंटकडून चौकशी होत असतां ''आमच्या जातीपैकीं कोणाहि गृहस्थाचा सल्ला घेण्यांत आला नाहीं; उलट प्रतिस्पर्धी जातीकडून भलती नालस्ती करणारी चुकीची माहिती मिळवून सरकारनें मोनोग्राफ छापला. तो छापला गेल्यावर जातींतील पुढार्यांनीं एन्थॉ. डिपार्टमेंटला अर्ज करून त्यांत केलेल्या खोट्या विधानांबद्दल तक्रार केली व खरीखुरी माहिती पुराव्यानिशीं सादर केली. परंतु मोनोग्राफ पूर्वीच छापून निघाल्यामुळें त्याचा कांहीच उपयोग झाला नाहीं.'' असें रा. कृ. वि. कुबल म्हणतात. (सेन्सस ऑफ इंडिया १९११ व्हॉ. ७; रा. कृ. वि. कुबल यांनीं पुरविलेली माहिती.)
साभार : केतकर ज्ञानकोश

55 comments:
so gabit caste is accutually in maratha right ??
Armari maratha aani gabit same aahet na... Aani te maratha yetat na..?
Aramari maratha manje 96 kuli maratha aahet ka ani Aramari maratha related books suggest karal ka jyat details astil
Sankeshwar math mhanaje konata karan mi sankeshwar chya(karnatak) la jaun aalo aahe tyamule mla ajun mahiti hvi aahe. Mi kole (aatache aadnaav Parab) Gaabit samajacha aahe.
Call me on 7666049874
Swapnil Parab
96 kuli maratha aahot aamhi..... Vijaykumar Keluskar
Gabit aahe tar gabit aahe. tyala maratha asnyache
sheput kashala have ?
Gabit caste hi low caste kinva budhhist caste ahe ka???
sindhudurg n ratnagiri mdhe gabit lok aarmar sambhalayche n raigad thane mumbai palghar mdhe Aagri koli lok Aarmar sambhalayche
ani maratha hi caste nahi ahe...18pagad jatina ektra gheun maharajani Aarmy ubhi keli hoti ...pratyek gharatla 1 member aarmyt hota ani bakiche sheti kiva vyavsay karayche mhnun same adnav aslele lok maratha ani gabit donhi jatit ahet
Gabit kinva kshatriya armari gharani he Shivaji maharajanch navdal navhata.Shivaji maharajani armar he kalyan madhe stapit kela hota tya armarat sarva masemari samaj hothe.Gabit Navdal he Sawantwadiche sawant hyanche paramparik navdal hotha,Bandar bandani,Bandar saurakshan,Sainik,daryavardi,Khalashi ha tyancha vyavasay.Shivaji maharajanche navdal he takadwar navhate,jyaweles Kanhoji angre hyani armar ubhe kele tyaveli shivaji maharajanchya armarachi dayaniy awastha hoti.Kanhojini te armar ubhe kela tyaweles tyani khas karun Dakshin kokanatun Gabit sainya magun ghetale.Gabit gharanyani kadhich adnaave ghetaleli nahit,vyavsay aani huddanusar tyana naav milali aahet e.g.Sarang,Bandekar,Jatekar,Khobarekar,Bhatkar,Juvekar,SarTandel,Dhulap,Juwatkar,Koyande,Bhabal aani vishesh majhe hi sarvi gharani kshatriya aahet.Gabit hi jaat 96kuli marathe nahit,tar hi jaat rajput gharani ahet,Uttar bharatala fagun gabit fag mhanun sajara karatat.Shri M Mate hyanchyanusar Kokanatil adnaave konatyahi tharavik samajachi matedari naahi,Kokanat saman aadnaave sarva jatinmadhe adhalata.Itihas aani abhyas nasalyas statement mandu naye.Varil sarva bab Hi puraveshil siddha aahe
Pls contact me 8779570238
Sujay kubal 96 kule maratha
Mhanje gabhit hey koli nasun te Maratha ahet v fakt peshvyanch rajya samplyavar tyani masemari suru keli mhanun tyana low caste madhe yetat right man???
Mala Sarang gharanyacha Purn itihas kuthe sapadel
Harshraj mala Sarang gharanyacha itihas kuthe sapadel. Maza email sushantsarang75s@gmail.com mob. 7756842975
No.
mala Hirnaik gharane(vijaydurg) yacha purn itihas kuthe millel. mazya vachnanusar. Hirnaik Gharane he Hiroji sawant je Peshvai chya kalat Vijaydurg killyache head(Naik)hote tyanchya navache athvab mhanun Hiroji Naik che Hirnaik zale. Hiroji Naik mhanje Adhiche Hiroji Sawant mul Somvavnshi, Durvasa Gotri 96kuli Maratha sawant.
No
No independ cast
Hindu gabit
आमचं आडनाव 'म्हादनाक' आहे. मिळालेल्या माहितीनुसार 'म्हादू' नावाचा ईसम हा जहाजावर 'नाईक' पदावर होता. त्याला 'म्हादूनाईक' असे नाव पडले. नावाचा अपभ्रंश होत गेला - म्हादनाईक - म्हादनाक' असं आडनाव पुढे चालू राहिले. आमचं मूळ गाव विजयदुर्गजवळ गिर्ये बांदेवाडी आहे. या गावात सगळे गाबीत आहेत. आईचं माहेर देवगड, जामसंडे जवळ वाडातर गाव.. त्याला 'गाबितवाडी' म्हणून सुद्धा ओळखलं जातं.
Can anybody guide me on Sankeshwar Math; location at leasy
Mala kharvi lokancha ithihas janun ghyayacha ahe.he lok masemari kartat .
You guys should read this book for every details about gabit community http://www.granthalaya.org/cgi-bin/koha/opac-detail.pl?biblionumber=435009
Sarang gharanyacha itihas tula bhetla tar mala pan sang.
Me pan Sushant Sarang aahe.
sarang.sushant705@gmail.com
juwatkar charanyacha purna itihas kuthe milel.
mjuwatkar1@gmail.com
1964 पूर्वी गाबीत नावाचं अस्तित्व नव्हतं. मग हे नाव 1965 पासून कस आल्. आरमारी जहाजावर काम करत असताना देखील हे नाव या समाजाला मिळाले नाही .अकस्मात भारत स्वतंत्र झाल्यावर 1985 पर्यंत शाळेच्या दाखल्यावर हिंदू मराठा अस असायचं..हे का कस घडलं कोण सांगेल का. इतर प्रत्येक समाजाला पौराणिक कथा आहेत इतिहास आहे. मग गाबीत समाजाला इतिहास भूगोल काहीच नाही का.
Malvan chya gabit maratha joshi kutumbach kuldaivat kalel ka? Gram daivat kandalgavach rameshwar ani sateri Devi he ahe tr kuldaivat kon te kalel ka? Amhala kuldaivatechi nad sangitl ahe tr tyach a kahi upay mahit ahe ka
Nooo
नाही ,,गाबीत ही लो कास्ट नाही ,,, गाबीत हे आरमारी मराठा आहे. पण कालांतराने निसर्गाचा प्रकोपाने वादळात गलबते बुडाल्याने त्यांना आर्थिक स्थितीला सामोरे जावे लागले आणी त्यात् उत्पन्न नाही म्हणून आर्थिक दृष्ट्या मागासलेले ...
खरंतर आपण हिंदू मराठा आहोत,पण आपले व्यवसाय हा मस्याचा होता त्याचा वेतिरिक्त आपला व्यवसय् नाही पण समुद्री वादळाने आपले गलबते बुडाले समुद्रा किनाऱ्यावर रहाणारे आपण आपल्या जमिनी समुद्र वाढल्या मुळे त्या ही गेल्या काहींचे घर उद्धवस्त झाली म्हणून उत्पनाच काही साधन नसल्याने आपण आर्थिक दृष्ट्या मागासले आलो....तेव्हा गाबीत हे लावण्यात आले
Gabit Armari Ghranyacha Itihas
Book By Ramesh Kubal
Pdf Konala Havi Asel Tar Mi Mail Karu Shakto
Nahi.gabit mhanje machchhimar samaj.
Please mail me pdf to my email joshipreeti912@gmail.com
आपल्या गाबित समाजाला स्टेट गवर्मेंट मधे मोडतात पण सेंट्रल गवर्मेट मधे का मोडत नाही
Gabit anhi koli caste same cha hai ka??
Please mail me at ameyvicky2001@gmail.com
होय गाबीत मचीमार आहे
please mail me at jaegeraaron87@gmail.com
गाबित हे मराठा आहेत. Navy चे मराठा
Plz mail me I am from kole ( gabit ) family
parabhemant17@yahoo.com
Mail me at shashankmondkar23@gmail.com
मनापासून धन्यवाद माहिती पुरवल्या बद्दल अजून काही लोकांना गाबित समाज काय हे कळाले नाहीं तुम्ही जी माहिती पुरवली तोच एक जागृत इतिहास आहे गाबीत समाजाचा पुनः एकदा धन्यवाद
Vighnesh kahihi bolu Nako...Maratha hi seperate caste ahe..tumache 18 pagad ghala chulit...mag amhi jatiche marathe kay akashatun tapakalo kay...tumachya sarkhyana jaticha Ani etihasacha patta nahi...ale bhik mage bhatukade
Gabit हि क्षत्रिय कुलावतंस जात आहे
Hoo
Can anyone tell me 5 surnames, I am adopted son, the parents lost there son then they adopted me, I have his caste certificate I want to provide 5 surname for caste validity certificate, this family is not so cooperative may they lost change of property distribution 😂😂😂
नाही
गाबित महाराष्ट्रात विशेष मागास प्रवर्गात Special Backward Class SBC मध्ये आहेत व महाराष्ट्रबाहेर OBC मध्ये आहेत
मला koiba surname चा इतिहास मिळेल का
कुईबा आडनाव चा इतिहास
गाबीत समाजातील आडनावे बौद्ध जातीत आढळतात का? प्रश्न खारीज
Gabit cast chi adnave mahi ahe ka
Gabit जात sbc आहे. आरमारी
मराठा जात Obc. Sbc.आहे का.
Post a Comment